IND vs AUS 4th Test : टीम इंडिया आणि ऑस्ट्रेलियामध्ये बॉर्डर-गावस्कर सीरीजमधला चौथा कसोटी सामना सुरु आहे. पहिल्या तीन कसोटी सामन्यात जे चित्र होतं, बिलकुल त्या उलट स्थिती चौथ्या कसोटी सामन्यात आहे. काल पहिल्या दिवसाच्या खेळावर ऑस्ट्रेलियाने वर्चस्व गाजवलं होतं. दिवसअखेर ऑस्ट्रेलियाच्या 4 बाद 255 धावा झाल्या होत्या. आज टेस्ट मॅचचा दुसरा दिवस आहे. टीम इंडियाचे गोलंदाज आज दुसऱ्यादिवशी कमाल करतील, ही अपेक्षा फोल ठरलीय. टीम इंडियाचे गोलंदाज आजही संघर्ष करताना दिसतायत.
कालची नाबाद असेलली उस्मान ख्वाजा आणि कॅमरुव ग्रीनच्या जोडीने आज डाव पुढे सुरु केला. आज ऑस्ट्रेलियाने 300 धावांचा टप्पा ओलांडला आहे. ख्वाजा आणि ग्रीनमध्ये 130 पेक्षा जास्त धावांची भागीदारी झाली आहे. भारतीय गोलंदाजांना अजूनही ही जोडी फोडता आलेली नाही. टीम इंडियाच्या बॉलर्सचा संघर्ष दिसून येतोय.
ग्रीन-ख्वाजाने वाढवली डोकेदुखी
पहिल्या तीन कसोटीत टीम इंडियाच्या फिरकी गोलंदाजांनी कमाल दाखवली होती. एका सेशनमध्ये त्यांनी ऑस्ट्रेलियाचा डाव गुंडाळला होता. अहमदाबाद कसोटीत अजूनपर्यंत तरी असं होताना दिसलेलं नाही. काल पहिल्या दिवशी उस्मान ख्वाजा-स्टीव्ह स्मिथ जोडीने तिसऱ्या विकेटसाठी 79 धावांची भागीदारी करुन डाव सावरला. आज ग्रीन आणि ख्वाजा जोडीने टीम इंडियाची डोकेदुखी वाढवलीय. दोघेही सहजतेने टीम इंडियाची गोलंदाजी खेळतायत.
टीम इंडियाला जिंकावच लागेल, कारण….
आर.अश्विन आणि रवींद्र जाडेजाकडून अपेक्षा आहेत. पण त्यांना कमाल दाखवता आलेली नाही. दुसऱ्यादिवसाच्या खेळाला सुरुवात झाल्यानंतर क्रॅमरुन ग्रीनने आपलं अर्धशतक पूर्ण केलं. उस्मान ख्वाजा (133) आणि कॅमरुन ग्रीन (71) धावांवर खेळतोय. टीम इंडियासाठी सीरीज जिंकण्यापुरतच या कसोटी सामन्याच महत्त्व नाहीय. वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या फायनलमध्ये दाखल होण्यासाठी टीम इंडियाला टेस्ट मॅच जिंकावीच लागेल.