IND vs SL: विराटच्या अनुपस्थितीत ‘या’ खेळाडूला टीम इंडियाकडून दीर्घकाळ खेळण्याची मिळू शकते संधी

| Updated on: Dec 27, 2022 | 6:38 PM

IND vs SL: अखेर त्याचे दिवस बदलणार, सातत्याने त्याच्यावर अन्याय होत असल्याची ओरड सुरु होती, कोण आहे तो?

IND vs SL: विराटच्या अनुपस्थितीत या खेळाडूला टीम इंडियाकडून दीर्घकाळ खेळण्याची मिळू शकते संधी
Virat Kohli
Image Credit source: Getty Images
Follow us on

मुंबई: क्रिकेटच्या तीन प्रकारात T20 फॉर्मेटमध्ये टीम इंडियाचा चेहरा-मोहरा बदललेला दिसू शकतो. T20 मध्ये रोहित शर्मा आणि विराट कोहली यांना यापुढे संधी मिळण्याची शक्यता कमी आहे. त्यामुळे त्यांच्याजागी काही युवा खेळाडूंना संधी मिळू शकते. टीम इंडियात सातत्याने आत-बाहेर करणाऱ्या संजू सॅमसनला दीर्घकाळ खेळण्याची संधी मिळू शकते. केरळच्या कॅप्टनला व्हाइट बॉल फॉर्मेटमध्ये दीर्घकाळ संधी मिळाली पाहिजे, असा बीसीसीआय आणि मावळत्या निवड समितीचा विचार आहे.

वनडे टीममध्ये संधी कमी

संजू सॅमसनला वनडे टीममध्ये स्थान मिळण्याची शक्यता कमी आहे. पण T20 मध्ये त्याचा प्रामुख्याने विचार होऊ शकतो. श्रीलंका आणि न्यूझीलंड विरुद्धच्या सीरीजसाठी संजू सॅमसनची टीम इंडियात निवड होऊ शकते.

संजूला कशी संधी मिळेल?

संजू सॅमसनला मर्यादीत संधी मिळाल्या. त्यात त्याने चांगल्या धावा केल्या. पण तरीही त्याच्याकडे दुर्लक्ष करण्यात आलं. कसोटीमध्ये ऋषभ पंतला विकेटकीपर म्हणून पहिली पसंती आहे. वनडेमध्ये केएल राहुल विकेटकीपिंगची जबाबदारी संभाळतोय. त्यामुळे टी 20 मध्ये संजूला त्याचं स्थान भक्कम करण्याची संधी आहे.

आता ते सिलेक्टर्स ठरवतील

“संजू सॅमसन टॅलेंटेड क्रिकेटर आहे. बॅटिंग ऑर्डरमध्ये तो सहजतेने कुठेही फिट होऊ शकतो. त्याने त्याच्याबाजूने शक्य असेल, ते सर्व केलय. त्याला दीर्घकाळ संधी मिळाली पाहिजे. पण दोन अन्य क्रिकेटर्सही चांगली कामगिरी करतायत. कसोटीमध्ये ऋषभ पहिली पसंत आहे. पण योग्य खेळाडूंना संधी मिळाली पाहिजे. यावर टीम मॅनेजमेंटला निर्णय घ्यायचा आहे. संजूला दीर्घकाळ कशी संधी मिळेल? ते सिलेक्टर्स ठरवतील” इनसाइड स्पोर्टने सूत्रांच्या हवाल्याने हे वृत्त दिलय.

सिलेक्टर्सना संजूकडून एकच अपेक्षा

सिलेक्टर्सना संजूकडून सातत्यपूर्ण कामगिरीची अपेक्षा आहे. टीम इंडियाचा माजी सलामीवीर वसिम जाफरने सुद्धा संजू सॅमसनला दीर्घकाळ संधी देण्याची मागणी केलीय. आतापर्यंत अनेकदा संजूवर अन्याय झाल्याचा मुद्दा उपस्थित झालाय. चाहत्यांनी आक्रमकपणे संजूची बाजू मांडलीय.