यंदाचा विश्वचषक भारतीय क्रिकेट संघासाठी अत्यंत निराशाजनक सुरु होता. लागोपाठ दोन सामन्यात पराभवांमुळे भारतीय संघ निराश असताना आज मात्र भारताने पुनरागमन केलं आहे. अबुधाबीच्या शेख जायद मैदानात पार पडलेल्या अफगाणिस्तान विरुद्ध भारत सामन्यात भारताने 66 धावांनी विजय मिळवला आहे. नाणेफेक जिंकत अफगाणिस्तानने प्रथम गोलंदाजी निवडली. ज्यानंतर फलंदाजीला आलेल्या भारतीय फलंदाजानी मैदानावर दिवाळी साजरी करत धावांची आतषबाजी केली. राहुल आणि रोहितच्या अर्धशतकानंतर पंत आणि पंड्याच्या फिनींशिंगने भारताने 210 धावांचा डोंगर उभा केला. ज्यानंतर उत्तम गोलंदाजीने अफगाणिस्तानला धावांमध्ये रोखत 66 धावांनी विजय मिळवला.
टी20 विश्वचषकातील सामन्यांचा स्कोर आणि गुणतालिका सविस्तर पाहण्यासाठी या लिंकवर क्लिक करा.
सामन्यात नाणेफेक जिंकत अफगाणिस्तान संघाने इतर बहुतांश संघ यंदाच्या विश्वचषकात निवडत असल्याप्रमाणे प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. पण हा भारतीय सलामीवीरांना चूकीचा ठरवत धडाकेबाज फलंदाजी केली. केएल राहुल आणि रोहित शर्मा जोडीने सलामीला येत तब्बल 140 धावांची भागिदारी केली. त्यानंतर रोहित पाठोपाठ राहुलही बाद झाला. रोहितने 47 चेंडूत 3 षटकार आणि 8 चौकार ठोकत 74 धावा केल्या. तर राहुलने 48 चेंडूत 2 षटकार आणि 6 चौकार ठोकत 69 धावा केल्या. दोघेही बाद झाल्यावर फलंदाजीला आलेल्या पंत आणि पंड्या यांनीही आक्रमक फलंदाजी केली. पंड्याने नाबाद 35 आणि पंतने नाबाद 27 धावा केल्या. ज्याच्या जोरावर भारताने 210 धावा केल्या.
211 धावांचं मोठं लक्ष्य गाठण्यासाठी मैदानात आलेल्या अफगाणिस्तान संघाची सुरुवातच खराब झाली. पहिली सर्व फलंदाजाची फळी पटपट बाद होत गेली. पण कर्णधार मोहम्मद नबी आणि करीम जनत यांनी एक चांगली भागिदारी करत संघाचा डाव सावरण्याचा प्रयत्न केला. नबीने 35 धावा केल्या. तर जनत याने नाबाद 42 धावा केल्या. पण भारताचं 211 धावांचं मोठं लक्ष्य अफगाणिस्तान गाठू शकलं नाही. ज्यामुळे भारताचा 66 धावांनी विजय झाला. भारताकडून सर्वाधिक विकेट्स शमीने घेतल्या. त्याने 3 गड्यांना बाद केलं. तर आश्विनने 2, बुमराह आणि जाडेजाने प्रत्येकी एक विकेट मिळवली.
आधी दमदार फलंदाजी आणि नंतर उत्तम गोलंदाजीच्या जोरावर भारताने अफगाणिस्तानला 66 धावांनी नमवलं आहे.
मोहम्मद शमीने एकाच षटकात आणखी एक विकेट घेतली आहे. राशिदचा झेल सीमारेषेवर हार्दीकने पकडला आहे.
जाडेजाने नबीची कॅच घेतल्यानंतर पुढच्यात चेंडूवर जनतची कॅचही जाडेजानी पकडली. पण चेंडू हलकासा जमीनीला लागल्याने हा बाद देण्यात आला नाही.
