IND vs AUS 1st Test : नागपूर कसोटीच्या पहिल्या दिवशी टीम इंडियाने कमालीचा खेळ दाखवला. ऑस्ट्रेलियाने फक्त टॉस जिंकला. पण त्यानंतर टीम इंडियाने प्रत्येक सेशनमध्ये वर्चस्व गाजवलं. ऑस्ट्रेलियाचा पहिला डाव अवघ्या 177 धावात आटोपला. स्टीव्ह स्मिथ, डेविड वॉर्नर, लाबुशेन अशा दिग्गजांचा समावेश असलेली ऑस्ट्रेलियन टीम फक्त 63.5 ओव्हर्समध्ये ऑलआऊट झाली. अपेक्षेप्रमाणे ऑस्ट्रेलियन टीम कसोटीच्या पहिल्या डावात स्पिन गोलंदाजी विरोधात संघर्ष करताना दिसली. जाडेजा आणि अश्विनने मिळून 8 विकेट काढल्या. टीम इंडियाने पहिल्या दिवशी दमदार फलंदाजी केली. दिवसाचा खेळ संपताना टीम इंडियाच्या 1 बाद 77 धावा झाल्या होत्या. आता दुसऱ्यादिवशी टीम इंडियाची रणनिती काय असेल? हा प्रश्न आहे.
आज दुसऱ्याच दिवशी टीम इंडिया नागपूर कसोटीत आपला विजय पक्का करु शकते. फक्त 2 सेशनच्या खेळात टीम इंडिया ऑस्ट्रेलियाला नॉक आऊट करु शकते. टीम इंडियाने आज काय करणं गरजेच आहे? ते जाणून घेऊया.
1 ऑस्ट्रेलियावर मोठा लीड मिळवणं, हे दुसऱ्यादिवशी टीम इंडियाच पहिलं उद्दिष्टय असलं पाहिजे. टीम इंडिया ऑस्ट्रेलियापेक्षा फक्त 100 धावांनी पिछाडीवर असून 9 विकेट बाकी आहेत. टीम इंडिया पॉझिटिव्ह क्रिकेट खेळतेय. हीच सकारात्मकता त्यांना कायम ठेवावी लागेल. कमीत कमी 200 धावांची आघाडी टीम इंडियाला मिळवावी लागेल.
2 रोहित शर्माने पहिल्या दिवशी चांगली बॅटिंग केली. अर्धशतक झळकवून तो नाबाद आहे. रोहितला त्याची चांगली सुरुवात आता शतकामध्ये बदलावी लागेल. या पीचवर प्रत्येक बॅट्समनला रोहितसारखी चांगली सुरुवात मिळू शकत नाही. रोहितला ही गोष्ट ध्यानात ठेवून आपला स्कोर वाढवावा लागेल.
3 विराट कोहली, चेतेश्वर पुजारा आणि सूर्यकुमार यादव असे दिग्गज फलंदाज टीम इंडियाच्या मीडल ऑर्डरमध्ये आहेत. त्यांना सकारात्मक क्रिकेट खेळावं लागेल. नागपूरच्या विकेटवर कधीही गोलंदाज वरचढ ठरु शकतात. त्यामुळे चांगल्या सुरुवातीचा फायदा उचलण्याची मिडल ऑर्डरवर जबाबदारी असेल.
4 दुसऱ्यादिवशी टीम इंडियाला तीन सेशन्समध्ये बॅटिंग करावी लागेल. टीम इंडियाने असं केल्यास, कदाचित त्यांना चौथ्या इनिंगमध्ये बॅटिंग करण्याची गरज भासणार नाही. ऑस्ट्रेलियाने पहिल्या इनिंगमध्ये जी बॅटिंग केलीय, ते पाहून दुसऱ्या इनिंगमध्ये सुद्धा ते फार प्रभावी कामगिरी करतील असं वाटत नाही.