Virat Kohli: ऑस्ट्रेलियाच्या उपपंतप्रधानांना गिफ्टमध्ये मिळाली विराट कोहलीची अनमोल वस्तू

| Updated on: Oct 10, 2022 | 6:23 PM

भारतात कोणीही राइट यांना विसरणार नाही? असं परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर का म्हणाले?

Virat Kohli:  ऑस्ट्रेलियाच्या उपपंतप्रधानांना गिफ्टमध्ये मिळाली विराट कोहलीची अनमोल वस्तू
virat kohli
Image Credit source: twitter
Follow us on

मुंबई: भारताचे परराष्ट्र मंत्री डॉ. एस जयशंकर सध्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर आहेत. टीम इंडिया सुद्धा सध्या टी 20 वर्ल्ड कपसाठी ऑस्ट्रेलियामध्ये आहे. या दरम्यान जयशंकर यांनी ऑस्ट्रेलियाचे उपपंतप्रधानांना रिचर्ड मार्लेस यांना एक गिफ्ट दिलं आहे. या गिफ्टटच विराट कोहलीशी खास कनेक्शन आहे. हे गिफ्ट विराट कोहलीसाठी खूप खास आहे.

हा फोटो मोठ्या प्रमाणात व्हायरल होतोय

जयशंकर यांनी रिचर्ड यांना एक बॅट गिफ्ट केली आहे. या बॅटवर विराट कोहलीची स्वाक्षरी आहे. गिफ्ट देतानाचा हा फोटो मोठ्या प्रमाणात व्हायरल होतोय.

रिचर्ड मार्लेस जयशंकर यांना म्हणाले की, ‘अशा अनेक गोष्टी आहेत, ज्या आपल्याला जोडतात’ “क्रिकेटबद्दलच प्रेमही त्यापैकीच एक आहे. विराटची स्वाक्षरी असलेली बॅट स्वीकारताना आश्चर्याचा धक्का बसला. पण त्याचा आनंद आहे” असं मार्लेस म्हणाले.

न्यूझीलंडच्या दोन क्रिकेटर्सचे आभार

काही दिवसांपूर्वी जयशंकर न्यूझीलंड दौऱ्यावर गेले होते. त्यावेळी त्याने भारत-न्यूझीलंडमधील क्रिकेट संबंधांच कौतुक केलं होतं. त्यांनी न्यूझीलंडच्या दोन दिग्गज क्रिकेटपटूंचे आभार मानले होते.

राइट यांना विसरणार नाही

“भारत नेहमीच जॉन राइट आणि स्टीफन फ्लेमिंग यांचा आभारी राहील. भारतात कोणीही राइट यांना विसरणार नाही. आयपीएल पाहणारा कुठलाही फॅन फ्लेमिंगला विसरु शकत नाही” असं जयशंकर म्हणाले होते.

जॉन राइट यांच्या कोचिंगमध्येच टीम इंडिया 2003 च्या वर्ल्ड कप फायनलमध्ये पोहोचली होती. फ्लेमिंग यांच्या कोचिंमध्येच चेन्नई सुपर किंग्सने आयपीएलमध्ये अनेक विजेतेपद मिळवली.