मोहम्मद शमीने दुसरी विकेट मिळवली आहे. त्याने अफगाणिस्तानचा कर्णधार मोहम्मद नबीला बाद केलं आहे. जाडेजाने नबीची कॅच पकडली आहे.
शार्दूल ठाकूरने आजच्या सामन्यात खराब गोलंदाजीचं दर्शन घडवलं आहे. 18 वी ओव्हर टाकताना त्याने तब्बल 16 धावा दिल्या.
पाच विकेट गेल्यानंतर अफगाणिस्तानचा कर्णधार मोहम्मद नबी आणि जनत यांनी चांगली फलंदाजी करण्यास सुरुवात केली आहे. दोघांनी मिळून संघाची धावसंख्या 100 च्या पुढे गेली आहे.
अनुभवी आश्विनने यंदाच्या विश्वचषकात पहिला सामना खेळताना अप्रतिम कामगिरी सुरुच ठेवली आहे. त्याने आणखी एक विकेट घेत अफगाणिस्तानचा पाचवा गडी तंबूत धाडला आहे. त्याने एन. जदरानला त्रिफळाचित केलं आहे.
अफगाणिस्तानचा चौथा गडी तंबूत परतला आहे. अनुभवी आश्विनने गुलाबदीनला पायचीत केलं आहे.
अफगाणिस्तानचा तिसरा गडीही तंबूत परतला आहे. गुरबाज 19 धावा करुन बाद झाला आहे. जाडेजाच्या चेंडूवर पंड्याने त्याचा झेल घेतला आहे.
सहावी ओव्हर हार्दीक पंड्याने टाकली असून या षटकात 9 रन अफगाणिस्तानने केले. त्यांनी दोन चौकार लगावले.
मोहम्मद शमीने टाकलेलं पाचवं षटक भारताला महाग पडलं आहे. अफगाणिस्तानमच्या फलंदाजानी दमदार फलंदाजी केली आहे. त्यांनी दोन चौकार आणि दोन षटकार ठोकले आहेत. ओव्हरमध्ये तब्बल 21 धावा अफगाणिस्तानला मिळाल्या आहेत.
तिसऱ्या ओव्हरच्या शेवटच्या चेंडूवर विकेट पडल्यानंतर चौथ्या ओव्हरच्या पहिल्या चेंडूवर अफगाणिस्तानचा दुसरा सलामीवीरही बाद झाला आहे. बुमराहच्या चेंडूवर शार्दूलने त्याचा झेल घेतला आहे.
तिसऱ्या षटकात अफगाणिस्तानला पहिला झटका बसला आहे. शमीने मोहम्मद शहजादला बाद केलं आहे. आश्विनने त्याचा झेल पकडला आहे.
Match 33. 2.6: WICKET! M Shahzad (0) is out, c Ravichandran Ashwin b Mohammad Shami, 13/1 https://t.co/cxK4v0hpEq #INDvAFG #T20WorldCup
— BCCI (@BCCI) November 3, 2021
211 धावांचं मोठं आव्हान गाठण्यासाठी अफगाणिस्तानचे फलंदाज मैदानात आले आहेत. सध्या एच झझाई आणि मोहम्मद शहजाद फलंदाजी करत आहेत.
भारताने राहुल (69) आणि रोहितच्या (74) अर्धशतकानंतर पंत (नाबाद 27) आणि पंड्याच्या (नाबाद 35) फिनींशिंगने भारताने 210 धावांचा डोंगर उभा केला आहे.
यंदाच्या विश्वचषकात प्रथमच कोणत्यातरी संघाने 200 धावांचा आकडा पूर् णकेला आहे. पंतने अप्रतिम षटकार ठोकत संघाच्या 200 धावा पूर्ण केल्या आहेत.
हार्दीक पंड्याही आज चांगल्या लयीत दिसून येत आहे. काही चौकारानंतर त्याने आता 19 व्या षटकाच्या दुसऱ्या चेंडूवर एक दमदार षटकार लगावला आहे.
