ढाका: टीम इंडिया सध्या न्यूझीलंड दौऱ्यावर आहे. टी 20 सीरीज जिंकल्यानंतर शुक्रवारपासून वनडे सीरीज सुरु होणार आहे. या दौऱ्यानंतर टीम इंडिया बांग्लादेश विरुद्ध वनडे आणि टेस्ट सीरीज खेळणार आहे. बांग्लादेश दौऱ्याआधी एक मोठी बातमी समोर आलीय. भारत आणि बांग्लादेशमध्ये होणाऱ्या वनडे सीरीजच्या तिसऱ्या सामन्यात मोठा बदल झालाय. तिसऱ्या वनडेचा वेन्यू बदलण्यात आलाय.
आता तिसरी वनडे कुठे होणार?
भारत आणि बांग्लादेश या दोन टीम्समध्ये तिसरा वनडे सामना ढाका येथे होणार होता. पण आता हा सामना चटगाव येथे खेळला जाईल. भारतीय टीम 4 डिसेंबरपासून बांग्लादेश विरुद्ध वनडे सीरीज खेळणार आहे. तिसरा वनडे सामना 10 डिसेंबरला ढाकामध्ये होणार होता. पण बांग्लादेशच्या नॅशनलिस्ट पार्टीने त्या दिवशी विरोध प्रदर्शनाचा इशारा दिला होता. त्याच दिवशी एक रॅली सुद्धा आयोजित करण्यात आली आहे.
विरोध प्रदर्शनाच्या धमक्याच्या पार्श्वभूमीवर बांग्लादेश क्रिकेट बोर्डाने सामन्याचा वेन्यू बदलण्याचा निर्णय घेतलाय. खेळाडूंच्या सुरक्षिततेसाठी हा निर्णय घेतलाय.
तिन्ही वनडे एकाच ठीकाणी होणार होत्या
बांग्लादेश-भारत वनडे सीरीजमधील तिन्ही सामने ढाकामध्येच होणार होते. पण शेवटचा सामना चटगाव येथे खेळवला जाईल. त्याशिवाय या मैदानात एक कसोटी सामना होईल. सीरीजमधील दुसरा कसोटी सामना ढाका येथे होईल. टेस्ट सीरीज 14 डिसेंबरपासून सुरु होणार आहे.
वनडे सीरीजसाठी भारतीय टीम
रोहित शर्मा (कॅप्टन), केएल राहुल, राहुल त्रिपाठी, ऋषभ पंत (विकेटकीपर), शिखर धवन, विराट कोहली, रजत पाटीदार, श्रेयस अय्यर, इशान किशन (विकेटकीपर), मोहम्मद शमी, मो. सिराज, दीपक चाहर, यश दयाल, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल , वाशिंगटन सुंदर, शार्दुल ठाकुर.
टेस्ट सीरीजसाठी भारतीय टीम
रोहित शर्मा (कॅप्टन), ऋषभ पंत (विकेटकीपर), केएस भरत (विकेटकीपर), केएल राहुल, शुभमन गिल, चेतेश्वर पुजारा, विराट कोहली, श्रेयस अय्यर, अक्षर पटेल , कुलदीप यादव, शार्दुल ठाकुर, मो. शमी, मो. सिराज, उमेश यादव, रवींद्र जडेजा, रविचंद्रन अश्विन.