मुंबई: टीम इंडियाने रविवारी ऑस्ट्रेलिया विरुद्ध T20 तिसरा सामना जिंकला. या विजयासह टीम इंडियाने 2-1 असा मालिका विजय मिळवला. हैदरादबाद येथे सीरीजमधील तिसरा टी 20 सामना खेळला गेला. टीम इंडियाच्या या विजयात मिडल ऑर्डरमधील बॅट्समन सूर्यकुमार यादवने महत्त्वाची भूमिका बजावली. त्याने निर्णायक क्षणी टीमसाठी महत्त्वपूर्ण खेळी केली. त्यामुळे रोहित शर्माच्या टीमला मालिका विजय मिळवता आला.
त्याची बॅटिंग पाहून कोणी….
सूर्यकुमार यादवने कालच्या सामन्यात 36 बॉलमध्ये 69 धावा फटकावल्या. यात पाच चौकार आणि पाच षटकार आहेत. मैदानात सूर्यकुमार यादवने तफानी फलंदाजी केली. त्याची बॅटिंग पाहून तो रात्रभर पोटदुखी आणि तापाने हैराण होता, हे
कोणी म्हणू शकत नाही
सूर्यकुमार यादवमुळे टीम इंडिया उतरलेल्या हॉटेलमध्ये रात्री 3 वाजता पळापळ सुरु होती. पोटदुखीमुळे सूर्यकुमारला तीव्र वेदना होत होत्या. सीरीज विजयानंतर त्याने स्वत: हा खुलासा केला.
रात्री 3 वाजता काय घडलं?
सूर्यकुमारची सामनावीर पुरस्कारासाठी निवड करण्यात आली. सीरीजमध्ये एकूण 8 विकेट घेणारा अक्षर पटेल प्लेयर ऑफ द सीरीज पुरस्काराचा मानकरी ठरला. मॅच जिंकल्यानंतर सूर्यकुमारने अक्षरसोबत चर्चा केली. त्यावेळी त्याने रात्री 3 वाजताच्या परिस्थितीबद्दल खुलासा केला. बीसीसीआयने दोघांच्या संवादाचा व्हिडिओ शेयर केलाय.
सकाळी उठून मी फिजियोच्या रुममध्ये गेलो, त्यावेळी तिथे गोंधळ सुरु होता. सगळेजण सूर्यकुमारबद्दल बोलत होते. अक्षरकडून हे ऐकल्यानंतर सूर्यकुमारने रात्री काय घडलं, ते सांगितलं.
सूर्यकुमार डॉक्टर-फिजियोला काय म्हणाला?
वातावरण बदललय. प्रवास सुरु आहे, त्यामुळे पोटदुखीचा त्रास झाला, ताप आला, असं सूर्यकुमारने सांगितलं. सूर्यकुमारने डॉक्टर आणि फिजियोला विचारलं, ही वर्ल्ड कप फायनलची मॅच असेल, तर तुम्ही कसे रिएक्ट व्हाल.
मी आजारपण घेऊन बसू शकत नाही
मी आजारपण घेऊन बसू शकत नाही. काहीही करुन मला मॅचसाठी फिट करा, असं सूर्याने त्यांना सांगितलं. कुठलही इंजेक्शन द्याव लागलं, गोळी खावी लागली तरी चालेल पण संध्याकाळच्या मॅचपर्यंत मला फिट करा, असं सूर्या त्यांना म्हणाला. एकदा मैदानात उतरल्यानंतर टीम इंडियाची जर्सी घातल्यानंतर वेगळ्याच भावना असतात, असं सूर्या म्हणाला.