India vs Bangladesh, 2nd Test, Day 1: टीम इंडिया आणि बांग्लादेशमध्ये आजपासून दुसरा कसोटी सामना सुरु होणार आहे. ढाकाच्या शेर-ए-बांग्ला स्टेडियममध्ये हा कसोटी सामना खेळला जाईल. टीम इंडियाने पहिला कसोटी सामना जिंकून मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली आहे. टीम इंडियाने पहिला कसोटी सामना जिंकला. पण चौथ्या डावात बांग्लादेशी फलंदाजांनी भारतीय गोलंदाजांना चांगलच हैराण केलं होतं. ढाक्यात टीम इंडियाच्या गोलंदाजांना सर्तक रहाण्याची आवश्यकता आहे. टीम इंडियाने पहिला कसोटी सामना 188 धावांनी जिंकला होता. आता टीमकडे क्लीन स्वीपची संधी आहे.
खराब प्रकाशामुळे पहिल्या दिवसाचा खेळ सहा ओव्हरआधीच संपला. बांग्लादेशने प्रथम फलंदाजी केली. त्यांची टीम 227 धावांवर ऑलआऊट झाली. टीम इंडियाने पहिल्या इनिंगमध्ये कुठलीही विकेट न गमावता 19 धावा केल्या आहेत. शुभमन गिल 14 आणि केएल राहुल 3 रन्सवर खेळतोय.
7 ओव्हर्सनंतर टीम इंडियाच्या बिनबाद 19 धावा झाल्या आहेत. कॅप्टन केएल राहुल 3 आणि शुभमन गिलची 14 जोडी मैदानात आहे.
बांग्लादेशची टीम 227 रन्सवर ऑल आऊट झाली. बांग्लादेशकडून मोमीनुल हकने सर्वाधिक 84 धावा केल्या. टीम इंडियाकडूने उमेश यादवने सर्वाधिक 4, जयदेव उनाडकटने 2 आणि रविचंद्रन अश्विनने 4 विकेट घेतल्या.
71 षटकांअखेरीस बांग्लादेशच्या 7 बाद 221 धावा झाल्या आहेत. मोमीनुल हक एकाबाजूने किल्ला लढवतोय. मेहदी हसन मिराजला 15 रन्सवर उमेश यादवने पंतरकरवी झेलबाद केलं. त्यानंतर नुरुल हसनला 6 धावांवर उमेशने पायचीत पकडलं.
बांग्लादेशने 200 धावांचा टप्पा ओलांडला आहे. 65 ओव्हर्समध्ये बांग्लादेशच्या 5 बाद 203 धावा झाल्या आहेत. मोमीनुल हक 72 आणि मेहदी हसन मिराज 15 धावांवर खेळतोय.
57.2 ओव्हर्समध्ये बांग्लादेशच्या 5 बाद 185 धावा झाल्या आहेत. मोमीनुल हक 66 आणि मेहदी हसन मिराज 4 धावांवर खेळतोय.
बांग्लादेशचा निम्मा संघ तंबूत परतलाय. त्यांच्या 5 बाद 177 धावा झाल्या आहेत. लिट्टन दास 25 रन्सवर आऊट झाला. अश्विनने त्याला राहुलकरवी कॅचआऊट केलं. मोमीनुल हकने अर्धशतक झळकावलं. तो 59 धावांवर खेळतोय. मेहदी हसन मिराज 4 धावांवर आहे.
42 ओव्हर अखेरीस बांग्लादेशच्या 4 बाद 131 धावा झाल्या आहेत. मुशाफिकूर रहीमला 26 धावांवर जयदेव उनाडकटने ऋषभ पंतकरवी झेलबाद केलं. मोमीनुल हक 42 आणि लिट्टन दासची जोडी मैदानात आहे.
लंचनंतर पहिल्याच चेंडूवर उमेश यादवने बांग्लादेशला झटका दिला. सेट झालेल्या शाकीब अल हसनला उमेश यादवने पुजाराकरवी 16 धावांवर झेलबाद केलं. 33 ओव्हरअखेरीस बांग्लादेशच्या 3 बाद 97 धावा झाल्या आहेत.
लंचपर्यंत बांग्लादेशच्या 28 ओव्हर्समध्ये 2 बाद 82 धावा झाल्या आहेत. मोमिनुल हक 23 आणि कॅप्टन शाकीब अल हसन 16 धावांवर खेळतोय.
पहिल्या दोन विकेट लवकर गेल्यानंतर मोमिनुल हक आणि कॅप्टन शाकीब अल हसनने डाव सावरला. मोमिनुल 19 आणि शाकीब 16 रन्सवर खेळतोय.
