IND vs AUS 3rd Test : बॉर्डर-गावस्कर सीरीजचा तिसरा कसोटी सामना आजपासून सुरु होत आहे. इंदोरच्या होळकर स्टेडियममध्ये तिसरा कसोटी सामना खेळला जाणार आहे. या कसोटीत टॉस भारताने जिंकला. कॅप्टन रोहित शर्माने टॉस जिंकून पहिली बॅटिंग करण्याचा निर्णय घेतला आहे. टॉसनंतर दोन्ही टीम्सनी आपल्या प्लेइंग इलेव्हनची घोषणा केली. रोहित शर्माने अखेर तिसऱ्या कसोटी सामन्यात आपली चूक सुधारली आहे. त्याने फ्लॉप असलेल्या केएल राहुलला ड्रॉप करुन त्याच्याजागी शुभमन गिलला संधी दिली आहे.
4 टेस्ट मॅचच्या सीरीजमध्ये टीम इंडिया 2-0 ने आघाडीवर आहे. म्हणजे भारत आता सीरीज गमावणार नाही. गतविजेता असल्याने बॉर्डर-गावस्कर ट्रॉफी आता भारताकडेच रहाणार आहे. पण इंदोर कसोटी जिंकणं टीम इंडियासाठी महत्त्वाच आहे. कारण इंदोर टेस्ट जिंकल्यास टीम इंडियासाठी WTC फायनलच तिकीट पक्कं होईल.
मोहम्मद शमी ड्रॉप
WTC फायनलमधील प्रवेशाच गणित लक्षात घेता, टीम इंडियाने इंदोर कसोटीत आपला मजबूत संघ उतरवला आहे. टीम इंडियाने या कसोटीसाठी निवडलेल्या प्लेइंग 11 वरुन ते लक्षात येतं. दोन्ही टीम्सनी आपल्या प्लेइंग 11 मध्ये दोन-दोन बदल केले आहेत. भारतीय टीममध्ये केएल राहुलच्या रुपात एक महत्त्वपूर्ण बदल झालाय. त्याला ड्रॉप करुन शुभमन गिलला संधी दिलीय. दुसरा बदल गोलंदाजीत आहे. मोहम्मद शमीच्या जागी उमेश यादवला स्थान दिलय.
रोहितने चूक सुधारली
केएल राहुलला टीममधून ड्रॉप करण्याची मागणी बऱ्याच महिन्यांपासून होत आहे. राहुल फॉर्ममध्ये नाहीय. ऑस्ट्रेलिया विरुद्ध पहिल्या दोन कसोटी सामन्यातही त्याच प्रदर्शन खास नाहीय. केएल राहुलवरुन वेगवेगळे मतप्रवाह आहेत. राहुलला ड्रॉप करण्याची सर्वसामान्य क्रिकेटप्रेमींची मागणी होती. पण दिग्गज खेळाडूंमध्ये त्यावरुन दोन गट पडले आहेत. राहुल टॅलेंटेड असल्याने त्याला संधी द्यावी, असं काही जणांचा मत आहे.
भारताची प्लेइंग XI: रोहित शर्मा (कॅप्टन), शुभमन गिल, चेतेश्वर पुजारा, विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएस भरत, अश्विन, रविंद्र जडेजा, अक्षर पटेल, उमेश यादव, मोहम्मद सिराज
ऑस्ट्रेलियाची प्लेइंग XI: ट्रेविस हेड, उस्मान ख्वाजा, मार्नस लाबुशेन, स्टीव स्मिथ (कॅप्टन), पीटर हँड्सकॉम्ब, कॅमरन ग्रीन, एलेक्स कॅरी, मिचेल स्टार्क, टॉड मर्फी, नाथन लॉयन, मॅथ्यू कुहनेमन