नवी दिल्ली : वर्षभरानंतर भारत-पाकिस्तानचे संघ पुन्हा एकदा आमने-सामने येणार आहेत. निमित्त आहे, वनडे वर्ल्ड कप 2023 टुर्नामेंटच. यंदाचा वनडे वर्ल्ड कप भारतात होतोय. त्यामुळे पाकिस्तानी टीम भारतात येईल. अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर येत्या 15 ऑक्टोबरला भारत-पाकिस्तानच्या टीम आमने-सामने येतील. वर्ल्ड कपमधील सर्वात रोमांचक सामना पाहायला मिळेल, अशी क्रिकेटप्रेमींना अपेक्षा आहे.
वनडे वर्ल्ड कपमध्ये टीम इंडियाचा पाकिस्तान विरुद्धचा आतापर्यंतचा रेकॉर्ड अजिंक्य आहे. 1992 पासून आतापर्यंत एकाही वनडे वर्ल्ड कपमध्ये पाकिस्तानला भारतावर विजय मिळवता आलेला नाही. अपवाद फक्त T20 वर्ल्ड कपचा. 2021 T20 वर्ल्ड कपमध्ये पहिल्यांदा पाकिस्तानी संघाने टीम इंडियावर विजय मिळवला. पण टीम इंडियाने लगेच पुढच्यावर्षी 2022 च्या T20 वर्ल्ड कपमध्ये पराभवाची सव्याज परतफेड केली.
वनडे वर्ल्ड कपआधी पाकिस्तानी टीम कधी भारतात आलेली?
2016 नंतर वनडे वर्ल्ड कपच्या निमित्ताने पाकिस्तानी टीम पुन्हा एकदा भारतात येणार आहे. त्यावेळी T20 वर्ल्ड कपसाठी पाकिस्तानी टीम भारतात आली होती. दोन्ही देशातील राजकीय तणावामुळे भारत-पाकिस्तानमध्ये क्रिकेट मालिका होत नाहीत. यंदा वनडे वर्ल्ड कपआधी भारत-पाकिस्तानचे संघ आशिया कपमध्ये आमने-सामने येतील.
चीड आणणार अब्दुल रझ्झाकच ते वक्तव्य काय?
पाकिस्तानचा माजी क्रिकेटपटू अब्दुल रझ्झाकने आता भारत-पाकिस्तान सामन्यासंदर्भात एक वक्तव्य केलं आहे. भारतीयांच्या मनात चीड निर्माण करणार वक्तव्य त्याने केलय. “भारत-पाकिस्तानच्या टीममध्ये परस्पराबद्दल आदर आणि मैत्रीची भावना आहे. 1997-98 पासून भारतीय टीम पाकिस्तान विरुद्ध खेळलेली नाही. कारण आपण नेहमीच चांगली कामगिरी केलीय आणि भारताचा नेहमीच पराभव झालाय. पण आता परिस्थिती बदलली आहे. आपण 2023 मध्ये आहोत. आपल्याला विचार बदलावे लागतील. कुठलीही टीम छोटी किंवा मोठी नाही. त्या दिवशी तुम्ही कशी कामगिरी करता? ते महत्वाच आहे” असं रझ्झाक म्हणाला. भारताचा नेहमीच पराभव होतो, म्हणून ते 1998 पासून पाकिस्तान विरुद्ध सीरीज खेळलेले नाहीत, असं रझ्झाकला म्हणायच आहे.
“दोन्ही टीम्स चांगल्या आहेत. पाकिस्तानची टीम कमकुवत आहे, असं तुम्हाला म्हणता येणार नाही. तुम्ही Ashes सीरीज पाहा. कुठली टीम जास्त चांगली आहे, हे तुम्ही सांगू शकता का?. जी टीम परफॉर्म करणार, ती जिंकणार. आपल्याला परस्पराविरुद्ध मॅचेस, सामने खेळावे लागतील” असं रझ्झाक म्हणाला.