India vs South Africa LIVE Score, 1st Test, DAY 3 : गोलंदाजांचा भेदक मारा, सेंच्युरियनवर भारताची स्थिती मजबूत

| Updated on: Dec 28, 2021 | 10:15 PM

भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील तीन सामन्यांच्या कसोटी मालिकेतील पहिला सामना सेंच्युरियनमध्ये खेळवला जात असून आज या सामन्याचा तिसरा दिवस आहे.

India vs South Africa LIVE Score, 1st Test, DAY 3 : गोलंदाजांचा भेदक मारा, सेंच्युरियनवर भारताची स्थिती मजबूत
Follow us on

सेंच्युरियनच्या (Centurion Test) सुपर स्पोर्ट पार्क स्टेडियमवर भारत आणि दक्षिण आफ्रिकेमध्ये (INDVSSA) सुरु असलेला पहिला कसोटी सामना रंगतदार होण्याची चिन्हे आहेत. तिसऱ्या दिवसाचा खेळ संपला असून भारताकडे एकूण 146 धावांची आघाडी आहे. दिवसअखेर मयांक अग्रवालच्या विकेटच्या मोबदल्यात भारताच्या एक बाद 16 धावा झाल्या आहेत. पहिल्या डावात दमदार सलामी देऊन अर्धशतक झळकावणारा मयांक अग्रवाल दुसऱ्या डावात स्वस्तात बाद झाला आहे. त्याला चार धावांवर जॅनसेनने डी कॉक करवी झेलबाद केले.

काल दुसऱ्या दिवसाचा खेळ पावसामुळे वाया गेल्यानंतर आज तिसऱ्या दिवसाच्या खेळावर गोलंदाजांनी वर्चस्व गाजवलं. आज संपूर्ण दिवसात दोन्ही संघाच्या मिळून 18 विकेट गेल्या. भारताने पहिल्या दिवसाच्या तीन बाद 273 धावांवरुन डाव पुढे सुरु केल्यानंतर आज फक्त 54 धावांची भर घालून भारताचा डाव 327 धावात आटोपला. निगीडी आणि राबाडा दोघांच्या भेदक माऱ्यासमोर भारताचा पहिला डाव पत्त्याच्या बंगल्याप्रमाणे कोसळला. दोघांनी मिळून नऊ विकेट घेतल्या.

गोलंदाजीला अनुकूल असलेल्या खेळपट्टीचा दोन्ही संघाच्या गोलंदाजांनी फायदा उचलला. पाच गोलंदाजांसह खेळणाऱ्या भारताने त्याच तोडीची गोलंदाजी केली. शामी, बुमराह, ठाकूर, सिराज या चौघांनी भेदक मारा करुन आफ्रिकेचा पहिला डाव 197 धावात गुंडाळला. शामीने आफ्रिकेचा निम्मा संघ तंबूत पाठवला. शार्दुल आणि बुमराहने प्रत्येकी दोन विकेट घेतल्या. आफ्रिकेकडून फक्त टेंबा बावुमाने (५२) अर्धशतक झळकावले. क्विंटन डि कॉक (३४) सोबत बावुमाने केलेली भागीदारी आणि राबाडाने (२५) थोडा फार प्रतिकार करण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे आफ्रिकेला 197 पर्यंत पोहोचता आले. आजच्यासारखंच उद्या सुद्धा गोलंदाजांनी वर्चस्व गाजवलं, तर कदाचित उद्याच सामन्याचा निकाल लागू शकतो.

भारतीय संघ: केएल राहुल, मयंक अग्रवाल, चेतेश्वर पुजारा, विराट कोहली (कर्णधार), अजिंक्य रहाणे, ऋषभ पंत, आर. अश्विन, मोहम्मद शमी, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज, शार्दुल ठाकूर

SA: डीन एल्गर (कर्णधार), एडन मार्करम, कीगन पीटरसन, रासी वॅन डर डुसॅ, टेंबा बावुमा, क्विंटन डिकॉक, वियान मुल्डर, केशव महाराज, कगिसो रबाडा, लुंगी निगीडी, मार्को जॅनसेन

LIVE Cricket Score & Updates

The liveblog has ended.
  • 28 Dec 2021 10:02 PM (IST)

    प्र-कुलपतीवरुन गैरसमज निर्माण केला जातोय- उदय सामंत

    मुंबई : विरोधक जे म्हणत आहेत, ते चुकीचं आहे..

    प्र-कुलपती वरुन गैरसमज निर्माण केला जातोय..

    त्यांना कसालाही अधिकार नाही..

    सभा ज्यावेळी असेल, राज्यपाल जेव्हा नसतील, तेव्हा कुलगुरुंचा कोणताही अधिकार आम्ही हिरावून घेतलेला नाही..

    कोणाचेही अधिकार आम्ही काढून घेतलेले नाहीत..

    विरोधक जर समर्थन करणार असतील, तर त्यांनादेखील हे पटलंय असं होईल..

    संभ्रम निर्माण करण्याचं काम विरोधक करत आहेत..

