ढाका: टीम इंडियाने आधीच बांग्लादेश विरुद्ध वनडे सीरीज गमावलीय. आता क्लीप स्वीप टाळण्यासाठी ते शनिवारी मैदानात उतरतील. या मॅचआधी टीममध्ये कुलदीप यादवने पुनरागमन केलय. या सीरीजमध्ये टीम इंडियाच्या तीन खेळाडूंना दुखापत झालीय. कॅप्टन रोहित शर्माला दुसऱ्या वनडे दरम्यान स्लीपमध्ये फिल्डिंग करताना दुखापत झाली होती. त्यानंतर त्याला तात्काळ रुग्णालयात नेण्यात आलं.
रोहित शिवाय अजून एक गोलंदाज दुखापतग्रस्त
रोहित शर्मा शेवटच्या वनडे मॅचमध्ये खेळणार नाहीय. तो तात्काळ मुंबईला निघून आला. रोहित शर्मा बांग्लादेश विरुद्ध कसोटी सामना खेळणार की, नाही, यावर नंतर निर्णय घेण्यात येईल. रोहितशिवाय वेगवान गोलंदाज कुलदीप सेनला सुद्धा पहिल्या वनडेच्यावेळी पाठदुखीचा त्रास सुरु झाला. दुसऱ्या वनडेच्यावेळी त्याला विश्रांती देण्यात आली. आता तो तिसऱ्या वनेडतही खेळणार नाहीय.
आता त्याची आठवण झाली
रोहित आणि कुलदीप सेनशिवाय वेगवान गोलंदाज दीपक चाहरला सुद्धा दुखापत झालीय. तो सुद्धा वनडे सीरीज बाहेर गेला आहे. कुलदीप आणि चाहर दोघे एनसीएमध्ये रिपोर्ट करणार आहेत. सीरीज दरम्यान 3 झटके बसले. आता तिसऱ्या वनडेसाठी टीम मजबूत करण्याच्या दृष्टीने कुलदीप यादवची टीममध्ये निवड करण्यात आलीय. रोहितच्या अनुपस्थितीत केएल राहुल तिसऱ्या वनडेमध्ये टीम इंडियाच नेतृत्व करेल.
शेवटच्या सामन्यात मॅन ऑफ द मॅच
कुलदीप यादव याचवर्षी भारताकडून ऑक्टोबर महिन्यात दक्षिण आफ्रिकेविरुद्ध तिसऱ्या वनडे सामन्यात खेळला होता. दिल्लीमध्ये झालेल्या या सामन्यानंतर तो टीमच्या बाहेर होता. टीम इंडियाकडून खेळलेल्या शेवटच्या सामन्यात तो सामनावीर पुरस्काराचा मानकरी ठरला होता. त्याने 18 धावात 4 विकेट घेतल्या होत्या.
? NEWS ?: Kuldeep Yadav added to #TeamIndia squad for the final ODI against Bangladesh. #BANvIND
Other Updates & More Details ?https://t.co/8gl4hcWqt7
— BCCI (@BCCI) December 9, 2022
बांग्लादेशविरुद्ध तिसऱ्या वनडेसाठी भारतीय टीम
केएल राहुल, (कॅप्टन) शिखर धवन, विराट कोहली, रजत पाटीदार, श्रेयस अय्यर, राहुल त्रिपाठी, इशान किशन, शहबाज अहमद, अक्षर पटेल, वॉशिंगटन सुंदर, शार्दुल ठाकुर, मोहम्मद सिराज, उमरान मलिक, कुलदीप यादव