पुणे : राज्यातील नागरिकांनी नव्या कोरोना व्हेरीयंटबाबत घाबरून जाऊ नये,
नव्या कोरोनाचा मृत्यूदर कमी आहे चार ते पाच दिवसांत हा आजार बरा होऊ शकतो,
नागरिकांनी मात्र प्रतिबंधात्मक उपाययोजना केल्या पाहिजे,
चीनमधून जे व्हीडीओ येतायेत त्याची सत्यता केंद्रीय आरोग्य यंत्रणेनी तपासली पाहिजे,
जर रुग्णसंख्या वाढली, मृत्यू वाढले हॉस्पिटलची संख्या कमी पडू लागली तर लॉकडाऊनची गरज लागू शकते,
लसीकरण झालेल्यांना गंभीर आजार उद्भवणार नाही मात्र लसीकरण न झालेल्या व्यक्तींना याचा धोका आहे
मात्र नागरिकांना घाबरून जाऊ नका आय एम ए चे माजी अध्यक्ष डॉ. अविनाश भोंडवे यांची प्रतिक्रिया.
नजमुल होसौन शांटोच्या रुपाने बांग्लादेशची दुसरी विकेट गेली आहे. 24 रन्सवर अश्विनने त्याला पायचीत पकडलं. 16.2 ओव्हर्समध्ये बांग्लादेशच्या 2 बाद 39 धावा झाल्या आहेत.
सावध सुरुवातीनंतर बांग्लादेशच्या दोन विकेट गेल्या आहेत. जयदेव उनाडकटने पहिलं यश मिळवून दिलं. झाकीर हसनला जयदेव उनाडकटने राहुलकरवी झेलबाद केलं. झाकीरने 15 धावा केल्या.
कोल्हापूर : कोल्हापूर विमानतळावर आजपासून पुन्हा कोरोना नियमांच्या अंमलबजावणीला सुरुवात,
मास्क सॅनिटायझर्स सोशल डिस्टन्सिंग चे नियम पाळावे लागणार,
विमानतळ कर्मचारी तसेच पोलिसांनाही मास्क सक्तीचा,
प्रवाशांना केलं जातंय मास्क वाटप,
कोरोनाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी विमानतळ प्रशासनाची खबरदारी,
कोल्हापुरात मुंबई बेंगलोर सह महत्त्वाच्या शहरातून प्रवासी येत असल्याने घेतली जातेय खबरदारी.
बांग्लादेशची फलंदाजी सुरु आहे. त्यांची सलामीची जोडी मैदानात आहे. 12 ओव्हरअखेरीस त्यांच्या बिनबाद 32 धावा झाल्या आहेत. नजमुल होसौन शांटो 17 आणि झाकीर हसन 15 रन्सवर खेळतोय.
बांग्लादेशची फलंदाजी सुरु आहे. त्यांची सलामीची जोडी मैदानात आहे. 10 ओव्हरअखेरीस त्यांच्या बिनबाद 23 धावा झाल्या आहेत. नजमुल होसौन शांटो 12 आणि झाकीर हसन 11 रन्सवर खेळतोय.
बांग्लादेशची फलंदाजी सुरु झाली आहे. त्यांची सलामीची जोडी मैदानात आहे. 6 ओव्हरअखेरीस त्यांच्या बिनबाद 14 धावा झाल्या आहेत. नजमुल होसौन शांटो 4 आणि झाकीर हसन 10 रन्सवर खेळतोय.
अविश्वास ठराव मांडण्यासाठी 26 डिसेंबर रोजी विशेष सभेचे आयोजन
अविश्वास ठरावाच्या बाजूने असणारे 12 सदस्य भ्रमंतीवर गेले असून ते सोमवारी सकाळीच परत येणार
विनाकारण शासकीय कामात ढवळाढवळ करणे, न.पं. सदस्यांना विश्वासात न घेता मनमर्जीने कोणतेही काम करणे इत्यादी कारणावरून हा अविश्वास ठराव आणण्यात आलाय
कुलदीप यादव पहिल्या कसोटीत टीम इंडियाच्या विजयाचा हिरो ठरला होता. त्याला बाहेर बसवून त्याच्याजागी जयदेव उनाडकटचा टीममध्ये समावेश केला.
केएल राहुल (कॅप्टन), शुभमन गिल, चेतेश्वर पुजारा, विराट कोहली, श्रेयस अय्यर, ऋषभ पंत (विकेटकीपर), आर.अश्विन, अक्षर पटेल, जयदेव उनाडकट, उमेश यादव, मोहम्मद सिराज,
A look at our Playing XI for the 2nd Test.
One change for #TeamIndia. Jaydev Unadkat comes in XI.
Live – https://t.co/XZOGpedIqj #BANvIND pic.twitter.com/ampkK88yX2
— BCCI (@BCCI) December 22, 2022
केएल राहुलला काल दुखापत झाली होती. त्यामुळे त्याच्या खेळण्याबद्दल साशंकता होती. पण केएल राहुल दुसरा कसोटी सामना खेळणार आहे. तो टीमच नेतृत्व करतोय.
दुसऱ्या कसोटी सामन्यात बांग्लादेशने टॉस जिंकून पहिली बॅटिंग करण्याचा निर्णय घेतला आहे.