डरबन: भारताच्या अंडर 19 महिला टीमने दक्षिण आफ्रिकेविरुद्ध चौथा T20 सामना जिंकला. या विजयासह भारतीय महिला टीमने 5 टी 20 सामन्यांची सीरीज जिंकली आहे. मालिकेतील एक सामना अजून बाकी आहे. दक्षिण आफ्रिकेने हा सामना जिंकला, तरी सीरीज भारताच्याच नावावर होईल. टी 20 सीरीच्या पहिल्या चार सामन्यात टीम इंडिया 2-0 ने आघाडीवर आहे. सीरीजचा दुसरा आणि तिसरा सामना पावसामुळे रद्द झाला. मालिकेतील पहिला टी 20 सामना भारताने 54 धावांनी जिंकला. शेफाली वर्माच्या नेतृत्वाखाली भारताच्या अंडर 19 टीमने दक्षिण आफ्रिकेला चौथ्या टी 20 सामन्यात 4 विकेटने हरवलं.
शेवटचा टी 20 सामना कधी?
भारत आणि दक्षिण आफ्रिकेमध्ये सीरीजमधील पाचवा व शेवटचा टी 20 सामना 4 जानेवारीला खेळला जाईल. दक्षिण आफ्रिकेची महिला टीम प्रतिष्ठा राखण्यासाठी हा सामना खेळेल.
88 चेंडूत जिंकला चौथा सामना
भारताने दक्षिण आफ्रिकेविरुद्धचा चौथा टी 20 सामना 15 ओव्हर पूर्ण होण्याआधीच जिंकला. भारताच्या दोन गोलंदाजांनी दक्षिण आफ्रिकेची वाट लावली. त्यामुळे टीम इंडिया हा सामना लवकर जिंकणार असा अंदाज होता.
Innings Break! #TeamIndia restrict South Africa U19 Women to 86/9 in the first innings ?
3️⃣ wickets for Najila Cmc
2️⃣ wickets for Falak NazScorecard ▶️ https://t.co/JB2JTdnT6u…#TeamIndia | #SAvIND pic.twitter.com/y0o79OxWbg
— BCCI Women (@BCCIWomen) January 2, 2023
टीम इंडियाच्या 2 गोलंदाजांची कमाल
भारताच्या अंडर 19 महिला टीमच्या दोन गोलंदाज फलक आणि नजलाने मिळून दक्षिण आफ्रिकेच्या 5 फलंदाजांना तंबूत पाठवलं. नजलाने 3 ओव्हरमध्ये 4 धावा देऊन 3 विकेट काढल्या. फलकने 4 ओव्हर्समध्ये 11 धावा देऊन 2 विकेट काढल्या. दोघींनी किफायती आणि प्रभावी गोलंदाजी केली. परिणामी दक्षिण आफ्रिकेच्या अंडर 19 महिला टीमने चौथ्या सामन्यात 20 ओव्हर्समध्ये 9 विकेट गमावून फक्त 86 धावा केल्या.
टीम इंडियाकडून शेफाली वर्माच्या सर्वाधिक धावा
टीम इंडियाला विजयासाठी 87 धावांच सोप लक्ष्य मिळालं होतं. टीम इंडियाने 14.4 ओव्हर्समध्येच लक्ष्य गाठलं. भारताने सोप्या लक्ष्याचा पाठलाग करताना 6 विकेट गमावल्या. भारताकडून शेफाली वर्माने सर्वाधिक 29 धावा केल्या. या इनिंगमध्ये शेफालीचा स्फोटक फलंदाजीचा अंदाज दिसला नाही.