India vs Australia, 4th Test: भारत आणि ऑस्ट्रेलियामध्ये आजपासून चौथा कसोटी सामना अहमदाबादमध्ये सुरु होणार आहे. मॅचचा आजचा पहिला दिवस खास आहे. कारण टीम इंडिया आणि ऑस्ट्रेलियाचा उत्साह वाढवण्यासाठी दोन्ही देशाचे पंतप्रधान मैदानावर उपस्थित असतील. पंतप्रधान नरेंद्र मोदी टॉसच्यावेळी मैदानावर दिसतील. मोदी कॉमेंट्री करणार अशीही चर्चा आहे. भारतीय टीमने या सीरीजमध्ये पहिले दोन कसोटी सामने जिंकून सीरीजमध्ये 2-0 अशी आघाडी घेतली आहे. ऑस्ट्रेलियाने तिसरा इंदोर कसोटी सामना जिंकून सीरीजमध्ये पुनरागमन केलय.
माजी मंत्री आदित्य ठाकरे यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला अभिवादन.
उस्मान ख्वाजा, स्टीव्ह स्मिथची जोडी अखेर रविंद्र जाडेजाने फोडली. ऑस्ट्रेलियाला 151 धावांवर जाडेजाने स्मिथला बाद करुन तिसरा धक्का दिला. स्मिथने 135 चेंडूत 38 धावा केल्या. त्यानंतर पीटर हँडसकॉम्बला मोहम्मद शमीने 17 रन्सवर बोल्ड केलं. 72 ओव्हर अखेरीस ऑस्ट्रेलियाची स्थिती 174/4 अशी आहे.
62 ओव्हर्सचा खेळ पूर्ण झाला असून ऑस्ट्रेलियाच्या 2 बाद 149 धावा झाल्या आहेत. उस्मान ख्वाजाने अर्धशतक पूर्ण केलय. तो 65 धावांवर खेळतोय. कॅप्टन स्टीव्हन स्मिथ 38 धावांवर आहेत. टीम इंडियाच्या गोलंदाजांचा संघर्ष सुरु आहे.
IND vs AUS Test : मार्नस लाबुशेन फक्त बॅट फिरवत राहिला. एकदा VIDEO बघा.
उस्मान ख्वाजा आणि स्टीव्ह स्मिथची जोडी जमली आहे. ख्वाजा (48) आणि स्मिथ (16) धावांवर खेळतोय. ऑस्ट्रेलियाने 100 धावांचा टप्पा ओलांडला आहे. 46 ओव्हर अखेरीस ऑस्ट्रेलियाच्या 2 बाद 110 धावा झाल्या आहेत.
लंचनंतर खेळाला सुरुवात झाली आहे. 33 ओव्हर अखेरीस ऑस्ट्रेलियाच्या 2 बाद 88 धावा झाल्या आहेत. उस्मान ख्वाजा (39) आणि स्टीव्ह स्मिथ (3) धावांवर खेळतोय.
KS Bharat च्या या चुकीमुळे सगळ्या टीमला शॉक बसला. वाचा सविस्तर…..
लंचला खेळ थांबला असून ऑस्ट्रेलियाच्या 29 ओव्हर्समध्ये 75/2 धावा झाल्या आहेत. उस्मान ख्वाजा (27) आणि स्टीव्ह स्मिथ (2) धावांवर खेळतोय.
मार्नस लाबुशेनच्या रुपाने ऑस्ट्रेलियाची दुसरी विकेट गेली आहे. मोहम्मद शमीने त्याला 3 धावांवर क्लीन बोल्ड केलं. 22.3 ओव्हर्समध्ये ऑस्ट्रेलियाची 73/2 अशी स्थिती आहे. उस्मान ख्वाजा (23) आणि स्टीव्ह स्मिथची (1) जोडी मैदानात आहे.
ऑस्ट्रेलियाला 61 रन्सवर पहिला झटका बसला आहे. दमदार फलंदाजी करणारा ट्रेव्हिस हेड आऊट झाला. अश्विनने त्याला जाडेजाकरवी कॅचआऊट केलं. हेडने 44 चेंडूत 32 धावा करताना 7 चौकार मारले. आता उस्मान ख्वाजा आणि लाबुशेनची जोडी मैदानात आहे.
ऑस्ट्रेलियाने चांगली सुरुवात केली आहे. 13 ओव्हर अखेरीस ऑस्ट्रेलियाच्या बिनबाद 52 धावा झाल्या आहेत. सलामीवीर ट्रेव्हीस हेड 31 आणि उस्मान ख्वाजाची 10 जोडी मैदानात आहे.
6 ओव्हर्समध्ये ऑस्ट्रेलियाच्या बिनाबाद 23 धावा झाल्या आहेत. ट्रेव्हीस हेड (7) आणि उस्मान ख्वाजा (5) ही सलामीवीराची जोडी मैदानात आहे.
3 ओव्हर्समध्ये ऑस्ट्रेलियाच्या बिनबाद 15 धावा झाल्या आहेत. ट्रेव्हीस हेड आणि उस्मान ख्वाजा या सलामीवीराची जोडी मैदानात आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी टीम इंडियाचा कॅप्टन रोहित शर्माला आणि ऑस्ट्रेलियाच्या पंतप्रधानांनी स्टीव्ह स्मिथला एक खास कॅप भेट दिली.
