IND vs ENG : विराटची शतकाची प्रतिक्षा लांबली, ड्रेसिंग रुममध्ये परतताना विराट कमालीचा नाराज, पाहा PHOTO

| Updated on: Sep 05, 2021 | 7:13 PM

भारत आणि इंग्लंड यांच्यात चौथा कसोटी सामना ओव्हलच्या मैदानावर सुरु आहे. यामध्ये भारतीय फलंदाजानी उत्तम फलंदाजी केली आहे. पण कर्णधार विराट आजही शतकापासून दूरच राहिला.

IND vs ENG : विराटची शतकाची प्रतिक्षा लांबली, ड्रेसिंग रुममध्ये परतताना विराट कमालीचा नाराज, पाहा PHOTO
विराट कोहली
Follow us on

IND vs ENG : भारत आणि इंग्लंड (India vs England) यांच्यातील चौथा कसोटी सामना इंग्लंडमधील ओव्हलच्या मैदानात (Oval Test) सुरु आहे. या सामन्यात भारतीय फलंदाजानी दुसऱ्या डावात केलेल्या दमदार फलंदाजीमुळे भारत सामन्यात मजबूत स्थितीत आहे. भारताची इंग्लंडवरील आघाडी 270 च्या पार गेली असून यामध्ये छोटी पण महत्त्वाची भूमिका निभावणारा कर्णधार विराट कोहली (Virat Kohli) मात्र बाद झाल्यानंतर कमालीचा नाराज दिसून आला. अर्धशतकापासून अवघ्या 6 धावा दूर असताना विराट 44 धावांवर बाद झाला. मोईन अलीच्या चेंडूवर क्रेगने स्लीपमध्ये विराटची कॅच पकडली आणि पुन्हा एकदा विराट शतकापासून दूर राहिला.

भारतीय संघाचा कर्णधार विराट सध्याच्या घडीत जगातील सर्व क्रिकेट प्रकारात उत्तम आहे. सर्व प्रकारात 50 हून अधिक सरासरी असणारा एकमेव फलंदाज विराट मागील दोन वर्ष झालं शतक मात्र बनवू शकलेला नाही. नोव्हेंबर, 2019 मध्ये बांग्लादेश विरुद्ध अखेरचं शतक ठोकणारा विराट त्यानंतर एकदाही शतक ठोकू शकलेला नाही. इंग्लंड विरुद्धही केवळ अर्धशतकांपर्यंत पोहचणारा विराट चौथ्या कसोटीत दुसऱ्या डावातही शतक ठोकेल असे वाटत होते पण तो 44 धावांवर बाद झाला. त्यानंतर ड्रेसिंग रुममध्ये परतत असताना विराट कमालीचा नाराज दिसून आला त्याचे तसे फोटोही सोशल मीडियावर काही युजर्सनी अपलोड केले आहेत.

विराटच्या ‘फर्स्ट क्लास’ 10 हजार धावा

विराट कोहलीने इंग्लंडविरुद्धच्या चौथ्या कसोटीच्या दुसऱ्या डावात 44 धावा करत प्रथम श्रेणी कारकिर्दीत 10 हजार धावांचा टप्पा पार केला आहे. विराटने या सामन्यापूर्वी  प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये 127 सामन्यांत 9920 धावा केल्या होत्या. त्यानंतर या सामन्यात पहिल्या डावात 50 आणि दुसऱ्या डावात 44 धावा करत विराटने प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये 10 हजार धावा पूर्ण केल्या.

इतर बातम्या

IND vs ENG : आऊट झाल्यावर चुकीचं वागणं अंगाशी, ICC ने केएल राहुलला धडा शिकवला!

मॅचनंतर दादा ही कामं करायला सांगायचा, केबीसीच्या सेटवर सेहवाग-गांगुलीचा कलगीतुरा, बिग बी बघतच राहिले!

(India captain again missed his century Frustrated Virat kohli seen)