T20 World Cup 2021 : टी20 विश्वचषकातील भारताचा तिसरा सामना काही मिनिटांत सुरु होत आहे. भारत आणि अफगाणिस्तान या सामन्याला अबुधाबीच्या शेख जायद मैदानावर सुरुवात होत आहे. नुकतीच नाणेफेक झाली असून अफगाणिस्तानने नाणेफेक जिंकली आहे. अफगाणिस्तानने प्रथम गोलंदाजी निवडली आहे. यंदाच्या विश्वचषकात (T20 World Cuo 2021) नाणेफेक जिंकणारा संघ गोलंदाजी घेऊन विजय लिहित आहे. पण ही संधी भारताला मिळत नसून पुन्हा एकदा टॉस विराटने गमावला आहे. आता प्रथम फलंदाजीसाठी भारतीय संघाला मैदानात उतरायचे आहे.
? Toss Update ?
Afghanistan have elected to bowl against #TeamIndia. #INDvAFG #T20WorldCup
Follow the match ▶️ https://t.co/42045c5J05 pic.twitter.com/mFTytfXh8z
— BCCI (@BCCI) November 3, 2021
भारताला स्पर्धेत अजूनपर्यंत एकही विजय मिळवता आलेला नाही. पहिल्या सामन्यात पाकिस्तानने 10 विकेट्सनी आणि दुसऱ्या सामन्यात न्यूझीलंडने 8 विकेट्सनी मात दिल्यानंतर भारतीय संघाच्या पुढील फेरीच्या आशा जवळपास संपुष्टात आल्या आहेत. तरीही आशेवर दुनिया कायम आहे असं म्हणतात ना…तसंच उर्वरीत सामन्यात मोठ्या फरकाने विजयासाठी भारतीय संघ सज्ज झाला आहे. यातील पहिला सामना आज अफगाणिस्तान संघाविरुद्ध (india vs afghanistan) खेळवला जाणार आहे. स्पर्धतील आव्हान जिवंत ठेवण्यासाठी भारतीय संघाला विजय अनिवार्य असून सेमीफायनलमध्ये पोहोचण्यासाठी अफगाणिस्तानलाही विजय महत्त्वाचा आहे.
भारत: विराट कोहली (कर्णधार), रोहित शर्मा, केएल राहुल, सूर्यकुमार यादव, ऋषभ पंत, हार्दिक पंड्या, रवींद्र जाडेजा, जसप्रीत बुमराह, शार्दूल ठाकूर, रवीचंद्रन आश्विन, मोहम्मद शमी.
अफगाणिस्तान : हजरतुल्लाह झझाई, मोहम्मद शहजाद, रहमनउल्लाह गुरबाज, नजीबुल्लाह जदरान, मोहम्मद नबी, गुलाबदीन नाईब, राशिद खान, करीम जनत, एस. अश्रफ, हामिद हसन, नवीन उल् हक,
हे ही वाचा :
ICC T20 Rankings: श्रीलंकेचा वानिंदु हसारंगा ‘नंबर-1’, टॉप 10 मध्ये एकही भारतीय नाही