The Honourable Prime Minister of India, Shri Narendra Modiji presents the special cap to #TeamIndia captain @ImRo45 while The Honourable Prime Minister of Australia, Mr Anthony Albanese presents the cap to Australia captain Steve Smith.@narendramodi | @PMOIndia | #INDvAUS pic.twitter.com/8RH70LOx0v
— BCCI (@BCCI) March 9, 2023
ऑस्ट्रेलिया: ट्रेविस हेड, उस्मान ख्वाजा, मार्नस लाबुशेन, स्टीव स्मिथ (कॅप्टन), पीटर हँड्सकॉम्ब, कॅमरुन ग्रीन, एलेक्स कॅरी, मिचेल स्टार्क, नाथन लायन, टॉड मर्फी, मॅथ्यू कुहनेमन
4TH TEST. Australia XI: T Head, U Khawaja, S Smith (c), M Labuschagne, C Green, P Handscomb, A Carey (wk), M Starc, T Murphy, N Lyon, M Kuhnemann. https://t.co/KjJudHw47Q #INDvAUS @mastercardindia
— BCCI (@BCCI) March 9, 2023
भारत : रोहित शर्मा ( कॅप्टन), शुभमन गिल, चेतेश्वर पुजारा, विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएस भरत, अश्विन, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, मोहम्मद शमी, उमेश यादव
4TH TEST. India XI: S Gill, R Sharma (c), C Pujara, V Kohli, S Iyer, S Bharat (wk), A Patel, R Ashwin, R Jadeja, U Yadav, M Shami. https://t.co/KjJudHw47Q #INDvAUS @mastercardindia
— BCCI (@BCCI) March 9, 2023
भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्या मैत्रीला 75 वर्ष पूर्ण होत आहेत. म्हणून एका खास नाण्याचा वापर करण्यात आला.
#BorderGavaskarTrophy2023 | Australia win the toss and opt to bat first against India in the final Test match of the series, at Narendra Modi Stadium in Ahmedabad.
India is leading 2-1.
(Pic: Outside the stadium this morning) pic.twitter.com/0w0wli6xaT
— ANI (@ANI) March 9, 2023
भारत-ऑस्ट्रेलिया चौथ्या कसोटी सामन्यात ऑस्ट्रेलियाचा कॅप्टन स्टीव्ह स्मिथने टॉस जिंकला आहे. त्याने पहिली बॅटिंग करण्याचा निर्णय घेतलाय.
4TH TEST. Australia won the toss and elected to bat. https://t.co/KjJudHw47Q #INDvAUS @mastercardindia
— BCCI (@BCCI) March 9, 2023
भारत-ऑस्ट्रेलिया चौथ्या कसोटी सामन्यासाठी मोठ्या संख्येने प्रेक्षक उपस्थित आहेत. ऑस्ट्रेलियन पंतप्रधान येणार असल्याने एका खास रथ बनवण्यात आला होता. त्यामधून पंतप्रधान मोदी आणि ऑस्ट्रेलियन पंतप्रधान अँथनी अल्बनीज यांनी संपूर्ण स्टेडियमला एक फेरी मारली व उपस्थित प्रेक्षकांना हात उंचावून अभिवानद केलं.
ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान अँथनी अल्बनीज नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये दाखल झाले आहेत. पंतप्रधान मोदींनी गळाभेट घेऊन स्टेडियममध्ये त्यांच स्वागत केलं.
#WATCH | Gujarat: Australian Prime Minister Anthony Albanese arrives at Narendra Modi Stadium in Ahmedabad, Prime Minister Modi welcomes him to the venue.
The two Prime Ministers will watch the final match of the #BorderGavaskarTrophy2023 that will begin shortly here. pic.twitter.com/Uv8hevlhzo
— ANI (@ANI) March 9, 2023
ऑस्ट्रेलियन टीमने आधीच वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या फायनलमध्ये प्रवेश केला आहे. भारताला WTC च्या फायनलमध्ये पोहोचण्यासाठी चौथा कसोटी सामना जिंकावाच लागेल.
Hello from the world’s largest cricket stadium – the Narendra Modi Stadium, Ahmedabad ?️?#TeamIndia are all set to take on Australia in the fourth #INDvAUS Test ??@GCAMotera | @mastercardindia pic.twitter.com/9IITpGMUNJ
— BCCI (@BCCI) March 9, 2023
पंतप्रधान नरेंद्र मोदी अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये दाखल झाले आहेत. राज्यपाल आचार्य देवव्रत, मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल, राज्याचे गृहमंत्री हर्ष सांघवी, बीसीसीआय अध्यक्ष रॉजर बिन्नी आणि बीसीसीआय सचिव जय शाह यांनी पंतप्रधान मोदींच स्वागत केलं.
Gujarat | Prime Minister Narendra Modi arrives at Narendra Modi Stadium in Ahmedabad.
Governor Acharya Devvrat, CM Bhupendra Patel, state’s Home Minister Harsh Sanghavi, BCCI president Roger Binny and BCCI secretary Jay Shah receive him. #BorderGavaskarTrophy2023 pic.twitter.com/daNobYUd5D
— ANI (@ANI) March 9, 2023