अडिलेड: टीम इंडिया आज T20 वर्ल्ड कप 2022 मध्ये बांग्लादेश विरुद्ध खेळणार आहे. सेमीफायनल गाठण्यासाठी दोन्ही टीम्ससाठी आजची मॅच महत्त्वाची आहे. मागच्या सामन्यात दक्षिण आफ्रिकेने टीम इंडियाचा पराभव केला होता. त्यामुळे टीम इंडियाला आजची मॅच जिंकण महत्त्वाच आहे. या वर्ल्ड कपमध्ये भारताने दमदार सुरुवात केली होती. आधी परंपरागत प्रतिस्पर्धी पाकिस्तान त्यानंतर नेदरलँड्स विरुद्ध विजय मिळवला.
कोणी जिंकला टॉस?
बांग्लादेशचा कॅप्टन शाकीब अल हसनने टॉस जिंकला आहे. त्यांनी बॉलिंग करण्याचा निर्णय घेतलाय. टीम इंडियामध्ये एकमेव बदल झाला आहे. दीपक हुड्डाच्या जागी अक्षर पटेलचा टीममध्ये समावेश करण्यात आला आहे.
बांग्लादेशला कमी लेखून चालणार नाही
दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या तिसऱ्या सामन्यात टीम इंडियाचा पराभव झाला. वर्ल्ड कपमधला भारताचा हा पहिला पराभव होता. टीम इंडियाने पुन्हा एकदा विजयी मार्गावर परतावे, अशी तमाम क्रिकेट चाहत्यांची इच्छा आहे. टीम इंडियाच्या तुलनेत बांग्लादेशची टीम कमकुवत भासत आहे. पण त्यांना कमी लेखून चालणार नाही.
आज सर्वोत्तम खेळ दाखवण्याचा दिवस
कारण या वर्ल्ड कपमध्ये दुबळ्या समजल्या जाणाऱ्या टीम्सनी मोठ्या संघांना पराभवाचा धक्का दिला आहे. यात श्रीलंका, वेस्ट इंडिजपासून इंग्लंडसारख्या टीम्स आहेत. त्यामुळे बांग्लादेशला कमी लेखून चालणार नाही. सेमीफायनल गाठण्यासाठी टीम इंडियाला आज आपला सर्वोत्तम खेळ दाखवावा लागेल.
T20 WC 2022. India XI: R Sharma (c), K L Rahul, V Kohli, S Yadav, D Karthik (wk), H Pandya, A Patel, R Ashwin, A Singh, B Kumar, M Shami. https://t.co/Tspn2vo9dQ #INDvBAN #T20WorldCup
— BCCI (@BCCI) November 2, 2022
ऋषभला संधी मिळणार?
बांग्लादेश विरुद्धच्या सामन्यात टीम इंडियाच्या प्लेइंग 11 मध्ये काही बदल होऊ शकतात. दिनेश कार्तिकला मागच्या दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या सामन्यात पाठिला दुखापत झाली होती. त्याच्याजागी विकेटकीपर ऋषभ पंतला संधी मिळू शकते. ऋषभ पंतचा वर्ल्ड कपममधला हा पहिला सामना असू शकतो.
दीपक हुड्डाचा प्रयोग फसला
त्यानंतर मागच्या सामन्यात अक्षर पटेलला बसवून दीपक हुड्डाला संधी देण्यात आली होती. पण त्याचा काही उपयोग झाला नाही. त्यामुळे आज हुड्डाला बसवून अक्षर पटेलचा टीममध्ये समावेश केला जाईल. वर्ल्ड कपच्या या महत्त्वाच्या सामन्यात टीम इंडियाची प्लेइंग 11 काय असेल, याची सर्वांनाच उत्सुकता आहे.
अशी आहे टीम इंडियाची प्लेइंग 11
रोहित शर्मा (कॅप्टन), केएल राहुल, विराट कोहली, सूर्यकुमार यादव, हार्दिक पंड्या, दिनेश कार्तिक, अश्विन, भुवनेश्वर कुमार, अक्षर पटेल, मोहम्मद शमी, अर्शदीप सिंह