IND vs AUS 3rd Test : पॅट कमिन्स संदर्भात खराब बातमी, ऑस्ट्रेलियाला मिळणार नवीन कॅप्टन

| Updated on: Feb 24, 2023 | 12:13 PM

IND vs AUS 3rd Test : डेविड वॉर्नर दुखापतीमुळे उर्वरित कसोटी मालिकेत खेळू शकणार नाहीय. एश्टन एगरलाही मायदेशी पाठवण्यात आलय. जोश हेझलवूडही दुखापतीमुळे खेळू शकणार नाहीय. आता त्यांना आणखी एक मोठा झटका बसलाय.

IND vs AUS 3rd Test : पॅट कमिन्स संदर्भात खराब बातमी, ऑस्ट्रेलियाला मिळणार नवीन कॅप्टन
Australian Team
Image Credit source: AFP
Follow us on

IND vs AUS 3rd Test : भारत दौऱ्यावर आलेल्या ऑस्ट्रेलियन टीमची स्थिती खूपच खराब आहे. मालिकेत ते आधीच 2-0 ने पिछाडीवर पडले आहेत. आता उर्वरित दोन कसोटी सामन्यांआधी त्यांचा निम्मा संघ मायदेशी परतलाय. यामागे दुखापती हे प्रमुख कारण आहे. डेविड वॉर्नर दुखापतीमुळे उर्वरित कसोटी मालिकेत खेळू शकणार नाहीय. एश्टन एगरलाही मायदेशी पाठवण्यात आलय. जोश हेझलवूडही दुखापतीमुळे खेळू शकणार नाहीय. आता त्यांना आणखी एक मोठा झटका बसलाय. टीमचा कॅप्टन पॅट कमिन्स तिसऱ्या इंदूर कसोटीत खेळणार नाहीय. कुटुंबातील सदस्य आजारी असल्याने कमिन्स मायदेशी परतला होता. सध्या तो सिडनीमध्ये आहे. आता पॅट कमिन्स तिसऱ्या कसोटी सामन्यासाठी परत येणार नसल्याचं स्पष्ट झालाय.

ते वृत्त खरं ठरलं

सुरुवातीला पॅट कमिन्स ऑस्ट्रेलियाला जाणार असल्याच वृत्त आलं, त्यावेळी तो उर्वरित दोन कसोटी सामन्यांसाठी भारतात परतणार असल्याचं सांगण्यात आलं. नंतर, कमिन्स भारतात परतणार नाही, असं वृत्त आलं. आता पॅट कमिन्स तिसऱ्या इंदूर कसोटीसाठी परत येणार नसल्याचं स्पष्ट झालय. पॅट कमिन्सची आई आजारी असल्याने तो सिडनीला गेलाय.

आईची तब्येत जास्त खराब

पॅट कमिन्सच्या आईची तब्येत जास्त खराब आहे. त्यामुळे तो सिडनीमध्येच थांबणार आहे. आता मी भारतात परत येणार नाही, असं कमिन्सने सांगितलं. मला आता माझ्या कुटुंबासोबत रहायच आहे. समर्थनासाठी त्याने टीमचे आभार मानलेत.


स्टीव्ह स्मिथ करणार नेतृत्व

पॅट कमिन्सच्या अनुपस्थितीत स्टीव्ह स्मिथ ऑस्ट्रेलियाच नेतृत्व करेल. स्टीव्ह स्मिथने याआधी ऑस्ट्रेलियाच नेतृत्व केलय. पण सँड पेपर वादामुळे त्याला कर्णधारपदावरुन हटवण्यात आलं. भारत-ऑस्ट्रेलियामध्ये तिसरा कसोटी सामना इंदोरमध्ये 1 मार्चपासून सुरु होणार आहे. भारत टेस्ट सीरीजमध्ये 2-0 ने आघाडीवर आहे. अजून एक विजय मिळवल्यास ते टेस्ट सीरीज जिंकतील. सोबतच वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपसाठी सुद्धा क्वालिफाय करतील.

ऑस्ट्रेलियासाठी एक चांगली बातमी

तिसऱ्या टेस्ट मॅचआधी ऑस्ट्रेलियासाठी एक चांगली बातमी सुद्धा आहे. कॅमरुन ग्रीन तिसऱ्या टेस्टसाठी टीममध्ये पुनरागमन करु शकतो. पहिल्या दोन कसोटीत तो दुखापतीमुळे खेळू शकला नाही. आता 100 टक्के फिट असल्याच ग्रीनने सांगितलं. इंदोर कसोटीत तो खेळू शकतो. मिचेल स्टार्क सुद्धा इंदोर कसोटीत खेळण्याची शक्यता आहे.