अहमदाबाद: भारत आणि वेस्ट इंडिजमध्ये सुरु असलेला दुसरा वनडे (India vs West Indies, 2nd ODI) सामना पाहण्यासाठी अंडर 19 वर्ल्डकप विजेता संघ पोहोचला आहे. मागच्याच आठवड्यात यश धुलच्या (Yash dhull) या टीमने इंग्लंडला हरवून वर्ल्डकपच जेतेपद पटकावलं. अहमदाबादमध्ये दाखल झालेल्या या अंडर 19 टीमचा (India Under-19) सन्मान करण्यात आला. त्यानंतर त्यांना भारताच्या सिनियर संघाचा खेळ पाहण्याची संधी देण्यात आली. अंडर 19 संघातील सर्वच खेळाडू सिनियर खेळाडूंचा खेळ पाहत होते. बीसीसीआयने हे फोटो आपल्या टि्वट हँडलवर शेअर केले आहेत. हा सामना पाहताना अंडर 19 संघातील खेळाडू नक्कीच निराश झाले असतील. कारण त्यांचे आदर्श विराट कोहली आणि रोहित शर्मा फ्लॉप झाले. त्याचवेळी सूर्यकुमार यादव, केएल राहुलचा अपवाद वगळता अन्य फलंदाज फार काही करु शकले नाहीत.
रोहित शर्मा पाच आणि विराट कोहली 18 धावांवर आऊट झाला. दोघेही खूप सहज आऊट झाले. त्यांना टाकलेले चेंडू खूपच अप्रतिम होते, असं नाहीय. रोहितने तिसऱ्या षटकात रोचच्या गोलंदाजीवर झेल दिला. कोहलीला 12 व्या षटकात ओडीन स्मिथने बाद केलं. ऋषभ पंतही 18 धावांवर आऊट झाला.
India U19 team was leaving after Kohli’s dismissal, they were stopped by reminding Lord Shardul is yet to bat. #INDvWI pic.twitter.com/rj2P5lQXW7
— Silly Point (@FarziCricketer) February 9, 2022
Inse toh hum hi acha khel lete hai pic.twitter.com/4XgBwvbs4e
— ┐( ∵ )┌ (@StayKohlified) February 9, 2022
टीम इंडियाचे फलंदाज ट्रोल
अंडर 19 वर्ल्डकप जिंकून आलेल्या टीम समोर हे रथी-महारथी फलंदाज ज्या पद्धतीने बाद होत होते, त्यावर सोशल मीडियावर फॅन्सनी मोठ्या प्रमाणात ट्रोल केलं. पंत, रोहित आणि विराट ज्या पद्धतीने बाद झाले, त्यानंतर फॅन्सी अंडर 19 टीम यांच्यापेक्षा चांगली खेळते, असं फॅन्सनी म्हटलं.
india under 19 team felicitated in ahmedabad ind vs wi 2nd odi fans troll senior players