हार्दीतक पंड्याही चांगल्या रंगात आला आहे. 18 व्या षटकात त्याने लागोपाठ दोन चौकार लगावले आहेत.
17 व्या ओव्हरच्या अखेरच्या दोन चेंडूवर पंतने दोन षटकार ठोकत आक्रमण करण्यास सुरुवात केली आहे.
आज अप्रतिम सलामी दिल्यानंतर रोहित बाद होताच राहुलही बाद झाला आहे. गुलाबदीनने त्याला त्रिफळाचित केलं आहे.
आज अगदी आक्रमक फलंदाजी करत असलेला रोहित शर्मा अखेर बाद झाला आहे. 15 व्या षटकात करीम जनतच्या चेंडूवर नबीने रोहितचा झेल घेतला. रोहितने 47 चेंडूत 74 धावा केल्या.
जगातील अव्वल फिरकीपटू असणाऱ्या राशिद खानच्या षटकातही आज भारताचे सलामीवीर दमदार फलंदाजी करत आहे. नुकत्याच राशिदच्या षटकात शेवटत्या दोन चेंडूवर रोहितने लागोपाठ दोन षटकार ठोकले आहेत.
अप्रतिम चौकार लगावत केएल राहुलनेही अर्धशतक पूर्ण केलं आहे. त्याने 35 चेंडूत ही कामगिरी केली आहे.
12 व्या ओव्हरच्या चौथ्या चेंडूवर सलामीवीर केएल राहुलने अप्रतिम षटकार ठोकत भारताच्या 100 धावा पूर्ण केल्या आहेत.
भारताचा सलामीवीर रोहित शर्माने आज फॉर्ममध्ये पुनरागमन केलं आहे. त्याने दमदार असं अर्धशतक पूर्ण केलं आहे.त्याने 37 चेंडूत अर्धशतक पूर्ण केलं आहे.
FIFTY for @ImRo45! ? ?
His 2⃣3⃣rd in T20Is as #TeamIndia move to 95/0 after 11.2 overs. ? ? #INDvAFG #T20WorldCup
Follow the match ▶️ https://t.co/42045c5J05 pic.twitter.com/Y3xw0GR4d2
— BCCI (@BCCI) November 3, 2021
राशिद खानने त्याची दुसरी ओव्हर टाकण्यास सुरुवात केली आहे. पण पहिल्याच चेंडूवर राहुलने त्याला चौकार लगावला आहे.
नवव्या ओव्हरच्या तिसऱ्या चेंडूवर केएल राहुलने चौकार लगावत 31 धावा पूर्ण केल्या आहेत.
रोहितने चौकार ठोकल्यानंतर पाचव्या ओव्हरच्या अखेरच्या दोन चेंडूवर षटकार आणि चौकार लगावला आहे. यासोबतच भारताचा स्कोर 52 वर 0 बाद झाला आहे.
फ्रिहिटचा फायदा न उचलू शकल्यानंतर रोहितने एक चौकार लगावला आहे.
फ्रि हीटचा रोहित शर्मा खास फायदा उचलू शकला नाही. त्याने पूल शॉट खेळला. पण चेंडू थेट राशिद खानच्या हातात गेल्याने केवळ एकच धाव त्याला घेता आली.
चौथ्या ओव्हरच्या पहिल्या चेंडूवर अफगाणिस्तानच्या नवीनने नो बॉल टाकल्यामुळे भारताला फ्री हीट मिळाली आहे.
केएल राहुलनेही फटकेबाजी करण्यास सुरुवात केली आहे. दुसऱ्या षटकाच्या अखेरच्या दोन चेंडूवर त्याने चौैकार आण षटकार लगावला आहे.
दुसऱ्या षटकाच्या दुसऱ्या चेंडूवर रोहितने एक उत्कृष्ट शॉट लगावत चौकार लगावला आहे.
भारताचा सलामीवीर रोहितने पहिल्या षटकाच्या अखेरच्या चेंडूवर चौकार लगावत चौकारांचं खातं खोललं आहे.
