जोहान्सबर्ग: भारताच्या कसोटी संघाचा कर्णधार विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली टीम इंडिया दक्षिण आफ्रिकेविरुद्ध तीन कसोटी सामन्यांची मालिका खेळण्यासाठी गुरुवारी जोहान्सबर्गमध्ये दाखल झाली आहे. बीसीसीआयने शुक्रवारी सोशल मीडियावर एक व्हिडिओ पोस्ट करुन भारतीय संघाबाबत अपडेट दिली. मुंबई-जोहान्सबर्ग विमान प्रवासातील गमती-जमतीचा व्हिडिओ टि्वटरवर पोस्ट केला आहे. यामध्ये कर्णधार विराट कोहलीसह सर्वच खेळाडू चांगल्या मूडमध्ये मजा, मस्करी करताना दिसत आहेत.
बीसीसीआय आणि कोहलीमध्ये वाद सुरु असले, तरी त्याची छाया संघावर पडलेली नाही. सध्या कोरोना काळ सुरु असला, तरी दक्षिण आफ्रिकेत हॉटेलवर दाखल झाल्यानंतर भारतीय संघाचं पारंपारिक आफ्रिकन पद्धतीने नृत्याच्या तालावर स्वागत करण्यात आलं. विराट कोहलीने विमान प्रवासात इशांत शर्माची चांगलीच फिरकी घेतली. सूटकेस सोबत असेल, तर इशांत जगात कुठेही प्रवास करण्यासाठी तयार आहे असे विराट या व्हिडिओमध्ये म्हणताना दिसतो. त्यावर इशांतने सकाळी, सकाळी हे काम करु नकोस, असे त्याला सांगितले.
कोहली-इशांतशिवाय मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड आणि श्रेयस अय्यरही हास्य विनोदात रमल्याचे व्हिडिओसमध्ये दिसले. दक्षिण आफिकेचा महत्त्वाचा दौरा समोर असताना भारतीय संघाला सध्या वादांनी घेरलं आहे. आधी रोहित आणि विराटमध्ये मतभेद असल्याच्या बातम्या आल्या. आता बीसीसीआय अध्यक्ष सौरव गांगुली आणि विराटमध्ये तणाव निर्माण झाला आहे. विराटच्या स्फोटक पत्रकार परिषदेनंतर दादा आणि विराटमध्ये नेमकं खरं कोण बोलतय, असा प्रश्न निर्माण झाला आहे.
From Mumbai to Jo’Burg! ? ?
Capturing #TeamIndia‘s journey to South Africa ?? ✈️ ?? – By @28anand
Watch the full video ? ? #SAvINDhttps://t.co/dJ4eTuyCz5 pic.twitter.com/F0qCR0DvoF
— BCCI (@BCCI) December 17, 2021
निवड समितीने वनडेच्या कर्णधारपदावरुन विराटला हटवून त्याच्याजागी रोहितची निवड केल्यापासून हा सर्व वाद सुरु झालाय. विराटने टी-20 चे कर्णधारपद सोडताना वनडे आणि कसोटी संघाच्या कर्णधारपदी कायम राहण्याची इच्छा बोलून दाखवली होती. पण मर्यादीत षटकांच्या क्रिकेटमध्ये दोन वेगवेगळे कर्णधार नको, अशी निवड समितीची भूमिका असल्याने विराटच्या जागी रोहितची नेमणूक करण्यात आली. विराट आता कसोटी संघाचा कर्णधार आहे. रोहित शर्मा दुखापतीमुळे जायबंदी झाल्याने आफ्रिके विरुद्धच्या तीन कसोटी सामन्यांच्या मालिकेला मुकणार आहे. त्याच्याजागी प्रियांक पांचाळची संघात निवड करण्यात आली आहे.
संबंधित बातम्या:
विराट कोहलीच्या स्फोटक वक्तव्यांवर अखेर सौरव गांगुलीने सोडलं मौन
Ashes 2021: हवेत झेपावून बटलरची सुपरमॅन कॅच, हा VIDEO नक्की पाहा
विराट, गेलला जमलं नाही, ते पाकिस्तानच्या मोहम्मद रिजवानने करुन दाखवलं, बाबर म्हणाला….