ढाका: टीम इंडिया आणि बांग्लादेशमध्ये चटोग्राम येथे कसोटी सामना सुरु आहे. आज या कसोटीचा दुसरा दिवस आहे. दोन कसोटी सामन्यांच्या मालिकेतील ही पहिली कसोटी आहे. काल पहिल्या दिवसअखेर टीम इंडियाच्या 6 बाद 278 धावा झाल्या होत्या. काल दिवसअखेर अक्षर पटेल 14 धावांवर आऊट झाला होता. आज दुसऱ्यादिवसाच्या खेळाला सुरुवात झाली. तेव्हा कालची नाबाद असलेली श्रेयस अय्यर आणि रविचंद्रन अश्विनची जोडी मैदानात उतरली. श्रेयस अय्यरकडून आज शतकाची अपेक्षा होती. पण त्याने निराश केलं.
त्या दोघांमुळेच 400 धावांचा टप्पा पार करणं शक्य?
कालच्या धावसंख्येत त्याने आज आणखी 4 धावांची भर घातली. त्यानंतर इबादत होसैनने श्रेयसला 86 धावांवर बोल्ड केलं. श्रेयसने 10 चौकार लगावले. आजच्या दिवसात 293 रन्सवर टीम इंडियाची सातवी विकेट पडली. त्यानंतर रविचंद्रन अश्विन आणि कुलदीप यादवने डाव सावरला. दोघांनी आठव्या विकेटसाठी 92 धावांची भागीदारी केली. त्यांच्या झुंजार खेळामुळेच टीम इंडियाला 400 धावांचा टप्पा पार करता आला.
कुलदीपने चांगली साथ दिली
अश्विनने शानदार फलंदाजी करत अर्धशतक झळकावलं. त्याने 113 चेंडूत 58 धावा केल्या. यात 2 चौकार आणि 2 षटकार आहेत. त्याला मेहदी हसन मिराजने बाद केलं. कुलदीप यादवने त्याला चांगली साथ दिली. कुलदीपने 40 धावा केल्या. ताईजुल इस्लामने त्याने LBW आऊट केलं. हे दोघे बाद झाल्यानंतर टीम इंडियाचा डाव फार चालला नाही. 404 धावांवर टीम इंडियाचा पहिला डाव आटोपला.
#TeamIndia all out for 404 in the first innings.
Half-centuries for Cheteshwar Pujara (90), Shreyas Iyer (86) & Ashwin Ravi (58)? ?
Valuable 40s from Rishabh Pant (46) and Kuldeep Yadav (40)@mdsirajofficial into the attack gets a wicket on the first delivery.#BANvIND pic.twitter.com/4esaKrTtfi
— BCCI (@BCCI) December 15, 2022
बांग्लादेशची खराब सुरुवात
पहिल्या डावात बांग्लादेशची सुरुवातही खराब झाली. पहिल्या षटकातील पहिल्या चेंडूवर मोहम्मद सिराजने नजमुल शांटोला ऋषभ पंतकरवी झेलबाद केलं. तो शुन्यावर बाद झाला. त्यानंतर चौथ्या ओव्हरमध्ये उमेश यादवने यासीर अलीला 4 रन्सवर क्लीन बोल्ड केलं. अवघ्या 5 रन्समध्ये बांग्लादेशच दोन फलंदाज तंबूत परतले.