India vs Bangladesh: टीम इंडियाने चटोग्राम कसोटी सामन्यात मोठा विजय मिळवला आहे. दोन कसोटी सामन्यांच्या मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली आहे. आज कसोटी सामन्याचा शेवटचा दिवस होता. कालच्या 6 बाद 272 वरुन आज बांग्लादेशने डाव पुढे सुरु केला. त्यांचे 4 विकेट बाकी होते. आज पाचव्या दिवशी स्कोर बोर्डवर फक्त 52 धावांची भर घालून बांग्लादेशचा डाव आटोपला.
भारताची प्लेइंग XI: केएल राहुल (कॅप्टन), शुभमन गिल, चेतेश्वर पुजारा, विराट कोहली, श्रेयस अय्यर, ऋषभ पंत, आर. अश्विन, अक्षर पटेल, कुलदीप यादव, उमेश यादव, मोहम्मद सिराज
बांग्लादेशची प्लेइंग XI: जाकिर हसन, नजमुल होसेन शांटो, यासिर अली, मुश्फिकुर रहीम, शाकिब अल हसन (कॅप्टन), लिट्टन दास, नुरुल हसन, मेहदी हसन, तैजुल इस्लाम, खालेद अहमद, एबादत होसेन
ताइजुल इस्लामला अक्षर पटेलने 4 रन्सवर बोल्ड केलं. बांग्लादेशचा डाव 324 धावांवर संपला. टीम इंडियाने 188 धावांनी हा कसोटी सामना जिंकला.
बांग्लादेशची नववी विकेट गेली आहे. इबादत होसैनला कुलदीप यादवने अय्यरकरवी कॅचआऊट केलं. तो शुन्यावर बाद झाला.
बांग्लादेशकडून किल्ला लढवणारा शाकीब अल हसन आऊट 84 रन्सवर आऊट झाला. कुलदीप यादवने हा अडथळा दूर केला. त्याने 6 चौकार आणि 6 षटकार लगावले. बांग्लादेशच्या 8 बाद 324 धावा झाल्या आहेत. बांग्लादेशला विजयासाठी 189 धावांची गरज आहे.
आज कसोटीचा शेवटचा दिवस आहे. सिराजने भारताला सातव यश मिळवून दिलं. 105 व्या ओव्हरच्या 5 व्या चेंडूवर सिराजने मिराजला बाद केलं. तो 13 धावा बनवून पॅव्हेलियनमध्ये परतला.
आटपाडी तालुक्यातील पडळकरवाडीमध्ये आमदार गोपीचंद पडळकर यांनी मतदानाचा हक्क बजावला
या गावात पडळकर यांच्या मातोश्री हिराबाई पडळकर सरपंचपदाच्या उमेदवार आहेत
सकाळी 7.30 वाजता मतदान प्रक्रियेला सुरुवात, मात्र एकाच केंद्रावरील इव्हीएम मशीन दोनदा बिघडली
ठाकरे गटाचे नेते आणि माजी मंत्री दिलीप सोपल यांच्या मूळ गावातील इव्हिएम मशीन बंद पडल्याने मतदान प्रक्रिया काही काळासाठी बंद
भाजप पुरस्कृत आमदार राजेंद्र राऊत विरुद्ध माजी आमदार दिलीप सोपल यांची प्रतिष्ठा पणाला
सोपल गटातर्फे सरपंचपदासाठी भानुदास बोधले तर राऊत गटातर्फे भानुदास बोधले यांचेच चुलत नातू रमेश बोधले निवडणुकीच्या रिंगणात
बांग्लादेशला विजयासाठी 513 धावांच लक्ष्य दिलं आहे. चौथ्या दिवसअखेर बांग्लादेशने 6 विकेट गमावून 272 धावा केल्या आहेत. अक्षर पटेलने 3 विकेट घेतल्या. उमशे यादव, अश्विन आणि कुलदीपने प्रत्येकी एक विकेट घेतली.
टीम इंडियाचा वनडे सीरीजमध्ये पराभव झाला. टेस्टमध्ये टीम इंडियाला या पराभवाचा बदला घेण्याची संधी आहे. टीम इंडिया विजयापासून 4 विकेट दूर आहे.