India T20 WC Squad: ‘या’ तारखेला मुंबईत टी 20 वर्ल्ड कपसाठी भारतीय संघ निवडणार, प्रमुख खेळाडूबद्दल प्रश्नचिन्ह

| Updated on: Aug 20, 2022 | 10:43 AM

India T20 WC Squad: सध्या भारतीय संघ झिम्बाब्वे (IND vs ZIM) मध्ये वनडे मालिका खेळत आहे. त्यानंतर आशिया कप (Asia cup) टी 20 स्पर्धेला सुरुवात होणार आहे.

India T20 WC Squad: या तारखेला मुंबईत टी 20 वर्ल्ड कपसाठी भारतीय संघ निवडणार, प्रमुख खेळाडूबद्दल प्रश्नचिन्ह
team india
Image Credit source: twitter
Follow us on

मुंबई: यावर्षी ऑक्टोबर-नोव्हेंबर मध्ये ऑस्ट्रेलियात टी 20 वर्ल्ड कप (T20 World cup) स्पर्धा होणार आहे. हाच वर्ल्ड कप डोळ्यासमोर ठेवून जागतिक क्रिकेट मधील सर्व संघ तयारी करत आहेत. भारतीय संघाने म्हणूनच टी 20 मालिकांवर जास्तीत जास्त लक्ष केंद्रीत केलं आहे. सध्या भारतीय संघ झिम्बाब्वे (IND vs ZIM) मध्ये वनडे मालिका खेळत आहे. त्यानंतर आशिया कप (Asia cup) टी 20 स्पर्धेला सुरुवात होणार आहे. टी 20 वर्ल्ड कप आधी सुद्धा भारतीय संघ काही मालिका खेळणार आहे. आशिया कप मध्ये खेळणारा भारतीय संघ काही बदलांसह ऑस्ट्रेलियात टी 20 वर्ल्ड कप खेळताना दिसू शकतो. 80 ते 90 टक्के टीम निश्चित ठरली आहे, असं विधान नियमित कर्णधार रोहित शर्माने नुकतच केलं. फक्त जास्तीत जास्त आणखी 3 ते 4 बदल होऊ शकतात, असं रोहित म्हणाला.

वर्ल्ड कपसाठी संघ निवडीची तारीख ठरली

भारतीय संघ सध्या वेगवेगळ्या आंतरराष्ट्रीय मालिकांमध्ये व्यस्त आहे. भारतीय संघ अती क्रिकेट खेळतोय, असं वाटू शकतं. पण बेंच स्ट्रेंथ मजबूत करण्याचाही त्यामागे उद्देश आहे. त्यामुळे अनेक नवोदीत खेळाडूंना सध्या संघात संधी मिळत आहे. ऑस्ट्रेलियात होणाऱ्या टी 20 वर्ल्ड कपसाठी संघ निवडीची तारीख ठरली आहे. पुढच्या महिन्यात 15 सप्टेंबरला टी 20 वर्ल्ड कपसाठी भारतीय संघ निवडला जाईल. वर्ल्ड कपचा संघ निवडण्यासाठी राष्ट्रीय निवडकर्त्यांची मुंबई मध्ये बैठक होईल.

जसप्रीत बुमराह वर्ल्ड कप मध्ये खेळणार?

आशिया कप स्पर्धेची फायनलही सप्टेंबर महिन्यात खेळली जाणार आहे. रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाची आशिया कप स्पर्धेतील कामगिरी निवड समिती सदस्य पाहतील, फायनल नंतर चार दिवसांनी संघ निवडला जाईल. आशिया कपची फायनल 11 सप्टेंबरला आहे. त्यामुळे खेळाडू आणि सपोर्ट् स्टाफ यूएईवरुन मायदेशी परतल्यानंतर टी 20 वर्ल्ड कपसाठी संघ निवडला जाईल. वर्ल्ड कप मध्ये भारताचा सलामीचा सामना 23 ऑक्टोबरला पाकिस्तान विरुद्ध होईल. भारताचा प्रमुख गोलंदाज जसप्रीत बुमराह सध्या पाठिच्या दुखण्याने त्रस्त आहे. त्याच्या वर्ल्ड कप मधील सहभागावर प्रश्नचिन्ह आहे. त्यामुळे मोहम्मद शमीच्या नावाचा टी 20 वर्ल्ड कपसाठी विचार होऊ शकतो.