India Squad NZ Series: हार्दिक पंड्या टी 20 टीमचा कॅप्टन

| Updated on: Oct 31, 2022 | 7:02 PM

India Squad NZ Series: आगामी टी 20 आणि वनडे सीरीजसाठी कशी आहे टीम, कोणाला मिळाली संधी? जाणून घ्या सर्व डिटेल्स

India Squad NZ Series: हार्दिक पंड्या टी 20 टीमचा कॅप्टन
Hardik Pandya
Image Credit source: social
Follow us on

मुंबई: रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली टीम इंडिया सध्या ऑस्ट्रेलियात टी 20 वर्ल्ड कपमध्ये खेळत आहे. तिथे टीम इंडियाने 3 पैकी 2 सामने जिंकलेत. टी 20 वर्ल्ड कप संपल्यानंतर टीम इंडिया न्यूझीलंड दौऱ्यावर जाणार आहे. न्यूझीलंड विरुद्ध टीम इंडिया टी 20 आणि वनडे सीरीज खेळणार आहे. टीम इंडिया टी 20 चे तीन आणि तीन वनडे सामने खेळणार आहे.

कोणाला दिली विश्रांती?

न्यूझीलंडनंतर टीम इंडिया बांग्लादेश विरुद्ध वनडे आणि टेस्ट सीरीज खेळणार आहे. दोन्ही दौऱ्यांसाठी टीम इंडिया जाहीर झाली आहे. चेतन शर्मा यांनी टीमची घोषणा केली. न्यूझीलंडमधील टी 20 सीरीजसाठी हार्दिक पंड्याला कॅप्टन बनवण्यात आलं आहे. रोहित शर्मा, विराट कोहली आणि केएल राहुलला न्यूझीलंड सीरीजसाठी विश्रांती देण्यात येणार आहे.

न्यूजीलंड टी20 सीरीजसाठी टीम- हार्दिक पंड्या (कॅप्टन), ऋषभ पंत (उपकर्णधार), शुभमन गिल, इशान किशन, दीपक हुड्डा, सूर्यकुमार यादव, श्रेयस अय्यर, संजू सॅमसन, वॉशिंगटन सुंदर, युजवेंद्र चहल, कुलदीप यादव, अर्शदीप सिंह, हर्षल पटेल, मोहम्मद सिराज, भुवनेश्वर कुमार आणि उमरान मलिक

न्यूजीलंड वनडे सीरीजसाठी टीम- शिखर धवन (कॅप्टन), ऋषभ पंत (उपकर्णधार), शुभमन गिल, दीपक हुड्डा, सूर्यकुमार यादव, श्रेयस अय्यर, संजू सॅमसन, वॉशिंगटन सुंदर, शार्दुल ठाकुर, शाहबाज अहमद, युजवेंद्र चहल, कुलदीप यादव, अर्शदीप सिंह, दीपक चाहर, कुलदीप सेन आणि उमरान मलिक.

बांग्लादेश वनडे सीरीजसाठी टीम: रोहित शर्मा (कॅप्टन), केएल राहुल, शिखर धवन, विराट कोहली, रजत पाटीदार, श्रेयस अय्यर, राहुल त्रिपाठी, ऋषभ पंत, इशान किशन, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, वॉशिंगटन सुंदर, शार्दुल ठाकुर, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज, दीपक चाहर, यश दयाल

बांग्लादेश टेस्ट सीरीजसाठी टीम: रोहित शर्मा (कॅप्टन), केएल राहुल, शुभमन गिल, चेतेश्वर पुजारा, विराट कोहली, श्रेयस अय्यर, ऋषभ पंत, केएस भरत, आर अश्विन, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, कुलदीप यादव, शार्दुल ठाकुर, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज आणि उमेश यादव.