ढाका: टीम इंडियाची आजपासून बांग्लादेश विरुद्ध वनडे सीरीज सुरु होत आहे. ही मालिका सुरु होत असतानाच टीम इंडियाला एक मोठा झटका बसला आहे. टॉसच्यावेळी ही माहिती समोर आली. काल मोहम्मद शमी खांद्याच्या दुखापतीमुळे वनडे सीरीजमधून बाहेर गेला. आता त्यात आणखी एका खेळाडूची भर पडली आहे. टीम इंडियाचा विकेटकीपर फलंदाज ऋषभ पंतही वनडे सीरीजमध्ये खेळणार नाहीय.
मग विकेटकीपिंगची जबाबदारी कोणाकडे ?
बीसीसीआयने पंतच्या फिटनेसबद्दल महत्त्वाची अपडेट दिलीय. टॉसच्यावेळी रोहित शर्माने ऋषभ पंत टीमचा भाग नसल्याची माहिती दिली. त्याच्याजागी विकेटकीपिंगची जबाबदारी उपकर्णधार केएल राहुल संभाळणार आहे.
टेस्ट सीरीज खेळणार?
ऋषभ पंत आता टेस्ट सीरीजवेळी टीममध्ये दाखल होईल. तीन वनडे सामन्याच्या सीरीजनंतर टीम इंडिया आणि बांग्लादेशमध्ये दोन कसोटी सामने खेळले जाणार आहेत. 14 डिसेंबरपासून कसोटी मालिका सुरु होणार आहे.
पंत का खेळत नाहीय?
मेडीकल टीमसोबत चर्चा केल्यानंतर ऋषभ पंतला वनडे सीरीजमधून रिलीज करण्यात आलय. बीसीसीआयने टि्वटकरुन ही अपडेट दिली आहे. त्याच्याजागी कोणाला घ्यायच? तो निर्णय अजून झालेला नाही. ऑलराऊंडर अक्षर पटेल वनडे सीरीजचा भाग नव्हता.
? UPDATE
In consultation with the BCCI Medical Team, Rishabh Pant has been released from the ODI squad. He will join the team ahead of the Test series. No replacement has been sought
Axar Patel was not available for selection for the first ODI.#TeamIndia | #BANvIND
— BCCI (@BCCI) December 4, 2022
आज कोणी डेब्यु केला?
भारताचा वेगवान गोलंदाज कुलदीप सेनला डेब्युची संधी दिलीय. त्याने देशांतर्गत क्रिकेट स्पर्धेत चांगली कामगिरी केलीय. प्लेइंग 11 मध्ये वॉशिंगटन सुंदर, शाहबाज अहमद, शार्दुल ठाकुर आणि दीपक चाहरचा समावेश करण्यात आलाय.