Womens T20 World Cup : भारतीय महिला क्रिकेट टीमने सोमवारी आयर्लंडवर विजय मिळवून सेमीफायनलमध्ये प्रवेश केला. आता सेमीफायनलमध्ये टीम इंडियाचा सामना ऑस्ट्रेलिया विरुद्ध होईल अशी चर्चा आहे. असच घडण्याची शक्यता दाट आहे. पण त्याचवेळी क्रिकेट हा अनिश्चिततेचा खेळ आहे, हे विसरुन चालणार नाही. क्रिकेटमध्ये काहीही घडू शकतं. 21 फेब्रुवारीला पाकिस्तान आणि इंग्लंडमध्ये सामना होणार आहे. या मॅचमध्ये निकाल उलट लागल्यास टी 20 वर्ल्ड कपची सेमीफायनल भारत-ऑस्ट्रेलियामध्ये होणार नाही.
सेमीफायनल कशी टळणार?
महिला T20 वर्ल्ड कपचा पहिला सेमीफायनल सामना 23 फेब्रुवारीला होणार आहे. दुसरा सेमीफायनल सामना 24 फेब्रुवारीला होईल. आतापर्यंत जे अंदाज वर्तवले जातायत, त्यानुसार भारत-ऑस्ट्रेलियामध्ये पहिली सेमीफायनल मॅच होईल. टीम इंडिया ग्रुपमध्ये दुसऱ्या स्थानावर आहे. हीच टीम इंडिया पहिल्या स्थानावर पोहोचल्यास ऑस्ट्रेलिया विरुद्धची सेमीफायनल टळू शकते. हे होणार कसं? हा मोठा प्रश्न आहे.
काय आहे गणित?
क्रिकेटमध्ये काहीही अशक्य नाहीय. त्यामुळेच क्रिकेटला अनिश्चिततेचा खेळ म्हटलं जातं. भारत ग्रुप स्टेजमध्ये दुसऱ्यावरुन पहिल्या स्थानावर पोहोचू शकतो. पाकिस्तान विरुद्ध इंग्लंड सामन्यात पाकिस्तान टीमने मोठ्या फरकाने विजय मिळवल्यास हे घडू शकतं.
असं झाल्यास भारत-ऑस्ट्रेलिया सामना होणार नाही
सेमीफायनलमध्ये भारतासमोर ऑस्ट्रेलियाच अवघड आव्हान आहे. पाकिस्तानची टीम आजची मॅच जिंकल्यास टीम इंडियाला कदाचित ऑस्ट्रेलियाचा सामना करावा लागणार नाही. पण कसं, ते जाणून घ्या. पाकिस्तानच्या टीमने आज इंग्लंड विरुद्ध पहिली बॅटिंग केल्यास विजयाच अंतर 73 पेक्षा जास्त असलं पाहिजे. टार्गेट चेस करताना 65 किंवा त्यापेक्षा जास्त चेंडू बाकी राखून विजय मिळवावा लागेल. म्हणजे पाकिस्तानच्या टीमला 9 ओव्हरमध्येच इंग्लंडकडून मिळालेलं टार्गेट पार करावं लागेल.
क्रिकेटमध्ये काहीही घडू शकतं
T20 वर्ल्ड कपमध्ये पाकिस्तानचा इंग्लंड विरुद्ध मोठ्या विजयाचा मार्ग खूपच बिकट आहे. म्हणूनच भारत-ऑस्ट्रेलियामध्ये सेमीफायनलचा सामना होईल, असं म्हटलं जातय. पण क्रिकेटमध्ये काहीही घडू शकतं. क्रिकेटा हा अनिश्चिततेचा खेळ आहे.