IND vs AUS Test : ऑस्ट्रेलियाच प्रॉब्लेम काय? टीम इंडियावर केला मोठा आरोप

| Updated on: Mar 09, 2023 | 2:25 PM

IND vs AUS 4th Test : क्रिकेट खेळण्याऐवजी ऑस्ट्रेलियाई दिग्गज अशी वक्तव्य का करतायत? बॉर्डर-गावस्कर सीरीजमधला चौथा निर्णायक कसोटी सामना सुरु आहे. मालिकेत टीम इंडिया 2-0 ने आघाडीवर आहे.

IND vs AUS Test : ऑस्ट्रेलियाच प्रॉब्लेम काय? टीम इंडियावर केला मोठा आरोप
ind vs aus 4th test
Image Credit source: PTI
Follow us on

IND vs AUS 4th Test : भारत आणि ऑस्ट्रेलियामध्ये अहमदाबाद येथे चौथा कसोटी सामना सुरु आहे. मागच्या तीन कसोटी सामन्यांच्या तुलनेत या विकेटवर तितका टर्न दिसत नाहीय. मात्र, तरीही ऑस्ट्रेलियाचे दोन माजी क्रिकेटपटू पीचवर खूश नाहीयत. मार्क वॉ आणि ब्रॅड हॅडिनने अहमदाबादच्या पीच क्युरेटरवर प्रश्नचिन्ह निर्माण केलय. ब्रॅड हॅडिनने टीम इंडियावर आरोपही केलाय. “इंदोरमध्ये आपला पराभव होईल, असं टीम इंडियाला वाटलं नव्हतं. म्हणून अहमदाबादमध्ये आधी त्यांनी ग्रीन विकेट बनवली होती. पण पराभव झाल्यानंतर काळ्या मातीची विकेट बनवली” असं हॅडिनने म्हटलय.

ब्रॅड हॅडिनने काय म्हटलय?

रोहित शर्माने ग्रीन विकेटची इच्छा व्यक्त केली होती. कारण त्याला या पीचवर वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपची तयारी करायची होती. ऑस्ट्रेलिया इंदोर कसोटी गमावेल, असं त्याला वाटत होतं. पण पराभवानंतर टीम इंडियात खळबळ उडाली. म्हणून त्यांनी पुन्हा एकदा पारंपारिक विकेट बनवली असं ब्रॅड हॅडिनने म्हटलय.

मार्क वॉ म्हणतो, असं कसं होईल?

मार्क वॉ ने अहमदाबादच्या क्युरेटरवर प्रश्नचिन्ह निर्माण केलय. “कुठल्या पीचवर मॅच होणार, हे पीच क्युरेटरला माहित नाही, असं कसं होईल? हे काऊंटी क्रिकेटसारखं आहे. तिथे तीन प्रकारचे पीच बनवले जातात. सामन्यात प्रतिस्पर्धी टीम कोण आहे? त्यावरुन पीच निवडला जातो. इथे काय होतय, मला कळत नाही, कोणाला तरी यावर काहीतरी कराव लागेल” असं मार्क वॉ म्हणाले.

स्टीव्ह स्मिथ काय म्हणाला?

पीचबद्दल माहित नाही, असं स्टीव्ह स्मिथने सुद्धा पत्रकार परिषदेत सांगितलं होतं. पीच पाहण्यासाठी गेलो, त्यावेळी दोन पीच बनून तयार होते. मॅचच्या 48 तास आधी सामना कुठल्या पीचवर होणार, ते त्याला माहित नव्हतं. भारतीय हेड कोच राहुल द्रविड यांनी पीचबद्दल कुठलही कन्फ्यूजन नव्हतं असं सांगितलं. काळ्या मातीच्या पीचवर मॅच होणार, हे द्रविड यांना ठाऊक होतं.