अमेरिकेत सुरु असलेल्या टी 20 विश्वचषक स्पर्धेतील सर्वाचे लक्ष लागून असलेला भारत पाकिस्तान सामना रविवारी झाला. या सामन्याचे तिकीट मिळवण्यासाठी चाहत्यांनी प्रयत्नांची पराकाष्ठा केली. विश्वचषक स्पर्धेत भारत-पाकिस्तानमधील या सामन्याचे तिकीट प्रचंड महाग झाले होते. Stubhub पप वर पुनर्विक्री करताना एका तिकिटाची किंमत 174,400 US डॉलर म्हणजेच अंदाजे 1.46 कोटी रुपये गेली होती. पाकिस्तानमधील एका चाहत्याने महाग तिकीट विकत घेतले. त्यासाठी त्याने आपले टॅक्टर विकले. परंतु पाकिस्तानचा पराभव झाल्यानंतर तो प्रचंड नाराज झाला. पाकिस्तानी संघाला चार खडेबोल त्याने सुनावले.
भारत आणि पाकिस्तानमधील रविवारी झालेल्या सामन्यात भारताने प्रथम फलंदाजी करत 119 धावा केल्या. पाकिस्तानसमोर120 धावांचे आव्हान फारसे अवघड नव्हते. तसेच 14 व्या षटकापर्यंत पाकिस्तान संघाची परिस्थिती मजबूत होती. त्यावेळी भारतीय चाहते निराश होते. परंतु त्यानंतर भारतीय गोलंदाजांनी कमाल केली आणि सामना भारताच्या बाजूने आला. भारताने या सामन्यात सहा धावांनी विजय मिळवला. पाकिस्तानच्या या पराभवानंतर पाकिस्तान समर्थक नाराज झाले.
एक पाकिस्तानी समर्थकाने म्हटले की, मी 3000 डॉलर (जवळपास अडीच लाख रुपये) तिकीट घेतले. हे तिकीट घेण्यासाठी माझे टॅक्ट्रर विकले. भारताची धावसंख्या पाहिल्यानंतर आम्हाला आमच्या संघाचा विजय निश्चित वाटत होता. सामना पूर्ण आमच्या हातात होता. परंतु बाबर आजम बाद झाल्यानंतर पाकिस्तानी चाहते निराश झाले. मी भारतीय संघाचे विजयाबद्दल अभिनंदन करतो. परंतु पाकिस्तानी संघाच्या पराभवामुळे मी खूप निराश झालो आहे. पाकिस्तानी चाहता बोलत असताना भारतीय संघाचे चाहते घोषणा देत होते. भारताच्या विजयाचा जल्लोष करत होते.
#WATCH | After India beat Pakistan by 6 runs in ICC T20 World Cup 2024 at Nassau County International Cricket Stadium, New York, a Pakistan cricket team supporter says, "I have sold my tractor to get a ticket worth $ 3000. When we saw the score of India, we didn't think that we… pic.twitter.com/HNrP15MQbZ
— ANI (@ANI) June 9, 2024
भारतीय गोलंदाज जसप्रीत बुमराहने 15 व्या षटकात सामना फिरवला. बुमराहने सेट झालेल्या रिजवान याला बोल्ड करुन पाकिस्तानला जोरदार धक्का दिला. त्यानंतर अक्षर पटेल आणि हार्दिक पांड्या यांनीही पाकिस्तानी फलंदाजांना तंबूचा रस्ता दाखवला. यामुळे पाकिस्तानी सहा धावांनी पराभूत झाला.