ढाका: टीम इंडियाने बांग्लादेश विरुद्ध वनडे सीरीज गमावली. आता शनिवारी शेवटचा सामना खेळण्यासाठी टीम इंडिया मैदानात उतरेल. क्लीन स्वीप टाळण्याचा टीम इंडियाचा प्रयत्न असेल. प्रतिष्ठा राखण्याच्या दृष्टीने टीम इंडियासाठी हा सामना महत्त्वाचा आहे. पहिल्या वनडे सामन्यात भारताचा एक विकेटने पराभव झाला होता. दुसरा सामना पाच रन्सनी गमावला होता. आता चटगांवमध्ये असू घडू नये, हा टीम इंडियाचा प्रयत्न असेल. बांग्लादेशने सीरीजमध्ये क्लीनस्वीप केल्यास त्यांच्या क्रिकेट इतिहासातील हा सोनेरी क्षण असेल.
रोहित शर्मा मुंबईत
टीम इंडिया सध्या खेळाडूंच्या दुखापती आणि फिटनेस समस्यांचा सामना करत आहे. आधी टीमकडे 20 खेळाडू होते. पण आता दोन सामन्यानंतर त्यांच्याकडे केवळ 14 खेळाडू उरले आहेत. टीमच्या सहा खेळाडूंना एका आठवड्यात दुखापती झाल्या आहेत. टीमचा कॅप्टन रोहित शर्मा मुंबईत परतला आहे. केएल राहुल टीमच नेतृत्व करणार आहे.
कधी खेळला जाणार भारत आणि बांग्लादेशमध्ये तिसरा वनडे सामना?
भारत आणि बांग्लादेशमध्ये तिसरा वनडे सामना शनिवारी 10 डिसेंबरला खेळला जाईल.
भारत आणि बांग्लादेशमध्ये तिसरा वनडे सामना कुठे खेळला जाणार?
भारत आणि बांग्लादेशमध्ये तिसरा वनडे सामना चटगांवच्या जाहुर अहमद स्टेडियमममध्ये खेळला जाईल.
भारत आणि बांग्लादेशमध्ये तिसरा वनडे सामना कधी सुरु होणार?
भारत आणि बांग्लादेशमध्ये तिसरा वनडे सामना सकाळी 11.30 वाजता सुरु होईल. टॉस सकाळी 11 वाजता उडवला जाईल.
भारत आणि बांग्लादेशमधील तिसरा वनडे सामना तुम्ही कुठे पाहू शकता?
भारत आणि बांग्लादेशमधील तिसऱ्या वनडे सामन्याच लाइव्ह टेलिकास्ट सोनी स्पोर्ट्स नेटवर्कच्या चॅनलवर होईल.
भारत आणि बांग्लादेशमधील तिसऱ्या मॅचच लाइव्ह स्ट्रीमिंग कुठे पाहू शकता?
भारत आणि बांग्लादेशमधील तिसऱ्या वनडे मॅचच लाइव्ह स्ट्रीमिंग तुम्ही सोनी लिव्ह अॅपवर पाहू शकता.
भारताची : केएल राहुल ( कॅप्टन ) , शिखर धवन, विराट कोहली, श्रेयस अय्यर, ईशान किशन, मोहम्मद सिराज, रजत पाटीदार, राहुल त्रिपाठी, वाशिंगटन सुंदर, शाहबाज अहमद, अक्षर पटेल, शार्दुल ठाकुर, उमरान मलिक, कुलदीप यादव