एडिलेड: टीम इंडियाचा आज बांग्लादेश विरुद्ध एडिलेड ओव्हलच्या मैदानात सामना सुरु आहे. सेमीफायनल प्रवेशासाठी टीम इंडियाला ही मॅच जिंकण आवश्यक आहे. सध्या पावसाच्या व्यत्ययामुळे हा सामना थांबवण्यात आलाय. बांग्लादेशच्या 7 ओव्हर्समध्ये बिनबाद 66 धावा झाल्यात.
लिट्टन दासचा हल्लाबोल
बांग्लादेशची सलामीची जोडी मैदानात आहे. लिट्टन दासने भारतीय गोलंदाजांचा चांगलाच समाचार घेतला. त्याने भारतीय गोलंदाजीवर हल्लोबल केला. लिट्टन दासने 26 चेंडूत नाबाद 59 धावा केल्या. त्याने 7 फोर आणि 3 सिक्स लगावले. नजमुल शांतो 7 धावांवर नाबाद आहे. भुवनेश्वर कुमार, अर्शदीप सिंह आणि मोहम्मद शमी या सगळ्याच वेगवान गोलंदाजाचा त्याने समाचार घेतला.
बांग्लादेशला 185 धावांची गरज
T20 वर्ल्ड कप 2022 मध्ये पुढे प्रवास सुरु ठेवण्यासाठी टीम इंडियाला आजची मॅच जिंकावीच लागेल. टीम इंडियाने 20 ओव्हर्समध्ये 6 विकेट गमावून 184 धावा केल्या. बांग्लादेशला विजयासाठी 185 धावांची गरज आहे.