IND Vs PAK: भारत-पाकिस्तान पुन्हा भिडणार, आशिया कपमध्ये किती वेळा येणार आमने-सामने?

| Updated on: Jan 06, 2023 | 2:48 PM

IND Vs PAK: आशिया कप कुठल्या फॉर्मेटमध्ये होणार? भारत-पाकिस्तान कुठल्या ग्रुपमध्ये असणार? त्याची माहिती समोर आलीय. आता पुन्हा एकदा भारत-पाकिस्तानमध्ये सामना निश्चित झालाय.

IND Vs PAK: भारत-पाकिस्तान पुन्हा भिडणार, आशिया कपमध्ये किती वेळा येणार आमने-सामने?
Ind vs pak
Image Credit source: GETTY IMAGES
Follow us on

मुंबई: क्रिकेट विश्वात नेहमीच काही सामन्यांची चर्चा होते. भारत-पाकिस्तान सामना यापैकीच एक. नेहमीच सर्वांना भारत-पाकिस्तान सामन्याची उत्सुक्ता असते. आशिया कप स्पर्धेत दोनवेळा दोन्ही टीम्स आमने-सामने आल्या. T20 वर्ल्ड कप 2022 मध्ये दोन्ही टीम्समध्ये सामना झाला. आता पुन्हा एकदा भारत-पाकिस्तानमध्ये सामना निश्चित झालाय. आशिया कप 2023 मध्ये दोन्ही टीम्स आमने-सामने येतील.

गुरुवारी आशियाई क्रिकेट काऊन्सिलने मोठी घोषणा केली. टुर्नामेंटचा फॉर्मेट आणि ग्रुप्स जाहीर झाले. आशिया कपमध्ये एकूण 6 टीम्स सहभागी होतील. त्यांची दोन ग्रुप्समध्ये विभागणी करण्यात आलीय. भारत आणि पाकिस्तानची टीम एकाच ग्रुपमध्ये आहे. आशिया क्रिकेट काऊन्सिलचे अध्यक्ष जय शाह यांनी गुरुवारी टि्वट करुन ही माहिती दिली.


टीम्सची दोन ग्रुप्समध्ये विभागणी

आशिया कपच आयोजन सप्टेंबरमध्ये होणार आहे. एकूण 6 संघ या टुर्नामेंटमध्ये खेळताना दिसतील. यावेळी टुर्नामेंट वनडे फॉर्मेटमध्ये होईल. टीम्सची दोन ग्रुप्समध्ये विभागणी करण्यात आलीय. एसीसी बनवलेल्या फॉर्मेटनुसार, भारत-पाकिस्तानचा सामना निश्चित आहे.

भारत-पाकिस्तान सामना निश्चित

भारत आणि पाकिस्तानची टीम ग्रुप 1 मध्ये आहे. श्रीलंकेची टीम सुद्धा याच ग्रुपमध्ये आहे. ग्रुप 2 मध्ये अफगाणिस्तान, बांग्लादेशचे संघ आहेत. यात एका क्वालिफायर टीमचा सुद्धा समावेश होईल. लीग स्टेजमध्ये एकूण 6 सामने खेळले जातील. लीग स्टेजनंतर सुपर-4 राऊंड असेल. भारत, श्रीलंका आणि पाकिस्तानमधील कुठल्या एका टीमचा प्रवास ग्रुप स्टेजमध्येच संपेल. सुपर 4 राऊंडमध्ये एकूण 6 सामने आहेत. त्यानंतर दोन टीम्स फायनलमध्ये प्रवेश करतील. आशिया कपमध्ये एकूण 13 सामने खेळले जातील.