Border-Gavaskar Series : बॉर्डर-गावस्कर सीरीजमध्ये आतापर्यंत तीन कसोटी सामने झालेत. पहिले दोन कसोटी सामने जिंकून भारतीय टीमने ट्रॉफी रिटेन केलीय. पण इंदोर कसोटीत टीम इंडियाला पराभवाचा धक्का बसला. ऑस्ट्रेलियन दिग्गज आपल्या टीमच्या विजयाने आनंदीत आहेत. पण भारतीय खेळपट्टयांबद्दल अजूनही त्यांच्याकडून उलट-सुलट वक्तव्य सुरु आहेत. भारताचे प्रसिद्ध क्रिकेटपटू सुनील गावस्कर यांनी या ऑस्ट्रेलियन दिग्गजांवर सडकून टीका केलीय. त्यांच्या टीकेचा समाचार घेताना रास्त मुद्दे उपस्थित केलेत. ऑस्ट्रेलियन्सनी भारतीय पीचेसवर प्रश्नचिन्ह उपस्थित करु नये, उलट आपल्या सिलेक्टर्सना प्रश्न विचारले पाहिजेत.
सुनील गावस्करांच परखड भाष्य
सुनील गावस्करांनी ऑस्ट्रेलियन सिलेक्टर्सवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलय. ऑस्ट्रेलियन सिलेक्टर्सना टीम निवडता येत नाही, असं म्हटलं आहे. “सिलेक्टर्सच्या चुकीमुळे 15 ऐवजी 12 खेळाडूंमधून प्लेइंग इलेव्हन निवडावी लागली. ऑस्ट्रेलियन सिलेक्टर्सनी राजीनामा दिला पाहिजे” असं परखड भाष्य गावस्करांनी केलं.
त्या तिघांना निवडलच कसं?
ऑस्ट्रेलियाचे दिग्गजांनी आपल्या सिलेक्टर्सना जाब विचारला पाहिजे. जोश हेझलवडू, मिचेल स्टार्क आणि कॅमरुन ग्रीन सारख्या गोलंदाजांची तुम्ही निवड कशी केली? पहिल्या दोन टेस्ट मॅचसाठी हे गोलंदाजच उपलब्ध नव्हते. त्यांना केवळ 13 प्लेयर्समधून टीम निवडावी लागली.
सिलेक्टर्सनी राजीनामा दिला पाहिजे
नवीन खेळाडू मॅथ्यू कुहनेमनला तिसऱ्या कसोटीत संधी दिली. ऑस्ट्रेलियाकडे आधीपासूनच असा खेळाडू उपलब्ध होता. तुम्हाला तुम्ही आधी निवडलेल्या खेळाडूंवर विश्वास नव्हता. मग तुम्ही त्यांची निवडच का केली? म्हणजे त्यांनी 12 खेळाडूंमधून आपली प्लेइंग इलेव्हन निवडली. ऑस्ट्रेलियन सिलेक्टर्सना आपल्या जबाबदारीची जाणीव नाहीय. त्यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला पाहिजे.