मुंबई: भारत आणि ऑस्ट्रेलियामध्ये उद्यापासून टी 20 सीरीज सुरु होतेय. वर्ल्ड कपआधी ही मालिका होत आहे. मोहालीच्या पीसीए स्टेडियमवर उद्या पहिला सामना खेळला जाणार आहे. ऑस्ट्रेलिया विरुद्ध सीरीज संपल्यानंतर टीम इंडिया दक्षिण आफ्रिकेविरुद्ध मालिका खेळणार आहे. त्यानंतर टीम टी 20 वर्ल्ड कपसाठी ऑस्ट्रेलियाला रवाना होईल.
शमीच्या जागी उमेश यादवला संधी
ऑस्ट्रेलिया सीरीजसाठी मोहम्मद शमीची टीममध्ये निवड झाली होती. पण त्याला कोविड-19 ची लागण झाली. त्यामुळे आता तो मालिकेत खेळणार नाही. त्याच्याजागी उमेश यादवला संधी देण्यात आली आहे.
शेवटचा टी 20 सामना कधी खेळला?
टीम इंडियाकडून ऑस्ट्रेलियाविरुद्ध तो शेवटचा टी 20 सामना 2019 मध्ये खेळला होता. उमेश आता दुखापतीमधून सावरला आहे. त्यामुळेच तो इंग्लंडमध्ये काऊंटी खेळू शकला नाही.
कधी, कुठे आणि कसा पाहू शकता सामना?
भारत आणि ऑस्ट्रेलियामध्ये पहिला T20 सामना कुठे खेळला जाणार?
भारत आणि ऑस्ट्रेलियामध्ये पहिला T20 सामना मोहालीच्या आयएस बिंद्रा स्टेडियममध्ये खेळला जाणार.
भारत आणि ऑस्ट्रेलियामध्ये पहिला T20 सामना कधी खेळला जाणार?
भारत आणि ऑस्ट्रेलियात पहिला T20 सामना 20 सप्टेंबरला संध्याकाळी 7.30 वाजता सुरु होणार. मॅचचा टॉस संध्याकाळी 7 वाजता उडवला जाईल.
भारत आणि ऑस्ट्रेलियामधील पहिल्या T20 सामन्याचं थेट प्रसारण कुठे होणार?
भारत आणि ऑस्ट्रेलियामधील पहिल्या T20 सामन्यांच लाइव्ह प्रसारण Star Sports Network च्या वेगवेगळ्या चॅनलवर केलं जाईल.
भारत आणि ऑस्ट्रेलियामधील पहिल्या T20 मॅचच लाइव स्ट्रीमिंग कुठे पाहता येईल?
भारत आणि ऑस्ट्रेलियामधील पहिल्या T20 मॅचच लाइव स्ट्रीमिंग Disney+ Hotstar वर पाहू शकता. त्याशिवाय मॅचची प्रत्येक अपडेट तुम्ही tv9Matathi.com लाइव्ह ब्लॉगमध्ये पाहू शकता.