IND vs AUS Test : पुढच्या आठवड्यापासून भारत-ऑस्ट्रेलियामध्ये 4 टेस्ट मॅचची सीरीज सुरु होणार आहे. पहिला सामना 9 फेब्रुवारीला बंगळुरुमध्ये होईल. त्यासाठी ऑस्ट्रेलियाने बंगळुरुमध्ये तयारी सुरु केलीय. पाहुण्या टीमच्या ट्रेनिंग सेशनमध्ये एक वेगळच दुश्य पहायला मिळालं. आर. अश्विनचा डुप्लीकेट स्टीव्ह स्मिथसह संपूर्ण ऑस्ट्रेलियन टीमला बॅटिंग प्रॅक्टिस देत होता. अश्विनसारखीच बॉलिंग Action असलेला गोलंदाज ऑस्ट्रेलियन टीमला प्रॅक्टिस देत होता. आर.अश्विनच्या या डुप्लीकेटच नाव आहे, महेश पिथिया. तो जूनागढचा आहे.
आर्थिक स्थिती खूपच खराब होती
पिथियाची बॉलिंग Action पाहून त्याला आर.अश्विनच डुप्लीकेट म्हटलं जातं. एकवेळी महेश पिथियाची आर्थिक स्थिती खूपच खराब होती. त्याच्या घरी साधा टीव्ही नव्हता. वयाच्या 11 व्या वर्षापर्यंत त्याने अश्विनला कधी गोलंदाजी करताना पाहिलं नव्हतं.
फोटोंनी भरला फोन
पिथियाने 2013 साली वेस्ट इंडिज विरुद्ध आर.अश्विनला पहिल्यांदा गोलंदाजी करताना पाहिलं. त्यादिवसापासून त्याचा फोन अश्विनच्या फोटोंनी भरला. मागच्यावर्षी डिसेंबर महिन्यात पिथियाने बडोद्याकडून फर्स्ट क्लास क्रिकेटमध्ये डेब्यु केला. हा सामना उत्तर प्रदेश विरुद्ध होता. त्यानंतर त्याच्या करिअरमध्ये प्रगती होत गेली. त्याची गोलंदाजी Action अश्विन सारखीच आहे.
विना ब्रेक गोलंदाजी
महेश पिथिया आता ऑस्ट्रेलियाला त्यांच्या सर्वात मोठ्या आव्हानासाठी तयार करतोय. 4 सामन्यांच्या कसोटी मालिकेत आर.अश्विनपासून ऑस्ट्रेलियाला सर्वात जास्त धोका आहे. ऑस्ट्रेलियाला जसं अश्विनच्या डुप्लीकेटच फुटेज मिळालं. त्यांनी लगेच त्याला प्रॅक्टिससाठी ट्रेनिंग कॅम्पमध्ये बोलवून घेतलं. ट्रेनिंग सेशनमध्ये ऑस्ट्रेलियाचा पूर्ण फोकस स्पिन गोलंदाजीवर होता.
पिथियाच नाव कोणी सुचवलं?
पिथियाने संपूर्ण दिवस विना ब्रेक गोलंदाजी केली. त्याच्या बॉलिंगने स्मिथ, मार्नस लाबुशेन आणि ट्रेविस हेडला चांगलचं सतावलं. प्रीतेश जोशीने ऑस्ट्रेलियाचे असिस्टेंट कोच आंद्रे बोरेवेच यांना पिथियाच नाव सुचवलं.