IND vs AUS 1st ODI : भारतीय टीमने ऑस्ट्रेलिया विरुद्ध वनडे सीरीजची सुरुवात विजयाने केली आहे. सीरीजच्या पहिल्या सामन्यात टीम इंडियाने पाच विकेटने विजय मिळवला. या मॅचमध्ये टीम इंडियाचे स्टार बॅट्समन फ्लॉप ठरले. यात सूर्यकुमार यादवही आहे. वनडे फॉर्मेटमध्ये सूर्यकुमारचा फ्लॉप शो या सीरीजमध्येही कायम आहे. श्रेयस अय्यरला दुखापत झाल्याने मुंबईमध्ये होणाऱ्या पहिल्या वनडे सामन्यासाठी सूर्यकुमार यादवची टीम इंडियात निवड झाली. सूर्यकुमार यादव बॅटिंगसाठी आला, त्यावेळी टीम इंडियाच्या 14 रन्सवर 2 विकेट गेल्या होत्या.
कोहली बाद झाल्यानंतर सूर्या क्रीजवर आला. तो पहिल्याच चेंडूवर LBW आऊट झाला. सूर्याचा खेळ फक्त एका चेंडूत संपला. तो गोल्डन डकवर आऊट झाला.
वनडेमध्ये सूर्याच्या किती धावा?
सूर्यकुमार यादवने वनडेमध्ये डेब्यु केल्यानंतर काही चांगल्या इनिंग खेळला. पण नंतर त्याची लय बिघडली. टी 20 क्रिकेटमध्ये स्फोटक बॅट्समन म्हणून सूर्यकुमारची ओळख आहे. पण वनडे फॉर्मेटमध्ये तो काही खास करु शकलेला नाही. त्याने 21 वनडे सामन्यात 19 इनिंगमध्ये 27.06 च्या सरासरीने 433 धावा केल्या आहेत. या दरम्यान त्याच्या बॅटमधून फक्त दोन अर्धशतक निघाली आहेत.
सूर्याने वनडेत किती हाफ सेंच्युरी झळकवल्यात?
मागच्या 11 इनिंगमध्ये सूर्यकुमार यादव फक्त चारवेळा दुहेरी आकडा गाठू शकलाय. मागच्या 15 इनिंगमध्ये त्याच्या बॅटमधून एकही अर्धशतक निघालेलं नाही. टी 20 मध्ये त्याचा फॉर्म बिलकुल या उलट आहे. मागच्यावर्षी या फॉर्मेटमध्ये तो सर्वाधिक धावा बनवणारा फलंदाज होता.
सूर्याला वनडेमध्ये जागा बनवणं जमेल का?
सूर्यकुमार यादवला वनडे फॉर्मेटमध्ये स्थान पक्क करायचं असेल, तर त्याला मोठ्या इनिंग खेळाव्या लागतील. संधी मिळाल्यानंतर स्वत:ला सिद्ध कराव लागेल. श्रेयस अय्यर अजून फिट नाहीय. तो पर्यंत सूर्यकुमार यादवकडे संधी आहे. त्याचा सध्याचा फॉर्म पाहता तो वनडेमध्ये स्वत:च स्थान निर्माण करण्याची शक्यता कमी वाटतेय.