मुंबई: आशिया कप नंतर टीम इंडियासमोर आता ऑस्ट्रेलियाच आव्हान आहे. तीन मॅचची टी 20 सीरीज मंगळवारपासून सुरु होत आहे. मोहालीमध्ये पहिला सामना होणार आहे. T20 वर्ल्ड कपच्या दृष्टीने ही टी 20 सीरीज टीम इंडियासाठी खूप महत्त्वाची आहे. रोहित शर्मा टीम इंडियाचं नेतृत्व करणार आहे. रोहितकडे अजूनही मोठ्या प्रश्नांची उत्तर शोधण्याची संधी आहे.
दिनेश कार्तिकला पुन्हा डावलणार?
रोहित पहिल्या मॅचच्या प्लेइंग 11 मध्ये कोणाला संधी देणार? हा खरा प्रश्न आहे. टीम निवडणं रोहित शर्मासाठी सोपं नाहीय. त्याच्यासमोर काही प्रश्न आहेत, कोणाला खेळवायच? कोणाला नाही?. यावेळी सुद्धा रोहित दिनेश कार्तिकऐवजी ऋषभ पंतला संधी देणार? हा मुद्दा आहे. अक्षर पटेल आणि दीपक हुड्डामध्ये कोण खेळणार?
बॅटिग युनिट कशी असेल?
केएल राहुलच टी 20 मध्ये टीम इंडियाचा ओपनर आहे, हे रोहितने स्पष्ट केलय. विराट कोहली टीमचा तिसरा सलामीवीर आहे. म्हणजेच ऑस्ट्रेलिया विरुद्ध पहिल्या टी 20 मॅचमध्ये रोहित-राहुलची जोडी सलामीला उतरेल. त्यानंतर विराट कोहली येईल. मिडल ऑर्डरची जबाबदारी सूर्यकुमार यादववर असेल. हार्दिक पंड्या ऑलराऊंडर म्हणून टीममध्ये असेल.
कुठल्या गोलंदाजांना निवडणार?
जसप्रीत बुमराह आणि हर्षल पटेल फिट झाले आहेत. त्यांचं टीममध्ये पुनरागमन निश्चित आहे. 2022 मध्ये भुवनेश्वर कुमारने टी 20 मध्ये सर्वाधिक विकेट घेतलेत. त्याचा सुद्धा टीममध्ये निश्चित सहभाग असेल. स्पिन गोलंदाजीत युजवेंद्र चहलला संधी मिळू शकते.
भारताची संभाव्य प्लेइंग इलेवन-
रोहित शर्मा, केएल राहुल, विराट कोहली, सूर्यकुमार यादव, हार्दिक पंड्या, अक्षर पटेल, भुवनेश्वर कुमार, हर्षल पटेल, जसप्रीत बुमराह आणि युजवेंद्र चहल