IND Vs BAN Weather Report: एडिलेडमध्ये भारत वि बांग्लादेश मॅच होणार नाही का? आज कसं होतं हवामान

| Updated on: Nov 01, 2022 | 5:02 PM

IND Vs BAN Weather Report: सेमीफायनल गाठण्यासाठी टीम इंडियासाठी उद्या विजय आवश्यक आहे, अशावेळी हवामान विभाग म्हणतोय....

IND Vs BAN Weather Report: एडिलेडमध्ये भारत वि बांग्लादेश मॅच होणार नाही का? आज कसं होतं हवामान
Team India
Follow us on

ब्रिस्बेन: टीम इंडिया आणि बांग्लादेशची टीम बुधवारी एडिलेड ओव्हलच्या मैदानात आमने-सामने येणार आहे. ही मॅच दोन्ही टीमसाठी महत्त्वाची आहे. दोन्ही संघ आयसीसी टी 20 वर्ल्ड कपच्या सेमीफायनलमध्ये स्थान पक्क करण्याच्या इराद्याने या मॅचमध्ये खेळतील. पण त्यासाठी ही मॅच होणं आवश्यक आहे. एडिलेड ओव्हलमध्ये होणाऱ्या मॅचवर हवामानाचा परिणाम होऊ शकतो. मंगळवारी एडिलेडमध्ये जोरदार पाऊस कोसळला. तिथे थंडावा जास्त वाढलाय.

भारतीय चाहत्यांची एकच प्रार्थना

या टी 20 वर्ल्ड कपमध्ये अनेक मॅच पावसामुळे रद्द झाल्या आहेत. त्यामुळे टीमच सेमीफायनलच समीकरणही बिघडलं आहे. उद्या बांग्लादेश विरुद्ध टीम इंडिया मैदानात उतरेल, त्यावेळी पावसाने व्यत्यय आणू नये, अशी भारतीय चाहत्यांची प्रार्थना असेल.

मॅचच्या दिवशी पाऊस कोसळणार?

क्रिकेट चाहत्यांसाठी निराशाजनक बातमी आहे. मंगळवारी म्हणजे आज एडिलेडमध्ये पाऊस कोसळतोय. वेदर रिपोर्टनुसार उद्या सुद्धा पाऊस कोसळू शकतो. पाऊस जास्त जोरात कोसळणार नाही. उद्या बुधवारी मॅचच्या दिवशी पाऊस कोसळण्याची 60 टक्के शक्यता आहे. मॅच संध्याकाळी 6.30 वाजता सुरु होणार आहे. मॅचच्या वेळी पाऊस होऊ शकतो. हवामान विभागाने दिवसभर ढगाळ हवामानाचा अंदाज वर्तवला आहे. मंगळवारी पावसामुळे टीम इंडियाला इंडोर सराव करावा लागला. बुधवारच्या हवामानावर सगळ्यांची नजर असेल.

टीम सामने विजयपराजयरनरेट पॉइंट्स
भारत 431+0.7306
पाकिस्तान 532+1.0286
दक्षिण आफ्रिका 522+0.8745
नेदरलँड्स523-0.8494
बांग्लादेश 523-1.1764
झिम्बाब्वे 412-0.3133

मॅच रद्द झाल्यास अडचणी वाढणार

भारत-बांग्लादेश सामना पावसामुळे झाला नाही, तर दोन्ही टीम्सच्या सेमीफायनल प्रवेशाच्या अपेक्षेला मोठा धक्का बसेल. पॉइंटस टेबलमध्ये दक्षिण आफ्रिकेची टीम पहिल्या स्थानावर आहे. टीम इंडिया तीन सामन्यात दोन विजय आणि एका पराजयासह चार पॉइंटससह दुसऱ्या स्थानावर आहे. बांग्लादेशचेही चार पॉइंटस आहेत. पण नेट रनरेटमध्ये ते भारतापेक्षा मागे आहेत. त्यामुळे तिसऱ्या स्थानावर आहेत. पावसामुळे हा सामना झाला नाही, तर दोन्ही टीम्सना कुठल्याही परिस्थिती पुढची मॅच जिंकावी लागेल. नेट रनरेटही सेमीफायनलमध्ये पोहोचण्यासाठी महत्त्वाची भूमिका बजावू शकतो.