IND vs NZ 3rd T20 : भारतीय प्लेइंग 11 मध्ये उमरान, पृथ्वीला मिळू शकते संधी, असं बनू शकतं समीकरण

| Updated on: Feb 01, 2023 | 3:06 PM

IND vs NZ 3rd T20 : आजचा सामना निर्णायक असेल. मॅच जिंकणारा संघ सीरीजही जिंकेल. नरेंद्र मोदी स्टेडियमवर भारताने आपला शेवटचा T20 सामना मार्च 2021 मध्ये इंग्लंड विरुद्ध खेळला होता.

IND vs NZ 3rd T20 : भारतीय प्लेइंग 11 मध्ये उमरान, पृथ्वीला मिळू शकते संधी, असं बनू शकतं समीकरण
umran-Malik
Image Credit source: PTI
Follow us on

India Predicted XI vs NZ 3rd T20I : तिसरा T20 सामना अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये खेळला जाणार आहे. सध्या सीरीजमध्ये दोन्ही टीम्स 1-1 अशा बरोबरीत आहेत. आजचा सामना निर्णायक असेल. मॅच जिंकणारा संघ सीरीजही जिंकेल. नरेंद्र मोदी स्टेडियमवर भारताने आपला शेवटचा T20 सामना मार्च 2021 मध्ये इंग्लंड विरुद्ध खेळला होता. यात भारताने विजय मिळवला होता. भारताने त्या मॅचमध्ये 224 धावा केल्या होत्या. आज तिसऱ्या टी 20 सामन्यात अहमदाबादच्या पीचवर धावांचा पाऊस पडेल. दुसऱ्याबाजूला सगळ्यांची नजर भारताच्या प्लेइंग 11 वर असेल. पृथ्वी शॉ आणि उमरान मलिक यांना प्लेइंग 11 मध्ये संधी मिळते का ? त्याची क्रिकेट चाहत्यांना उत्सुक्ता आहे.

शुभमन गिलच्या जागी पृथ्वी शॉ ला संधी

शुभमन गिल चालू टी 20 सीरीजमध्ये विशेष कमाल दाखवू शकलेला नाही. त्याच्याजागी पृथ्वी शॉ ला शेवटच्या टी 20 सामन्यात संधी मिळू शकते. इशान किशनचा परफॉर्मन्सही खास नाहीय. पण विकेटकीपर म्हणून त्याला संधी मिळू शकते. शुभमनच्या जागी पृथ्वी ला प्लेइंग 11 मध्ये संधी मिळू शकते.

अर्शदीपच्या जागी उमरान ?

दुसऱ्या समीकरणानुसार, उमरान मलिकला प्लेइंग 11 मध्ये संधी मिळू शकते. अर्शदीपला बाहेर बेंचवर बसाव लागेल. अर्शदीपने या सीरीजमध्ये खास परफॉर्मन्स केलेला नाही. टीम मॅनेजमेंट उमरानच्या स्पीडवर विश्वास ठेवू शकते. त्याला अखेरच्या टी 20 मध्ये संधी मिळू शकते. त्याशिवाय भारताच्या प्लेइंग 11 मध्ये फार बदल होण्याची शक्यता नाहीय.

अशी असू शकते भारताची प्लेइंग इलेव्हन

इशान किशन, पृथ्वी शॉ/ शुभमन गिल, सूर्यकुमार यादव, राहुल त्रिपाठी, दीपक हुड्डा, हार्दिक पंड्या (कॅप्टन), वाशिंग्टन सुंदर, कुलदीप यादव, युजवेंद्र चहल, उमरान मलिक, शिवम मावी

भारतीय टीम : हार्दिक पंड्या (कॅप्टन), सूर्यकुमार यादव, इशान किशन, शुभमन गिल, पृथ्वी शॉ, दीपक हुड्डा, राहुल त्रिपाठी, जितेश शर्मा, वाशिंगटन सुंदर, कुलदीप यादव, युजवेंद्र चहल, अर्शदीप सिंह, उमरान मलिक, शिवम मावी आणि मुकेश कुमार

न्यूजीलंड: मिचेल सँटनर (कॅप्टन), फिन एलेन, मायकल ब्रेसवेल, मार्क चॅपमॅन, डेवोन कॉनवे, डेन क्लीवर, जेकब डफी, लॉकी फर्ग्युसन, बेंजामिन लिस्टर, डेरिल मिशेल, ग्लेन फिलिप्स, माइकल रिपन, हेनरी शिपले, इश सोढ़ी आणि ब्लेयर टिकनर