IND vs ENG | इशानच्या मागून आलेल्या खेळाडूचा इंग्लंड विरुद्धच्या सामन्यासाठी टीममध्ये समावेश, BCCI ची घोषणा

| Updated on: Jan 20, 2024 | 9:10 AM

IND vs ENG | इशान किशनसाठी टीम इंडियाचे दरवाजे कधी उघडणार? हा मोठा प्रश्न आहे. इशान किशनच्या मागून आलेल्या खेळाडूला टीममध्ये स्थान मिळतय. पण इशान किशनचा विचार होत नाहीय. ब्रेकसाठी म्हणून इशान किशनने सुट्टी घेतली होती. पण नंतर तो दुबईत पार्टी करताना दिसला होता.

IND vs ENG | इशानच्या मागून आलेल्या खेळाडूचा इंग्लंड विरुद्धच्या सामन्यासाठी टीममध्ये समावेश, BCCI ची घोषणा
Ishan kishan
Follow us on

IND vs ENG | भारत आणि इंग्लंडमध्ये येत्या 25 जानेवारीपासून टेस्ट सीरीज सुरु होणार आहे. प्रत्येक क्रिकेट चाहता या सीरीजची आतुरतेने वाट पाहतोय. यावेळी दोन्ही टीममध्ये 5 टेस्ट मॅचची सीरीज खेळली जाणार आहे. त्यामुळे प्रचंड उत्सुक्ता आहे. सीरीजसाठी इंग्लंडची टीम भारतात दाखल होणार आहे. टीम इंडिया सुद्धा लवकरच आपला ट्रेनिंग कॅम्प सुरु करणार आहे. या दरम्यान बातमी अशी आहे की, रिंकू सिंह सुद्धा इंग्लंडच्या टीम विरुद्ध खेळू शकतो. बीसीसीआयने ही घोषणा केली आहे. ‘इंडिया ए’ टीममध्ये रिंकूची एंट्री झाली आहे.

25 जानेवारीपासून हैदराबादमध्ये भारत-इंग्लंड दरम्यान पहिला कसोटी सामना सुरु होईल. या सीरीजसोबतच भारत आणि इंग्लंडमध्ये आणखी एक सीरीज चालणार आहे, जी आधीच सुरु झाली आहे. इंडिया ए आणि इंग्लंड लायन्स दरम्यान अनऑफिशियल टेस्ट मॅचची सीरीज सुरु झाली आहे. 17 जानेवारीला अहमदाबादमध्ये पहिला सामना सुरु झाला. या सीरीजमध्ये अजून दोन सामने होणार आहेत. त्यासाठी बीसीसीआयने स्क्वॉडची घोषणा केली आहे.

टीम इंडियाचा उदयोन्मुख स्टार संघात

बीसीसीआयच्या मेन्स सीनियर सिलेक्शन कमिटीने सीरीजच्या दुसऱ्या आणि तिसऱ्या मॅचसाठी शुक्रवारी 19 जानेवारीला स्क्वॉडची घोषणा केली. या दोन्ही मॅचसाठी टीमच नेतृत्व अभिमन्यु ईश्वरनच्या हातात राहील. आता आणखी काही खेळाडूंचा टीममध्ये समावेश करण्यात आलाय. यात रिंकू सिंह हे मोठ नाव आहे. टीम इंडियाच्या या आक्रमक फलंदाजाला तिसऱ्या सामन्यासाठी निवडण्यात आलय. अफगाणिस्तान विरुद्धच्या T20 सीरीजमध्ये दमदार प्रदर्शन केलं. त्यानंतर रिंकू उत्तर प्रदेशच्या टीमसोबत आहे. सध्या तो रणजी ट्रॉफीमध्ये खेळतोय.

आणखी कोणत्या प्लेयरचा टीममध्ये समावेश

रिंकूशिवाय वॉशिंग्टन सुंदर आणि तिलक वर्माची सुद्धा टीममध्ये एंट्री झाली आहे. सुंदर आणि तिलक दोन्ही मॅचसाठी उपलब्ध असतील. अर्शदीप सिंह आणि यश दयालची सुद्धा निवड करण्यात आली आहे. त्याशिवाय विकेटकीपर कुमार कुशाग्र आणि उपेंद्र यादवचा सुद्धा स्क्वॉडमध्ये समावेश करण्यात आला आहे. ध्रुव जुरैल आणि केएस भरत मुख्य टेस्ट सीरीजसाठी टीम इंडियासोबत असतील. दुसरा सामना 24 फेब्रुवारी आणि तिसरा सामना 1 फेब्रुवारीला सुरु होईल. अहमदाबादमध्येच हा सामना खेळला जाईल.

स्क्वॉड

दूसरी मॅच : अभिमन्यु ईश्वरन (कॅप्टन), साई सुदर्शन, रजत पाटीदार, सरफराज खान, तिलक वर्मा, कुमार कुशाग्र, वॉशिंगटन सुंदर, सौरभ कुमार, अर्शदीप सिंह, तुषार देशपांडे, विद्वत कवेरप्पा, उपेंद्र यादव आणि यश दयाल.

तिसरी मॅच : अभिमन्यु ईश्वरन (कॅप्टन), साई सुदर्शन, रजत पाटीदार, तिलक वर्मा, रिंकू सिंह, कुमार कुशाग्र, वॉशिंगटन सुंदर, शम्स मुलानी, अर्शदीप सिंह, तुषार देशपांडे, विद्वत कवेरप्पा, उपेंद्र यादव, आकाश दयाल आणि यश दयाल.