IND vs BAN T20 WC: सामना सुरु होणार, ओव्हर्स कमी झाल्या, बांग्लादेशला विजयासाठी नवीन टार्गेट

| Updated on: Nov 02, 2022 | 4:55 PM

IND vs BAN T20 WC: पावसामुळे सगळा खेळच बदलला.

IND vs BAN T20 WC: सामना सुरु होणार, ओव्हर्स कमी झाल्या, बांग्लादेशला विजयासाठी नवीन टार्गेट
Team india
Follow us on

एडिलेड: टीम इंडिया आणि बांग्लादेशमध्ये एडिलेड ओव्हलच्या मैदानात सामना सुरु आहे. या मॅचमध्ये आज पावसाने व्यत्यय आणला. त्यामुळे वेळ वाया गेला. आता पाऊस थांबला असून सामना सुरु झाला आहे. अंपायर्सनी मैदानाची पाहणी केल्यानंतर सामना सुरु करण्याचा निर्णय घेतला. पावसामुळे सगळा खेळच बदलून गेला आहे.

पावसामुळे ओव्हर्स कमी झाल्या

पावसामुळे चार षटक कमी करण्यात आली आहेत. बांग्लादेशला आता विजयासाठी 16 ओव्हर्समध्ये 151 धावांच टार्गेट देण्यात आलं आहे. 9 ओव्हर्समध्ये बांग्लादेशला विजयासाठी 84 धावांची गरज आहे.

पाऊस सुरु होण्याआधी काय होती स्थिती?

सेमीफायनलमध्ये प्रवेशाच्या दृष्टीने टीम इंडियासाठी ही मॅच महत्त्वाची आहे. T20 वर्ल्ड कप 2022 मध्ये पुढे प्रवास सुरु ठेवण्यासाठी टीम इंडियाला आजची मॅच जिंकावीच लागेल. टीम इंडियाने 20 ओव्हर्समध्ये 6 विकेट गमावून 184 धावा केल्या होत्या. बांग्लादेशला विजयासाठी 185 धावांची गरज होती.

बांग्लादेशची चांगली सुरुवात

बांग्लादेशने दमदार सुरुवात केली होती. बांग्लादेशच्या 7 ओव्हर्समध्ये बिनबाद 66 धावा झाल्या होत्या. बांग्लादेशची सलामीची जोडी मैदानात आहे. लिट्टन दासने भारतीय गोलंदाजांचा चांगलाच समाचार घेतला. त्याने भारतीय गोलंदाजीवर हल्लोबल केला. लिट्टन दासने 26 चेंडूत नाबाद 59 धावा केल्या. त्याने 7 फोर आणि 3 सिक्स लगावले. नजमुल शांतो 7 धावांवर नाबाद आहे. भुवनेश्वर कुमार, अर्शदीप सिंह आणि मोहम्मद शमी या सगळ्याच वेगवान गोलंदाजाचा त्याने समाचार घेतला.