मुंबई: भारतात अनेक प्रतिभावान युवा खेळाडू आहेत. त्यामुळे टीम निवडताना निवड समितीचा कस लागतो. टीम निवडताना एखाद-दुसऱ्या खेळाडूला बाहेर ठेवण्याचा कठीण निर्णय घ्यावा लागतो. हा खेळाडू टॅलेंटमध्ये इतरांपेक्षा कुठे कमी असतो, असं नाहीय. पण टीममध्ये त्याची जागा बनत नाही. अशावेळी त्या खेळाडूबद्दल चर्चा होणं स्वाभाविक आहे. काल श्रीलंकेविरुद्धच्या वनडे आणि टी 20 सीरीजसाठी टीम निवडण्यात आली. पण त्यात पृथ्वी शॉ च नाव नव्हतं.
पृथ्वीने तो मेसेज पोस्ट केला?
मुंबईच्या या युवा प्रतिभावान खेळाडूकडून भरपूर अपेक्षा आहेत. पृथ्वीची निदान यावेळी निवड होईल, असं सर्वांना वाटत होतं. पण असं घडलं नाही. टीममध्ये त्याचं नाव नव्हतं. सिलेक्टर्सनी पुन्हा एकदा पृथ्वी शॉकडे दुर्लक्ष केलं. पृथ्वी शॉ शेवटचा जुलै 2021 मध्ये टीम इंडियामधून खेळला होता. संघ जाहीर झाल्यानंतर पृथ्वीने इन्स्टाग्रामवर गौर गोपाल दास यांचे शब्द पोस्ट केलेत.
पृथ्वीला म्हणून निवडलं नसेल
सिलेक्टर्स सातत्याने पृथ्वी शॉकडे दुर्लक्ष करतायत. जुलै 2021 मध्ये पृथ्वी श्रीलंकेविरुद्ध सामना खेळला. देशांतर्गत क्रिकेटमध्ये पृथ्वी चांगली कामगिरी करतोय. सलामीच्या जागेसाठी तो चांगला पर्याय आहे. पण सध्या इशान किशन आणि शुभमन गिल दोघेही चांगल्या फॉर्ममध्ये आहेत. त्यांनी मिळालेल्या संधीच सोन केलय. त्यामुळे यावेळी कदाचित निवड समितीने पृथ्वीकडे पुन्हा दुर्लक्ष केलं असेल.
देशांतर्गत स्पर्धेत कशी आहे पृथ्वीची कामगिरी?
पृथ्वी शॉ सध्या रणजी सामन्यांमध्ये खेळतोय. त्याने या स्पर्धेत अजून अपेक्षित कामगिरी केलेली नाही. त्याने चार इनिंग्समध्ये फक्त 42 धावा केल्यात. विजय हजारे ट्रॉफीमध्ये पृथ्वीने सात इनिंगमध्ये 217 धावा केल्या आहेत. त्याने दोन हाफ सेंच्युरी झळकवलीत. सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीमध्ये पृथ्वीने 10 सामन्यात 332 धावा केल्यात.