नवी दिल्ली : एसीसी वुमेन्स एमर्जिंग आशिया कप स्पर्धेत भारताच्या मुलींनी कमाल केली. हॉन्ग कॉन्गमध्ये ही टुर्नामेंट झाली. इंडिया-ए ने फायनलमध्ये बांग्लादेश-ए टीमवर मात केली. टीम इंडियाने पहिली बॅटिंग केली. त्यांनी 7 विकेटवर 127 धावा केल्या. प्रत्युत्तरात बांग्लादेशची टीम 96 रन्सवर ऑलआऊट झाली. टीम इंडियाच्या स्पिनर्सनी विजयाची स्क्रिप्ट लिहिली. श्रेयंका पाटिल आणि मन्नत कश्यपच्या फिरकीसमोर बांग्लादेशची टीम ढेपाळली.
श्रेयंका पाटिलने फायनलमध्ये 13 धावा देऊन बांग्लादेश-ए टीमच्या 4 विकेट काढल्या. तिने 13 पैकी 5 धावा वाइड चेंडूवर दिल्या. म्हणजे बांग्लादेश टीमने या ऑफ स्पिन्समोर बॅटने फक्त 8 धावा केल्या. फायनलमध्ये श्रेयंकाशिवाय डावखुरी फिरकी गोलंदाज मन्नत कश्यपने जबरदस्त गोलंदाजी केली. तिने 20 धावा देऊन 3 विकेट काढल्या. तितास साधुने एक विकेट काढला.
फायनलमध्ये काय झालं?
फायनलमध्ये टीम इंडियाची सुरुवात चांगली झाली नाही. कॅप्टन श्वेता सेहरावत 20 चेंडूत 13 धावा करुन नाहिदा अख्तरच्या चेंडूवर बोल्ड झाली. त्यानंतर छेत्री आणि दिनेश वृंदा चांगल्या इनिंग खेळल्या. छेत्रीने 22 चेंडूत 36 धावा केल्या. मिडल ऑर्डरमध्ये कनिका आहुजाने 23 चेंडूत नाबाद 30 धावा केल्या. त्यामुळे टीम इंडियाच्या 127 धावा झाल्या.
Jubilation for Team ??!
India ‘A’ women’s team secures the title in a dazzling display of skill, determination, and teamwork.
Congratulations to the promising young ✨ of Indian cricket! @BCCI #WomensEmergingTeamsAsiaCup #ACC pic.twitter.com/l07LBVEYt3— AsianCricketCouncil (@ACCMedia1) June 21, 2023
श्रेयंका पाटिलची जबरदस्त बॉलिंग
श्रेयंका पाटिल या टुर्नामेंटमध्ये बेस्ट खेळाडू ठरली. 20 वर्षाच्या या ऑफ स्पिनरने 2 मॅचमध्ये 9 विकेट घेतल्यात. श्रेयंकाने या दोन मॅचमध्ये फक्त 15 धावा दिल्या. हॉन्ग कॉन्ग विरुद्ध श्रेयंकाने 2 धावा देऊन 5 विकेट घेतल्या. फायनलमध्ये तिने 13 धावा देऊन 5 विकेट काढल्या.
5 WICKETS! India’s @shreyanka_patil announces herself on the international stage in a grand style ?#WomensEmergingTeamsAsiaCup #ACC pic.twitter.com/euK5Npz9nK
— FanCode (@FanCode) June 15, 2023
टीम इंडिया फक्त दोन मॅच खेळली
या टुर्नामेंटमध्ये टीम इंडिया फक्त एक लीग मॅच आणि त्यानंतर थेट फायनलमध्ये खेळली आहे. दोन लीग मॅच आणि सेमीफायनल पावसामुळे होऊ शकली नाही. टीम इंडियाने आपल्या दोन्ही सामन्यात सरस खेळ दाखवला. त्यामुळेच ते एमर्जिंग आशिया कपमध्ये चॅम्पियन बनले.