IND vs BAN Test Day 2 Report: कुलदीप यादव-सिराजने बांग्लादेशची वाट लावली, दुसऱ्यादिवसाचा खेळ समाप्त

| Updated on: Dec 15, 2022 | 4:50 PM

IND vs BAN Test Day 2 Report: टीम इंडियाच्या पहिल्या डावात 404 धावा, बांग्लादेश खराब स्थितीत.

IND vs BAN Test Day 2 Report: कुलदीप यादव-सिराजने बांग्लादेशची वाट लावली, दुसऱ्यादिवसाचा खेळ समाप्त
Kuldeep yadav
Image Credit source: Screengrab
Follow us on

ढाका: वनडे सीरीजमध्ये बांग्लादेशने दमदार कामगिरी केली. पण टेस्टमध्ये मात्र त्यांची हालत खराब आहे. चटोग्राम टेस्टचा आज दुसरा दिवस आहे. पहिल्या इनिंगमध्ये दुसऱ्यादिवसअखेर बांग्लादेशने 8 विकेट गमावून 133 धावा केल्या आहेत. बांग्लादेशच्या फलंदाजांना आधी मोहम्मद सिराजची पेस बॉलिंग समजली नाही. त्यानंतर कुलदीप यादवच्या फिरकीसमोर त्यांनी सरेंडर केलं. कुलदीप यादवने 10 ओव्हरमध्ये 33 धावा देऊन 4 विकेट घेतल्या आहेत. त्याखालोखाल सिराजने सर्वाधिक 3 विकेट काढल्या.

बांग्लादेशचा कुठलाही फलंदाज विकेटवर टिकू शकला नाही. मुश्फिकुर रहीमने 28 आणि लिट्टन दासने 24 धावा केल्या. जाकिर हससने 20 धावा केल्या.

सिराज समोर बांग्लादेशी फलंदाज हतबल

बांग्लादेशच्या डावाची सुरुवात खूपच खराब झाली. नजमुल हसन शांटो पहिल्या चेंडूवर बाद झाला. सिराजच्या चेंडूवर पंतने त्याची सुंदर कॅच पकडली. त्यानंतर उमेश यादवने यासीर अलीला क्लीन बोल्ड केलं. सिराजने बांग्लादेशी फलंदाजांना चांगलच सतावल. त्यानंतर लिट्टन दास आणि जाकिर हसनला आऊट करुन बॅकफूटवर ढकललं.

श्रेयस अय्यरकडून निराशा

तत्पूर्वी टीम इंडियाचा पहिला डाव 404 धावांवर आटोपला. आज दुसऱ्यादिवसाच्या खेळाला सुरुवात झाली. तेव्हा कालची नाबाद असलेली श्रेयस अय्यर आणि रविचंद्रन अश्विनची जोडी मैदानात उतरली. श्रेयस अय्यरकडून आज शतकाची अपेक्षा होती. पण त्याने निराश केलं.

त्या दोघांमुळेच 400 धावांचा टप्पा पार करणं शक्य?

कालच्या धावसंख्येत त्याने आज आणखी 4 धावांची भर घातली. त्यानंतर इबादत होसैनने श्रेयसला 86 धावांवर बोल्ड केलं. श्रेयसने 10 चौकार लगावले. आजच्या दिवसात 293 रन्सवर टीम इंडियाची सातवी विकेट पडली. त्यानंतर रविचंद्रन अश्विन आणि कुलदीप यादवने डाव सावरला. दोघांनी आठव्या विकेटसाठी 92 धावांची भागीदारी केली. त्यांच्या झुंजार खेळामुळेच टीम इंडियाला 400 धावांचा टप्पा पार करता आला.


कुलदीपने चांगली साथ दिली

अश्विनने शानदार फलंदाजी करत अर्धशतक झळकावलं. त्याने 113 चेंडूत 58 धावा केल्या. यात 2 चौकार आणि 2 षटकार आहेत. त्याला मेहदी हसन मिराजने बाद केलं. कुलदीप यादवने त्याला चांगली साथ दिली. कुलदीपने 40 धावा केल्या. ताईजुल इस्लामने त्याने LBW आऊट केलं. हे दोघे बाद झाल्यानंतर टीम इंडियाचा डाव फार चालला नाही. 404 धावांवर टीम इंडियाचा पहिला डाव आटोपला.