IND vs AUS Test : वॉर्नरने मोहम्मद सिराजच्या हातातून रक्त काढलं, त्यानंतर शांत बसेल तो सिराज कुठला?

| Updated on: Feb 17, 2023 | 11:08 AM

IND vs AUS Test : मोहम्मद सिराजने दिल्ली टेस्टमध्ये ऑस्ट्रेलियन ओपनर डेविड वॉर्नर आणि उस्माना ख्वाजा यांना सुरुवातीच्या ओव्हर्समध्ये हैराण केलं. पण याच दरम्यान चौथ्या ओव्हरमध्ये एका छोटीशी दुर्घटना घडली.

IND vs AUS Test : वॉर्नरने मोहम्मद सिराजच्या हातातून रक्त काढलं, त्यानंतर शांत बसेल तो सिराज कुठला?
Siraj-warner
Image Credit source: Getty Images
Follow us on

IND vs AUS 2nd Test : टीम इंडियाचा वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराज अनेकदा आपल्या स्विंग गोलंदाजीने फलंदाजांना हैराण करतो. दिल्ली टेस्टमध्ये सुरुवातीच्या ओव्हर्समध्ये हे दिसून आलं. मोहम्मद सिराजने दिल्ली टेस्टमध्ये ऑस्ट्रेलियन ओपनर डेविड वॉर्नर आणि उस्माना ख्वाजा यांना सुरुवातीच्या ओव्हर्समध्ये हैराण केलं. पण याच दरम्यान चौथ्या ओव्हरमध्ये एका छोटीशी दुर्घटना घडली. मोहम्मद सिराजच्या अंगठ्याला दुखापत झाली. वॉर्नरचा एक फटका सिराजच्या हाताला लागला. अंगठ्या जवळच्या भागात कट झालं. त्यामुळे काहीवेळासाठी सामना थांबवावा लागला.

चौथ्या ओव्हरच्या तिसऱ्या चेंडूवर मोहम्मद सिराजसोबत ही दुर्घटना घडली. मोहम्मद सिराजच्या चेंडूवर डेविड वॉर्नरने स्ट्रेट शॉट मारला. चेंडू रोखण्यायासाठी सिराजने हात पुढे केला. चेंडू अंगठा आणि बोटाच्यामध्ये लागला. आघात इतका जोरात झाला की, हातातून रक्तस्त्राव सुरु झाला.

सिराजने हार नाही मानली

मोहम्म सिराजच्या हातातून रक्त निघाल्यानंतर भारतीय टीमचे फिजियो लगेच ग्राऊंडवर पोहोचले. त्याने या वेगवान गोलंदाजाच्या हातावर पट्टी बांधली. महत्त्वाच म्हणजे मार लागल्यानंतरही मोहम्मद सिराजने आपली ओव्हर पूर्ण केली. मोहम्मद सिराज पुन्हा एकदा ओव्हर टाकण्यासाठी आला. सिराजने चौथ्या ओव्हरमध्ये कमालीचा बाऊन्सर टाकून उस्मान ख्वाजाला हैराण केलं. सिराजने वॉर्नरवर बाऊन्सरचा मारा केला. त्यावेळी एक बॉल त्याच्या हाताच्या कोपराला लागला.

ऑस्ट्रेलियाकडून या खेळाडूचा डेब्यु

दुसऱ्या कसोटी सामन्यात ऑस्ट्रेलियाने मॅट रेनशॉच्या जागी पुन्हा ट्रेविस हेडचा टीममध्ये समावेश केलाय. स्कॉट बोलँडला सुद्धा बाहेर केलय. मॅथ्यू कुहनेमन दिल्ली टेस्टमध्ये डेब्यु करेल. ऑस्ट्रेलियाने या कसोटीत टॉस जिंकून पहिली बॅटिंग करण्याचा निर्णय घेतला.

टीम इंडियाची प्लेइंग 11 : रोहित शर्मा (कॅप्टन), केएल राहुल, चेतेश्वर पुजारा, विराट कोहली, श्रेयस अय्यर, रविंद्र जाडेजा, श्रीकर भरत (विकेटकीपर), अक्षर पटेल, आर. अश्विन, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज,

ऑस्ट्रेलियाची प्लेइंग 11 – पॅट कमिन्स (कॅप्टन), डेविड वॉर्नर, उस्मान ख्वाजा, मार्नस लाबुशेन, स्टीव स्मिथ, ट्रेविस हेड, पीटर हँड्सकॉम्ब, एलेक्स कॅरी (विकेटकीपर), टॉड मर्फी, नाथन लायन आणि मॅथ्यू कुहनेमन .