    सिनेट मिटिंगला प्र कुलपती जाऊन बसतील, असंही काही नाही..

    राज्यपाल नसतील तेव्हा फक्त प्र-कुलपती जाऊन मीटिंगला बसतील..

  • 28 Dec 2021 09:30 PM (IST)

    भारताला पहिला झटका

    पहिल्या डावात दमदार सलामी देऊन अर्धशतक झळकावणारा मयांक अग्रवाल दुसऱ्या डावात स्वस्तात बाद झाला आहे. त्याला चार धावांवर जॅनसेनने डी कॉक करवी झेलबाद केले.


  • 28 Dec 2021 09:13 PM (IST)

    भारताच्या दुसऱ्या डावाला सुरुवात

    भारताच्या दुसऱ्या डावाला सुरुवात. लोकेश राहुल आणि मयांक अग्रवाल सलामीची जोडी मैदानात. भारताच्या बिनबाद 6 धावा.

  • 28 Dec 2021 08:55 PM (IST)

    दक्षिण आफ्रिकेचा डाव 197 धावात आटोपला

    भारताच्या भेदक गोलंदाजीसमोर दक्षिण आफ्रिकेचा पहिला डाव 197 धावात आटोपला. मोहम्मद शामीने आफ्रिकेच्या निम्म्या संघाला तंबूत पाठवले. जसप्रीत बुमराह, शार्दुल ठाकूरने प्रत्येकी दोन विकेट घेतल्या. सिराजला एक विकेट मिळाला. भारताकडे 130 धावांची आघाडी आहे.

  • 28 Dec 2021 08:28 PM (IST)

    मॉर्को जॅनसेन आऊट

    मार्को जॅनसेन 19 धावांवर आऊट झाला आहे. शार्दुल ठाकूरने त्याला पायचीत केले.

  • 28 Dec 2021 08:26 PM (IST)

    रबाडाची फटकेबाजी

    दक्षिण आफ्रिकेचे तळाचे फलंदाज जास्तीत जास्त धावा करण्याचे प्रयत्न करत आहेत. कगिसो रबाडा वेगाने धावा बनवण्याचा प्रयत्न करतोय. रबाडा 23 धावांवर खेळतोय. यात तीन चौकार आणि एक षटकार लगावला आहे.

  • 28 Dec 2021 08:03 PM (IST)

    ऋषभ पंतने मोडला धोनीचा विक्रम

    भारताचा युवा विकेटकिपर ऋषभ पंतने कसोटी क्रिकेटमध्ये एक विक्रम आपल्या नावावर केला आहे. त्याने यष्टीपाठी झेल आणि स्टंम्पिगचा धोनीचा विक्रम मोडला आहे. त्याने 26 व्या कसोटी सामन्यात ही कमाल केली. बावुमाचा कॅच घेऊन पंतने धोनीचा विक्रम मोडला. धोनीने 36 सामन्यात ही कामगिरी केली होती. पंतने आतापर्यंत 92 झेल आणि आठ स्टंम्पिंग केले आहेत.

  • 28 Dec 2021 07:46 PM (IST)

    दक्षिण आफ्रिकेचा सातवा विकेट

    अर्धशतकी खेळी करणाऱ्या बावुमाला मोहम्मद शामीने 52 धावांवर बाद केले आहे. शामीने बावुमाला पंतकडे झेल द्यायला भाग पाडला.

  • 28 Dec 2021 07:08 PM (IST)

    बुमराह मैदानात परतला

    भारतासाठी एक चांगली बातमी आहे. जसप्रीत बुमराह फिट होऊन मैदानात परतला आहे. गोलंदाजी करताना बुमराहच्या उजव्या पायाच्या घोट्याला दुखापत झाली होती. फिजिओने तपासणी केली. नेट्समध्ये काही वेळ गोलंदाजी केल्यानंतर फिट होऊन बुमराह मैदानात परतला आहे.

  • 28 Dec 2021 07:02 PM (IST)

    दक्षिण आफ्रिकेला पाचवा धक्का

    क्विंटन डि कॉकला शार्दुल ठाकूरने 34 धावांवर क्लीन बोल्ड केले आहे. डि कॉकने त्याच्या खेळीत तीन चौकार आणि एक षटकार लगावला.

  • 28 Dec 2021 06:06 PM (IST)

    क्विंटन डिकॉकने ठोकला षटकार

    क्विंटन डिकॉकने अश्विनच्या गोलंदाजीवर षटकार ठोकला. अश्विनने ऑफ स्टंपबाहेर टाकलेल्या चेंडूवर डिकॉकने गुडघ्यावर बसून षटकार मारला. बावुमा आणि डिकॉकमध्ये पाचव्या विकेटसाठी अर्धशतकीय भागीदारी झाली आहे.

  • 28 Dec 2021 05:42 PM (IST)

    क्विंटन डिकॉक आणि बावुमाची जोडी मैदानात

    क्विंटन डिकॉक आणि बावुमाची जोडी मैदानात असून दक्षिण आफ्रिकेच्या चार बाद 66 धावा झाल्या आहेत.