भारतीय फलंदाज मैदानावर उतरले आहेत. केएल राहुल आणि रोहित शर्मा मैदानात आले आहेत.
भारत आणि अफगाणिस्तान सामना सुरुहोण्यापूर्वी याच गटातील न्यूझीलंड आणि स्कॉटलंड या सामन्यात अप्रतिम खेळ पाहायला मिळाला. आधी गप्टीलच्या 93 धावांच्या जोरावर न्यूझीलंडने 172 रन्स केले. पण उत्तरात स्कॉटलंडनेही कडवी झुंज दिली पण ते 156 धावाच करु शकल्याने 16 धावांनी पराभूत झाले. पण सामना मात्र चुरशीचा झाला.
A valiant effort from Scotland but New Zealand clinch the victory ✌️#T20WorldCup | #NZvSCO | https://t.co/CIpjB9NXlM pic.twitter.com/295NcGZJXT
— ICC (@ICC) November 3, 2021
भारत: विराट कोहली (कर्णधार), रोहित शर्मा, केएल राहुल, सूर्यकुमार यादव, ऋषभ पंत, हार्दिक पंड्या, रवींद्र जाडेजा, जसप्रीत बुमराह, शार्दूल ठाकूर, रवीचंद्रन आश्विन, मोहम्मद शमी.
अफगाणिस्तान : हजरतुल्लाह झझाई, मोहम्मद शहजाद, रहमनउल्लाह गुरबाज, नजीबुल्लाह जदरान, मोहम्मद नबी, गुलाबदीन नाईब, राशिद खान, करीम जनत, एस. अश्रफ, हामिद हसन, नवीन उल् हक,
आजची भारताचा कर्णधार विराटला नाणेफेक जिंकण्यात अपयश आलं आहे. त्यामुळे अफगाणिस्तानने नाणेफेक जिंकत गोलंदाजी निवडली असून भारत प्रथम फलंदाजी करेल.
That’s some hitting, @imjadeja ! ? ?#TeamIndia #T20WorldCup #INDvAFG pic.twitter.com/Yf89bCRlB1
— BCCI (@BCCI) November 3, 2021
टीम इंडियाचा टी 20 विश्वचषकातील आजचा अफगाणिस्तानविरुद्धचा सामना स्टार स्पोर्ट्स नेटवर्कवर (स्टार स्पोर्ट्स 1, स्टार स्पोर्ट्स 2 आणि स्टार स्पोर्ट्स 3) हिंदी आणि इंग्रजी भाषेत थेट प्रसारित केले जातील. या सामन्यांचे ऑनलाइन लाइव्ह स्ट्रीमिंग डिस्ने+ हॉटस्टारवर ऑनलाइन पाहू शकता
टी-20 विश्वचषक स्पर्धेत भारत अजूनही पहिल्या विजयाची वाट पाहत आहे. पहिल्या सामन्यात भारताला पाकिस्तानने तर दुसऱ्या सामन्यात न्यूझीलंडने पराभूत केले होते. आज त्यांना अफगाणिस्तानचा सामना करावा लागणार आहे. भारताला अजून तीन सामने खेळायचे आहेत. भारताने तिन्ही सामने जिंकले तरी त्यांना सेमीफायनलचं तिकीट मिळणार नाही. त्यासाठी भारताला इतर संघांवर अवलंबून राहावे लागेल कारण न्यूझीलंडनेही तिन्ही सामने जिंकले तर भारतीय संघ आपोआप बाद होईल. अफगाणिस्तानने न्यूझीलंडला हरवले आणि त्यानंतर भारताने त्यांचे सर्व सामने जिंकले तर भारताला सेमीफायनलचं तिकीट मिळण्याची शक्यता आहे. अशा स्थितीत सर्व संघ सहा गुणांवर असतील आणि त्यानंतर सर्व काही निव्वळ धावगती (नेट रनरेट) निश्चित करेल.