बांग्लादेशमध्ये भारताचा डंका, धमाकेदार विजय, 298 रन्स ठोकून कॅप्टन बनला हिरो

| Updated on: Dec 09, 2022 | 4:33 PM

टेस्ट मॅच एक डाव आणि 123 धावांनी जिंकली.

बांग्लादेशमध्ये भारताचा डंका, धमाकेदार विजय, 298 रन्स ठोकून कॅप्टन बनला हिरो
ind vs ban
Image Credit source: bcci twitter
Follow us on

ढाका: बांग्लादेश ए विरुद्ध दोन सामन्यांची अनधिकृत टेस्ट सीरीज इंडिया ए ने जिंकली आहे. इंडिया ए ने दुसरी अनधिकृत टेस्ट मॅच एक डाव आणि 123 धावांनी जिंकली. भारताने 562 धावांवर पहिला डाव घोषित केला. बांग्लादेश ए ची टीम दोन्ही डावात इंडिया ए ची धावसंख्या पार करु शकली नाही. पहिल्या डावात बांग्लादेश ए ची टीम 252 आणि दुसऱ्याडावात 187 धावांवर डाव आटोपला. इंडिया ए च्या विजयाचे हिरो कॅप्टन अभिमन्यु ईश्वरन, सौरभ कुमार आणि मुकेश कुमार राहिले.

अभिमन्यु ईश्वरन 157 धावांची इनिंग खेळला. मुकेश कुमारने पहिल्या डावात 6 विकेट काढल्या. दुसऱ्याडावात सौरभ कुमारने 6 विकेट काढल्या. त्याशिवाय सौरभ कुमार 55 धावांची इनिंग खेळला.

अभिमन्यु ईश्वरनच कमालीच प्रदर्शन

या टेस्ट सीरीजमध्ये अभिमनु ईश्वरनने कमालीची फलंदाजी केली. त्याने 149 च्या सरासरीने 2 इनिंग्समध्ये 298 धावा फटकावल्या. ईश्वरनने दोन्ही इनिंग्समध्ये शतक ठोकलं. त्याच्याशिवाय यशस्वी जैस्वालने 2 इनिंग्समध्ये 158 धावा फटकावल्या. अभिमन्यु ईश्वरनला बांग्लादेश विरुद्ध टेस्ट सीरीजमध्ये संधी मिळू शकते. रोहित शर्मा दुखापतीमुळे कसोटी मालिकेत खेळणार नसेल, तर त्याजागी ईश्वरनला टेस्ट स्क्वाडमध्ये संधी मिळू शकते.

सौरभ कुमारने दाखवला जलवा

बांग्लादेश ए विरुद्ध लेफ्ट आर्म स्पिनर सौरभ कुमारने कमालीची गोलंदाजी केली. त्याने 2 कसोटीत 15 विकेट घेतल्या. दोन इनिंग्समध्ये पाच विकेट घेण्यात यशस्वी ठरला. सौरभशिवाय मुकेश कुमारने 9 विकेट घेतल्यात. नवदीप सैनीने 6 विकेट काढल्या.