  • 28 Dec 2021 05:39 PM (IST)

    जसप्रीत बुमराहला दुखापत

    टीम इंडियाचा प्रमुख गोलंदाज जसप्रीत बुमराहला दुखापत झाली आहे. बोर्डाने त्याच्या दुखापतीबद्दल माहिती दिली आहे. पहिल्या डावात गोलंदाजी करताना जसप्रीत बुमराहच्या उजव्या पायाचा घोटा दुखावला आहे. मेडिकल टीम दुखापतीची तपासणी करत असून श्रेयस अय्यर सब्सटिट्यूट म्हणून मैदानात गेला आहे.

  • 28 Dec 2021 04:52 PM (IST)

    भारतीय त्रिकुटाचा भेदक मारा

    दक्षिण आफ्रिकेचा डाव अडचणीत सापडला आहे. 32 धावात त्यांचे चार विकेटस गेले आहेत. मार्कराम (13) आणि रासी वॅन डर ड्युससेन (3) आऊट झाले आहेत. शामीने दोन, बुमराह आणि सिराजने प्रत्येकी एक विकेट घेतला आहे.

  • 28 Dec 2021 04:24 PM (IST)

    दक्षिण आफ्रिकेला दुसरा धक्का

    दक्षिण आफ्रिकेला दुसरा झटका. कीगन पीटरसनला (15) धावांवर मोहम्मद शामीने केले बाद.

  • 28 Dec 2021 03:54 PM (IST)

    पहिल्या सत्राचा खेळ संपला

    सेंच्युरियनमध्ये तिसऱ्यादिवसातील पहिले सत्र संपले आहे. या सत्रात फक्त 76 धावा झाल्या व आठ विकेट गेल्या. भारताने सात तर आफ्रिकेने एक विकेट गमावली. दक्षिण आफ्रिकेच्या एक बाद २१ धावा झाल्या आहेत.

  • 28 Dec 2021 03:42 PM (IST)

    मार्कराम-पीटरसन खेळपट्टीवर स्थिरावले

    कर्णधार एल्गर तंबूत परतल्यानंतर एडेन मार्कराम (9) आणि कीगन पीटरसन (11) आता खेळपट्टीवर स्थिरावण्याचा प्रयत्न करत आहेत. दक्षिण आफ्रिकेच्या एक बाद 21 धावा झाल्या आहेत.

  • 28 Dec 2021 03:13 PM (IST)

    दक्षिण आफ्रिकेचा कर्णधार स्वस्तात बाद

    दक्षिण आफ्रिकेच्या डावाला सुरुवात झाली असून कर्णधार डीन एल्गरच्या रुपाने त्यांना पहिला झटका बसला आहे. एल्गरला अवघ्या एक रन्सवर बुमराहने विकेटकिपर पंतकरवी झेलबाद केले.

  • 28 Dec 2021 03:01 PM (IST)

    जसप्रीत बुमराह बाद

    भारताचा पहिला डाव 327 धावात आटोपला. जसप्रीत बुमराह 14 धावांवर बाद, राबाडा, निगीडीचा भेदक मारा

  • 28 Dec 2021 02:32 PM (IST)

    मोहम्मद शामी बाद

    मोहम्मद शामी आठ धावांवर बाद, निगीडीने यष्टीरक्षक डि कॉककरवी केले झेलबाद

  • 28 Dec 2021 02:30 PM (IST)

    भारताला आठवा धक्का, शार्दुल ठाकूरही बाद

    शार्दुलला अवघ्या चार धावांवर रबाडाने क्विंटन डि कॉककरवी झेलबाद केले.

  • 28 Dec 2021 02:21 PM (IST)

    ऋषभ पंत, अश्विनही बाद

    अजिंक्य रहाणेनंतर ऋषभ पंत, रविचंद्रन अश्विन स्वस्तात बाद. पंत 8 आणि अश्विन 4 धावांवर आऊट. पंतला निगीडी आणि अश्विनला रबाडाने बाद केले.

  • 28 Dec 2021 01:52 PM (IST)

    भारताला मोठा धक्का, केएल राहुल 123 धावांवर बाद

    आजच्या पहिल्याच सत्रात भारताला मोठा धक्का बसला आहे. शतकवीर केएल राहुल (123) माघारी परतला. कगिसो रबाडाने त्याला यष्टीरक्षक क्विंटन डीकॉककरवी झेलबाद केलं.

  • 28 Dec 2021 01:27 PM (IST)

    IND vs SA Live: आजच्या सत्रांची वेळ

    आज सेंच्युरियनमध्ये चांगले हवामान असून तिसऱ्या दिवसाचा खेळ वेळेवर सुरू होणार आहे. आज 90 ऐवजी एकूण 98 षटके खेळवली जातील. त्यामुळे सत्राच्या वेळेत काही बदल करण्यात आले आहेत.

    पहिले सत्र – दुपारी 1.30-3.30pm (IST)
    दुसरे सत्र – 4.10-6.40pm (IST)
    तिसरे सत्र – 7.00-9.00pm (IST)