मुंबई: मोहालीमधल्या पहिल्या T20 सामन्यात टीम इंडियाचा 4 विकेटने पराभव झाला. 208 धावा करुनही टीम इंडियाने सामना गमावला. खराब गोलंदाजी या पराभवाच मुख्य कारण आहे. मॅच हरल्यानंतर टीकाकारांकडून सातत्याने रोहितच्या टीमला लक्ष्य केलं जातय. अनेक माजी क्रिकेटपटू टीम इंडियाची रणनिती आणि खेळाडूंच्या प्रदर्शनावर टीका करतायत.
ही नाण्याची दुसरी बाजू
पराभव हा नेहमीच जिव्हारी लागतो. पण या पराभवामुळे टीम इंडियाला फायदा सुद्धा होतोय. ही नाण्याची दुसरी बाजू आहे. टी 20 वर्ल्ड कप आधी टीम इंडियाचा पराभव झालाय. या पराभवामुळे आगामी काळात टीम इंडियाचा निश्चित फायदा होईल. जाणून घ्या कसा फायदा होणार ते.
काय चुकलं?
मोहालीमध्ये टीम इंडियाच्या गोलंदाजांनी खराब लाइन-लेंग्थवर गोलंदाजी केली. परिणामी ऑस्ट्रेलियाने 4 चेंडू आधीच 209 धावांचे विशाल लक्ष्य गाठले. भुवनेश्वर कुमारने 4 ओव्हर्समध्ये 52 धावा दिल्या. युजवेंद्र चहलने 20 चेंडूत 42 धावा दिल्या. हर्षल पटेलने 4 ओव्हर्समध्ये 49 धावा दिल्या.
प्रति ओव्हर इकॉनमी रेट किती?
पंड्या आणि उमेश यादवचा इकॉनमी रेट प्रति ओव्हर 10 पेक्षा जास्त होता. अशा सामन्यांमधून योग्य गोलंदाजांची ओळख होत आहे. कुठला गोलंदाज डेथ ओव्हर्समध्ये चांगली गोलंदाजी करु शकतो? कुठला गोलंदाज पावरप्लेमध्ये चांगली गोलंदाजी करु शकतो? ते लक्षात येतय. डेथ ओव्हर्समध्ये भुवनेश्वर कुमारला गोलंदाजी देणं सध्याच्या घडीला योग्य निर्णय नाहीय. अक्षर पटेलच्या हाती चेंडू कधी द्यायचा, ते सुद्धा टीम मॅनेजमेंटच्या लक्षात आलं असेल.
कमकुवत बाजू कळली?
मोहाली मधल्या पराभवामुळे टीम इंडियाची आणखी एक कमकुवत बाजू समोर आली आहे. फिल्डर्सनी खूप खराब कामगिरी केली. अक्षर पटेल, केएल राहुल आणि हर्षल पटेल सोप्या कॅच सोडल्या. त्यामुळे टीम इंडियाच मोठं नुकसान झालं. त्यामुळे फिल्डिंगवर मेहनत घ्यायची गरज आहे.
कुठे सुधारणा करण्याची गरज?
मोहलीमध्ये हरलो. पण टीममध्ये कुठे सुधारणा करण्याची आवश्यकता आहे, ते रोहित शर्माला कळलं असेल. खासकरुन गोलंदाजीच्या आघाडीवर खूपच विचारपूर्वक पावलं उचलावी लागणार आहेत.
टीम इंडियाने 208 धावा केल्या. पण यात विराट कोहली, रोहित शर्माच योगदान अगदीच नगण्य होतं. या दोघांना आपल्या बॅटिंगवर अजून जास्त मेहनत करण्याची आवश्यकता आहे. हे दोघे विकेटवर टिकले, तर आणखी जास्त धावा होतील.