मुंबई: टीम इंडिया आणि ऑस्ट्रेलियामध्ये सध्या T20 सीरीज सुरु आहे. तीन सामन्यांच्या मालिकेतील दुसरा सामना नागपूरमध्ये खेळला जाणार आहे. तिसरा सामना हैदराबादमध्ये होणार आहे. मात्र या सामन्याआधी मोठा गोंधळ झाला आहे. सातजण जखमी झाले आहेत. हा सर्व गोंधळ हैदराबादमध्ये झालाय. नागपूरनंतर टीम इंडिया हैदराबादला रवाना होणार आहे.
सकाळी 3 वाजल्यापासूनच रांग
या मॅचसाठी चाहते खूपच उत्साहात आहेत. मॅचच्या तिकीट खरेदीसाठी जिमखाना ग्राऊंडटच्या बाहेर सकाळी 3 वाजल्यापासूनच चाहत्यांनी रांग लागली होती. बघता, बघात गर्दी वाढत गेली. अखेर जमाव नियंत्रणाबाहेर गेला. जमावावर नियंत्रण मिळवण्यासाठी पोलिसांना लाठीमार करावा लागला. त्यामुळे गोंधळ उडाला. सात चाहते जखमी झाले आहेत. यात 4 महिला, 3 पुरुष आणि एका पोलिसाचा समावेश आहे.
This is so disappointing. Passionated fans gathered at Gymkhana Ground to collect India Vs Australia tickets in Hyderabad and they’re getting such treatment. pic.twitter.com/OIP96BClOH
— Mufaddal Vohra (@mufaddal_vohra) September 22, 2022
3 वर्षानंतर हैदराबादमध्ये मॅच
हैदराबादमध्ये चाहते बऱ्याचकाळापासून आंतरराष्ट्रीय क्रिकेट मॅचची वाट पाहत होते. 3 वर्षानंतर 25 सप्टेंबरला ही प्रतिक्षा संपणार आहे. विराट कोहली, रोहित शर्मा, केएल राहुल आणि अन्य स्टार्सना पाहण्यासाठी चाहते आतुर आहेत. हैदराबादमध्ये शेवटचा आंतरराष्ट्रीय सामना डिसेंबर 2019 मध्ये वेस्ट इंडिज विरुद्ध झाला होता. त्यानंतर एकही आंतरराष्ट्रीय मॅच झालेली नाही.
हैदराबादमध्ये फायनल सामना
भारत-ऑस्ट्रेलियामधील पहिला टी 20 सामना मोहालीमध्ये झाला. टीम इंडियाचा या मॅचमध्ये ऑस्ट्रेलियाने 4 विकेटने पराभव केला. उद्या 23 सप्टेंबरला नागपूरमध्ये सामना होणार आहे. सीरीज वाचवण्यासाठी रोहित शर्माला कुठल्याही परिस्थितीत नागपूरची मॅच जिंकावीच लागेल. टीम इंडियाने नागपूरमध्ये जिंकण आवश्यक आहे. त्यानंतर हैदराबादमधील तिसऱ्या टी 20 सामन्याचा रोमांच वाढेल.