मुंबई : आयसीसी टी-20 विश्वचषक 2021 (ICC T20 World Cup 2021) स्पर्धा सुरू होण्यास फक्त काही दिवस शिल्लक आहेत आणि त्याविषयीची चर्चा वाढू लागली आहे. विशेषत: भारत-पाकिस्तान (India vs Pakistan) सामन्याबद्दल मोठ्या प्रमाणात चर्चा सुरु आहे. साहजिकच, जेव्हा दोन्ही संघ केवळ विश्वचषकात खेळत आहेत आणि स्पर्धेच्या पहिल्याच सामन्यात एकमेकांसमोर येणार आहेत म्हटल्यावर चर्चा तर होणारच. त्यामुळे या सामन्याकडे सर्वांच्या नजरा लागलेल्या आहेत. दोन्ही देशांचे माजी क्रिकेटपटू हा सामना कोण जिंकणार यावर चर्चा करत आहेत. पाकिस्तानी तज्ज्ञांसाठी सध्या सर्वात चर्चेचा विषय म्हणजे त्यांचा संघ या वेळी विश्वचषकातील पराभवाची मालिका संपवू शकेल का? काही दिग्गजांनी पाकिस्तानच्या विजयाबाबत दावे केले आहेत, पण माजी वेगवान गोलंदाज आकिब जावेदने (Aaqib Javed) संघाला आणि त्या दिग्गजांना आरसा दाखवला आहे. (India don’t even need to peak, They can just play normally and beat Pakistan T20 World Cup : Aaqib Javed)
भारत आणि पाकिस्तान यांच्यात 24 ऑक्टोबर रोजी होणाऱ्या विश्वचषकातील सामन्याबाबत एका यूट्यूब चॅनेलवर झालेल्या चर्चेदरम्यान माजी अनुभवी गोलंदाज म्हणाला, “भारताला (जिंकण्यासाठी) सर्वोत्तम कामगिरी करण्याचीदेखील गरजही नाही. त्यांचा संघ सामान्य पद्धतीने आणि त्यांच्या ताकदीनुसार खेळला तरीही ते पाकिस्तानला हरवतील. पण जर पाकिस्तानला जिंकायचे असेल तर त्यांना त्या दिवशी त्यांच्या सर्वोत्तम क्रिकेटपेक्षाही चांगले खेळावे लागेल. त्यामुळे या क्षणी ते (भारत) या सामन्यातील फेवरेट आहेत.
टीम इंडियाच्या दिग्गज खेळाडूंबद्दल बोलताना जावेद म्हणाला की, भारताकडे अनेक मॅच विनर्स आहेत आणि ते विश्वचषक जिंकण्यासाठी प्रबळ दावेदार आहेत. माजी गोलंदाजाच्या मते, “भारताकडे विराट कोहली, रोहित शर्मा, हार्दिक पंड्या आणि केएल राहुलसारखे अनेक मॅचविनर आहेत. जसप्रीत बुमराह एक जबरदस्त गोलंदाज आहे. जर तुम्ही त्यांची संपूर्ण टीम पाहिली तर ते विश्वचषक जिंकण्याचे ते प्रबळ दावेदार आहेत. ”
जावेदने पाकिस्तानचा बचावही केला आणि म्हटले आहे की, पाकिस्तानला आपल्या संघात काही बदल करावे लागतील, ज्यामुळे संघ भारताविरुद्ध आणि विश्वचषकात विजय मिळवून देऊ शकेल. ते म्हणाले, “पाकिस्तानवर विजय मिळवण्यासाठी भारत फेवरेट असला तरी त्या दिवशी परिस्थिती वेगळी असू शकते. पाकिस्तानला जिंकायचे असेल तर त्यांना त्यांच्या संघात काही बदल करावे लागतील. उदाहरणार्थ, फखर जमानचा संघात समावेश करणे आवश्यक आहे, कारण काही खेळाडू नेहमी विशिष्ट संघांविरुद्ध चांगली कामगिरी करतात. दरम्यान, पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने जावेदचा सल्ला मानला आहे, असे चित्र दिसत आहे. कारण पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने नुकतीच पाकिस्तानी संघात फखर जमानच्या समावेशाची घोषणा केली आहे.
17 ऑक्टोबर ते 14 नोव्हेंबर दरम्यान होणाऱ्या या स्पर्धेसाठी सर्व संघ आपआपली रणनीती तयार करत असून काही संघानी आपल्या अंतिम खेळाडूंची घोषणाही केली आहे. सर्वात आधी 15 सदस्यीय संघाची घोषणा करणाऱ्या पाकिस्तान क्रिकेट संघाने (Pakistan Cricket) त्यांच्या संघात तीन बदल केले आहेत. यामध्ये एक बदल म्हणजे पाकिस्तानकडून एकदिवसीय सामन्यात दुहेरी शतक ठोकणारा एकमेव खेळाडू फखर जमान (Fakhar Zaman) याला राखीवमधून 15 सदस्यीय संघात जागा देण्यात आली आहे. याशिवाय संघाचा माजी कर्णधार सरफराज अहमद (Sarfaraz Ahmed) आणि हैदर अली (Haider Ali) यांनाही 15 सदस्यीय संघात जागा मिळाली आहे. सरफराज अहमद याला आजम खान आणि हैदर अलीला मोहम्मद हसनैन यांच्या जागेवर घेण्यात आलं आहे. तर फखर जमानला खुशदिल शाहच्या जागी खेळायची संधी मिळाली आहे. आता खुशदिल शाह राखीव खेळाडूंमध्ये असेल.
इतर बातम्या
T20 World Cup 2021 च्या दृष्टीने टीम इंडियाची मोठी घोषणा, 13 ऑक्टोबरला अवतरणार नव्या रुपात
(India don’t even need to peak, They can just play normally and beat Pakistan T20 World Cup : Aaqib Javed)