IND Women vs AUS Women : दुसऱ्या दिवशी पावसाचा पुन्हा व्यत्यय, मानधनाचं शतक, भारत मजबूत स्थितीत

| Updated on: Oct 01, 2021 | 6:50 PM

भारतीय महिला (Indian Women) आणि ऑस्ट्रेलियन महिला (Australia Women) क्रिकेट संघ यांच्यात खेळवल्या जात असलेल्या एकमेव डे-नाईट कसोटीच्या दुसऱ्या दिवसाचा खेळ पूर्ण होऊ शकला नाही.

IND Women vs AUS Women : दुसऱ्या दिवशी पावसाचा पुन्हा व्यत्यय, मानधनाचं शतक, भारत मजबूत स्थितीत
Smriti Mandhana
Follow us on

कॅनबरा : भारतीय महिला (Indian Women) आणि ऑस्ट्रेलियन महिला (Australia Women) क्रिकेट संघ यांच्यात खेळवल्या जात असलेल्या एकमेव डे-नाईट कसोटीच्या दुसऱ्या दिवसाचा खेळ पूर्ण होऊ शकला नाही. कडकडणाऱ्या विजा आणि पावसामुळे खेळ थांबवावा लागला. खेळ थांबला तेव्हा भारतीय संघाने पाच विकेट्सच्या बदल्यात 276 धावा केल्या होत्या. दीप्ती शर्मा 12 धावा करून खेळत होती तर तानिया भाटियाने अजून खाते उघडले नव्हते. (IND Women vs Aus Women 2nd day Smriti Mandhana Century make india Strong in Pink ball test)

खेळ थांबवल्यानंतर खेळपट्टी झाकण्यात आली आणि खेळाडूंनीही मैदान सोडले. हवामान खात्याने यावेळी वादळाचा अंदाज वर्तवला होता आणि लवकरच पाऊस सुरू झाला. दुसऱ्या सत्रात भारताने दोन गडी गमावले, ज्यात कर्णधार मिताली राज (30) आणि नवोदित यास्तिका भाटिया (19) यांच्या विकेट्सचा समावेश आहे. ऑस्ट्रेलियाच्या सोफी मॉलिनेक्सने आतापर्यंत दोन विकेट्स घेतल्या आहेत. अॅशले गार्डनर आणि पेरी यांना प्रत्येकी एक विकेट मिळाली आहे.

चौकारांची बरसात, स्मृती मानधनाचं पहिलं कसोटी शतक

भारताची स्टार क्रिकेटपटू स्मृती मानधना (Smriti Mandhana) हिने गोल्ड कॉस्टवर खेळवल्या जात असलेल्या डे-नाईट कसोटी सामन्यात ऑस्ट्रेलियाविरुद्ध (Ind vs Aus) ऐतिहासिक शतक झळकावले आहे. भारतीय महिला संघ प्रथमच डे-नाईट कसोटी सामना खेळत आहे आणि मानधनाने तिच्या शतकासह हा सामना संस्मरणीय बनवला आहे. मानधनाच्या कारकिर्दीतील हे पहिले कसोटी शतक आहे. तिने सामन्याच्या दुसऱ्या दिवशी आपले शतक पूर्ण केले. स्मृती मानधनाच्या कारकिर्दीतील हा चौथा कसोटी सामना होता. या सामन्यात तिने शानदार शतक झळकावले. यापूर्वी, कसोटीत तिची सर्वोत्तम धावसंख्या 78 होती, जी तिने या वर्षी इंग्लंडविरुद्ध केली होती.

आपल्या कारकिर्दीतील चौथा कसोटी सामना खेळताना मानधनाने 170 चेंडूत 100 धावांचा टप्पा गाठला. या शतकी खेळीत तिने 18 चौकारही लगावले. सामन्याच्या दुसऱ्या दिवशी, भारतीय डावातील 51.5 षटकात, तिने एलिस पेरीच्या चेंडूवर मिडविकेटवर चौकार मारून आपले ऐतिहासिक शतक पूर्ण केले. सलामीवीर म्हणून शतक झळकावणारी ती पहिली भारतीय महिला कसोटी खेळाडू ठरली आहे.

मानधनाने 52 व्या षटकात एलिस पेरीला पूल शॉट मारून आपले शतक पूर्ण केले. मानधानालाही सामन्याच्या दुसऱ्या दिवशी मोठं जीवदान मिळालं. दुसऱ्या दिवसाच्या दुसऱ्या षटकात ती पेरीच्या चेंडूवर झेलबाद झाली. मात्र, गोलंदाज पेरीचा पाय रेषेच्या पुढे असल्याने पंचांनी नो बॉल दिला. अखेर अॅशले गार्डनर हिने मानधनाची शतकी खेळी संपुष्टात आणली. गार्डनर मानधनाला ताहिला मॅक्ग्राथकरवी झेलबाद केलं. मानधनाने 216 चेंडूत 127 धावांची खेळी केली. यात 22 चौकार आणि एका षटकाराचा समावेश आहे.

इतर बातम्या

ऑक्टोबरमध्ये क्रिकेटचा महासंग्राम, आधी IPL मग T-20 वर्ल्डकपचा थरार, ‘या’ तारखा लॉक करुन ठेवा

धोनीचा स्टेडियमबाहेर उत्तुंग षटकार पाहून साक्षी-झिवाचा जल्लोष, पाहा धोनीची खास ‘Family Moment’

SRH vs CSK : चेन्नईचं विजयासोबत धोनीचा नवा विक्रम, अनोखं शतक केलं नावावर

(IND Women vs Aus Women 2nd day Smriti Mandhana Century make india Strong in Pink ball test)