IND vs AUS Test : भारताने ऑस्ट्रेलिया विरुद्ध चार सामन्यांच्या टेस्ट सीरीजमध्ये 2-0 अशी आघाडी घेतली आहे. आता 1 मार्चपासून इंदोरमध्ये दोन्ही टीम्समध्ये तिसरा कसोटी सामना सुरु होणार आहे. तिसरी कसोटी जिंकून टेस्ट सीरीज जिंकण्याचा टीम इंडियाचा प्रयत्न असेल. या मालिका विजयामुळे टीम इंडियाची वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या फायनलमध्ये एंट्री होऊ शकते. बीसीसीआयने ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या उर्वरित दोन टेस्ट मॅचसाठी भारतीय टीमची घोषणा केली आहे.
बोर्डाने विनिंग टीम कायम ठेवली आहे. पण बोर्डाने उपकर्णधाराच्या नावाची घोषणा केलेली नाही. काही मीडिया रिपोर्ट्सनुसार, व्हाइस कॅप्टन कोण असेल? त्याचा निर्णय कॅप्टन रोहित शर्मावर सोडण्यात आला आहे. केएल राहुलला उपकर्णधार पदावरुन हटवण्यात आलं आहे. आता व्हाइस कॅप्टनशिपबद्दल माजी भारतीय हेड कोच रवी शास्त्री यांनी मोठं विधान केलं आहे.
राहुल बद्दल मॅनेजमेंटला कल्पना
भारताला उपकर्णधाराची आवश्यकता नाही, असं माजी भारतीय दिग्गज रवी शास्त्री यांनी म्हटलं आहे. “देशांतर्गत सीरीजसाठी भारताला कुठल्याही उपकर्णधाराची आवश्यकता नाही. मॅनेजमेंटला राहुलचा फॉर्म माहित आहे. त्याच्या मानसिक स्थितीची सुद्धा कल्पना आहे” असं रवी शास्त्री आयसीसीच्या रिव्यू पॉडकास्टमध्ये म्हणाले.
स्थिती किचकट बनवू नये
“शुभमन गिल सारख्या फलंदाजाला कशी संधी द्यायची, ते मॅनेजमेंटला कळतं. भारताला देशांतर्गत सीरीजसाठी उपकर्णधार निवडण्याची गरज नाही. कॅप्टनसाठी मैदानावर सर्व खेळाडू एकसमान असेल पाहिजेत. कोणाला उपकर्णधार बनवून गोष्टी अधिक किचकट करु नयेत. उपकर्णधाराच प्रदर्शन चांगलं नसेल, तर कोणीही त्याची जागा घेऊ शकतो. कमीत कमी उपकर्णधाराचा टॅग तर नसेल, परदेश दौऱ्यात गोष्ट वेगळी असतें” असं रवी शास्त्री म्हणाले.
टॅलेंटच सर्वकाही नाही
केएल राहुल टॅलेंटेड खेळाडू असल्याचं रवी शास्त्री यांनी मान्य केलं. त्याने आपल्या छोट्या स्कोरला मोठ्या इनिंगमध्ये बदललं पाहिजे. “टॅलेंटच सर्वकाही नसतं. सातत्य असणं आवश्यक आहे. अनेक टॅलेंटेड प्लेयर्स टीम इंडियाच्या दरवाजावर आहेत. ही राहुलची गोष्ट नाही. मीडिल ऑर्डर आणि गोलंदाजीमध्ये सुद्धा टॅलेंटेड खेळाडू येत आहेत” असं रवी शास्त्री म्हणाले.